Home
Quotes New

Audio

Forum

Read

Contest


Write

Write blog

Log In
CATEGORIES
*गैरसमज अनिंसचा* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची - 4)
 12 April 2019  
Art

*गैरसमज अनिंसचा* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)----------------------------------------by - *योगेश रंगनाथ निकम*औरंगाबादYogeshnikam1303@gmail.com10 डिसेंबर 2018मागील लेखात मी सांगितलेल्या प्रयोगाने ज्यांच्या अंगावर शहारे आले असतील, त्यांनी एका सत्य घटनेवर आधारलेला *अलाईव्ह* हा सुंदर इंग्रजी चित्रपट पाहावा. जिवंतपणाची कुठलीही खूण नसणार्‍या बर्फाळ भागात एका प्रवासी विमानाचा अपघात होतो. विमानातले काही प्रवासी त्या अपघातात मरण पावतात व बरेचसे वाचतात. वाचलेल्यांना प्रवाशांना तिथल्या भयंकर परिस्थितीशी लढा देऊन माणसांच्या जगात परत येण्यासाठी, काही दिवस जिवंत राहणे आवश्यक असते त्यामुळे जिवंत राहण्यासाठी त्यांना आपल्या पोटाची भूक भागवणेसुध्दा आवश्यक ठरते. 'अन्न’ ही मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी मग त्यातले काही प्रवासी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाच्या मांसाचे भक्षण करतात. ‘या प्रकारे आपली भूक भागवली जावी’ हे ज्यांच्या बुद्धीला पटत नाही असे प्रवासी अन्नाअभावी मरण पत्कारणे पसंत करतात. त्यातला एक प्रवासी मरता मरता जिवंत असणार्‍यांना सांगते की, ‘मानव देहाच्या मांसाचे भक्षण करणे मला तर काही जमले नाही, परंतू माझ्या शरीराचे मांस खाऊन तुम्ही जिवंत राहावे अशी माझी इच्छा आहे व त्यास मी आनंदाने परवानगी देतो’. या विमान अपघातातून जे पुन्हा आपल्या जगात परत आले त्यांनीच ही कहाणी वर्णन केली आहे.सांगायचे एवढेच की, ‘अपरीहार्य परिस्थितीत मानव कसा वागेल’ याचा अंदाज बांधता येत नाही. तो ज्या प्रकारे वागला त्याचे समर्थनही करता येत नाही व त्याचे वागणे चूक होते असे म्हणण्याचाही आपल्याला काही अधिकार असत नाही. थोडक्यात, *आपण न्यायाधीशाची भूमिका पार पाडू शकत नाही*. कारण आपण, आपापल्या दिवाणखान्यांमध्ये बसून चहाच्या घोटासोबत फक्त विचार करत असतो.‘अपरिहार्य परिस्थिती आपल्यासमोर उद्भवली तर आपण स्वत: नेमके कसे वागू?’ याबद्दल आपल्याला विचार करता येईल खरा, पण तो ‘जर तर’ चा विचार असेल. स्वत:ची ‘अशा शक्यता अशक्यतांच्या अपरिहार्य परिस्थितीतून सुटका व्हावी’ म्हणून मानवाने संस्कृती व त्याद्वारे जगण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली. आपण जी जीवनपद्धती जगत असतो ती क्षणार्धात निर्माण झालेली नसते, त्यामुळे काळाच्या ओघात तिच्यात निर्माण झालेले टाकाऊ घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा दीर्घकाळ जावा लागतो. आपल्या जीवनपद्धतीत ‘त्याज्य दुर्गुण’ निर्माण झालेले आहेत हे कळण्याइतपत जीवनदृष्टी सर्वसाधारण समाजाला असत नाही. अशी दृष्टी असणारे 'ज्ञानी लोक' समाजप्रवाहातील साचलेपणा दूर करून आपल्या संस्कृतीला काळाबरोबर वाहते ठेवत असतात. या ज्ञानी लोकांना विरोध करणारेही असले तरी ज्ञानी लोक मात्र आपल्या विरोधकांना हीन लेखत नाहीत. कारण, हा विरोध अज्ञानातून आलेला आहे याची त्यांना जाण असते. तसेच हे ज्ञानी लोक ‘काही गोष्टी चुकीच्या आहेत' या कारणाने संपूर्ण जीवनदृष्टी चुकीची ठरवत नाहीत व संपूर्ण संस्कृतीचा पायादेखील भुसभुशीत करत नाहीत.हे सगळे विवेचन करण्याचे कारण की, *आजच्या हिंदू समाजाची अस्वस्थता* हीच आहे. इंग्रजांच्या आगमनासोबत भारतात आलेला, *पाश्चिमात्य पुढारलेपणाचा दृष्टीकोण व त्याधारे भारतीय संस्कृतीला हीन लेखण्याची मनोवृत्ती* हे घटक विद्यमान हिंदू असंतोषाचे जनक आहेत. हिंदू धर्म व त्यायोगे भारतीय संस्कृतीमधे मध्ययुगात अस्तीत्वात असलेल्या बहुतांश चुकीच्या संकल्पना काळाच्या ओघात कधीच्याच मागे पडल्या आहेत. हिंदू व भारतीय सामाजाने काळाप्रमाणे आपल्यात बदल केले आहेत. असे असतांनाही 'काहीच घडले नाही’ या आविर्भावात समाजातील काही घटक हिंदू धर्मावर अखंडपणे अश्लाघ्य टीकाटिपण्ण्या करून असंतोष पसरवत आहेत.असंतोष पसरवणारे हे घटक भारतात बऱ्याच शतकांपासून अस्तीत्वात असले तरी, त्यांची मानसिकता लोकांपर्यंत पोहोचण्याला मर्यादा होती. कारण, विचार प्रसिद्ध करण्याचे कालपर्यंतचे महत्वाचे माध्यम असणार्‍या प्रिंटमीडिया व पुस्तकांमध्ये लिहिलेले शेवटी प्रत्यक्ष छापले जात असे. साहजिकच ते प्रसिद्ध करणार्‍याला जबाबदारीची जाणीव व कायद्यांची भीती होती. आजच्या काळातील सोशल मीडियाने मात्र या सर्व मर्यादा जवळपास काढून टाकल्या आहेत. आपले विचार प्रसारित करण्याचे 'मोबाइल' हे अतिशय सोपे साधन उपलब्ध झाल्यापासून लिहिणारे सहज मोकळे व्हायला लागले आहेत. परिणामी, आजच्या काळात लिहिणार्‍यांची व जे काही बरे-वाईट लिहिले जात आहे ते नजरेसमोरून घालवणार्‍या वाचकांची संख्याही अमर्यादित प्रमाणात वाढते आहे. याचा फायदा घेऊन भारतीय समाजव्यवस्था उध्वस्त करू पाहणार्‍या अनेकानेक देशी-विदेशी शक्ति, लिहिणार्‍या डोक्यांना दिशा देण्याचे कार्य करत आहेत. या ‘विघातक शक्तींची कार्य करण्याची पद्धत कशी आहे’ हा समजावून घेण्याचा विषय असून, त्याचे होणारे भयंकर परिणाम रोखण्यासाठी काय करता येईल, हा स्वतंत्र चर्चेचा भाग आहे. पुढच्या विविध लेखांद्वारे आपण या सर्व बाबींवर चर्चा करूच, पण *त्याआधी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी हिंदूंच्याच प्रतिकांना का निवडले जाते?' याप्रश्नाचे जे उत्तर डॉ. दाभोलकरांनी आपल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर चर्चा करूया.*या प्रकारचा प्रश्न डॉ. दाभोलकरांना याआधीही विचारला गेला असेल, त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात की, “समिती अंधश्रद्धांची जी प्रकरणे लढवते, त्या प्रकरणांतील बहुसंख्य प्रकरणे हिंदूंची असतात, हे खरे आहे. याचे कारण असे आहे की, भारतात 82 टक्के हिंदू धर्मीय लोक आहेत. याचाच अर्थ असा, समितीने लढवलेल्या प्रकरणांतील साधारणपणे 82 टक्के प्रकरणे हिंदूंचीच असणार आणि त्यामुळे ती बहुसंख्येने दिसतात.”डॉक्टरांचे वरील म्हणणे मला व्यक्तिश: अगदी 100 टक्के मान्य आहे. आता याच सत्यतेचा आधार घेऊन हे ही सिद्ध होते की, जेंव्हा 82 टक्के प्रकरणे हिंदूंची असतील अशावेळी अंनिसच्या कार्यामुळे जे लोक अस्वस्थ होतात, त्यांच्यात जास्तीत जास्त प्रमाण हिंदूंचे असेल व अंनिसला विरोध असणार्‍या इतर धर्मियांचे प्रमाण तितकेसे मोठे असणार नाही. कारण, हा फक्त लोकसंखेच्या टक्केवारीमूळे दिसणारा फरक आहे.याचा दुसरा अर्थ असा की, इतर धर्मियांच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धांचे इतक्याच मोठ्या प्रमाणात व सातत्याने अशाच प्रकारे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याकडून अंनिसला होणार्‍या (कदाचित अधिक कट्टर) विरोधाची टक्केवारीही तितकीच मोठी असेल. *येथे मुद्दा लक्षात घ्यायचा तो एवढाच की, अंनिसला जे लोक विरोध करतात त्यामध्ये हिंदूंचे प्रमाण जास्त दिसण्याचे कारण हिंदू लोकसंखेची बहुलता एवढेच आहे. त्यामुळे, अनिंसला होणाऱ्या विरोधाची टक्केवारी ही हिंदू धर्माशी निगडित समस्या नसून, हा फक्त तुम्ही ज्यांच्या भावनांशी खेळता आहात, त्या लोकांच्या लोकसंख्येचा प्रश्न आहे.*आता आपण जरा आणखी गहण विश्लेषणाकडे जाऊया. हिंदूंसमोरचा सर्वात मोठा प्रश्न असा की, "मुळात अनिंसवाले हिंदू समाजाशी निगडीत प्रकरणांवरच मोठ्या प्रमाणात बोट का ठेवतात ? त्यांना इतर धर्मियांच्या अंधश्रध्दा दिसत नाहीत का ?" या प्रकारच्या प्रश्नाचे जे उत्तर डॉ. दाभोळकरांनी दिले आहे ते आपण आधी सविस्तरपणे पाहू. या प्रकारच्या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना डॉक्टर म्हणतात की, 'समाजात आजही एका धर्माच्या अंधश्रध्देबद्दल दुसऱ्या धर्मातील लोकांनी बोललेले चालत नाही. एवढेच नव्हे, तर एका जातीतील अंधश्रध्देबद्दल दुसऱ्यांनी बोलले तरी प्रक्षोभ होतो. समाजात 82% लोक हिंदू आहेत. याचा अर्थ 'अनिंस'मधील कार्यकर्त्यांची किमान तेवढी संख्या हिंदूंची असणार. स्वाभाविकच या हिंदू कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या अंधश्रध्दांबद्दल बोलणे ही बाब मुसलमानांना रुचत नाही."वाचकांनो, *वरील विश्लेषण करताना डॉक्टरांनी एक गंभीर चूक केली आहे*, ती आपण समजून घेतली तर 'हिंदू धर्म व हिंदू मानसिकता समजून न घेण्याचा’ जो घातक परिणाम भारतीय समाजावर मागच्या काही शतकांपासून होत आहे, तो यापुढे होऊ नये म्हणून प्रयत्न करता येतील. *"समाजात 82% लोक हिंदू आहेत. याचा अर्थ 'अनिंस'मधील कार्यकर्त्यांची किमान तेवढी संख्या हिंदूंची असणार" असे समजणे म्हणजे निव्वळ गैरसमज आहे* आणि तो निर्माण होण्याचे कारण म्हणजे, वरील विश्लेषण करताना ‘हिंदू धर्माच्या एका अनोख्या वैशिष्ट्याचा विचार करण्यात आलेला नाही. (येथे हिंदू धर्म या संकल्पनेअंतर्गत ‘भारतात उदयास आलेले सर्व धर्म/ पंथ/ संप्रदाय’ असा अर्थ गृहीत आहे. कारण, या विभिन्न मत-मतांतरच्या लोकांच्या मानसिकतेमध्ये/ आचार-विचारांमध्ये तसेच जीवनपद्धतीमध्ये ‘समरसतेची भारतीय समानता’ आहे.)अंनिस कार्यकर्त्यांच्या एकूण संख्येमधे हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांची संख्या 82% एवढी प्रचंड असेलही. परंतू ती तितकी असण्याचे कारण डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे ‘भारतीय लोकसंख्येतील हिंदूंचे जास्त प्रमाण’ एवढेच असल्याचे समजणे म्हणजे अतिशय *गंभीर चूक* आहे आणि हीच चूक आपण सगळे आतापर्यंत धर्मनिरपेक्षता व राष्ट्रवादासारख्या संकल्पना समजावून घेतानासुद्धा करत आलो आहोत. ही चूक ‘भारतीय समाजाकडे पाश्चात्य चश्म्यांतून बघण्याचे प्रशिक्षण मिळाल्याने’ होत आलेली असून, ती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला ‘स्वत:कडे स्वत:च्या नजरेतून बघणे’ पुन्हा एकदा शिकावे लागेल.*कोण आहोत आपण हिंदू ?*- ‘कोःहं ?’ या प्रश्नापासून ‘तत्वमसि’ आणि ‘अहं ब्रम्हास्मि’ या उत्तरांपर्यंतचा प्रवास उपनिषदांच्या काळातच पूर्ण करणारे आपण हिंदू आहोत.- ‘चार आर्यसत्यांद्वारे’ मानवी जीवनाच्या दु:खाचे संपूर्ण वैज्ञानिक विश्लेषण करून ‘अप्प दीपो भव:’ हा मार्ग सांगणार्‍या भगवान गौतम बुद्धाची वाट अनुसरणारे आपण हिंदू आहोत.- जगातल्या सर्वात मोठ्या अशा ‘णमोकार’ मंत्राचे उच्चारण करणारे आपण हिंदू आहोत.- गुरु नानक देव यांच्या ‘एक ओंकार सतनाम’ या मूलमंत्राचे पठण करणारे आपण हिंदू आहोत.- सकल प्राणिमात्रांसह चराचर सृष्टीचे ‘अंतिम गंतव्य’ एकच असून तिथपर्यंत पोहोचण्याचे ‘मार्ग भिन्न-भिन्न’ आहेत हे तत्व मान्य करणारे आपण हिंदू आहोत.- *‘सर्वसमावेशकता हे पूर्णपणे अनोखे तत्वज्ञान जन्मजातच रक्तात भिनलेले आपण हिंदू आहोत. ‘कुठल्याही विरुद्ध मताचा स्वीकार करणे/ आदर राखणे’ हे हिंदू म्हणून आपले संपूर्ण पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय असे वैशिष्ठ्य आहे.* या विशिष्ट तत्वामुळेच कुठल्याही नव्या किंवा क्रांतिकारी विचाराचा सहज स्वीकार करणारे लोकसुद्धा हिंदूच असल्याचे दिसून येते. या अनोख्या वैशिष्ट्यामुळे अगदी विरुद्ध मतांचा पुरस्कार करणार्‍यांमध्येही हिंदूच आघाडीवर दिसतात. अगदी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या एकूण संख्येमधे हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांची संख्या एवढी प्रचंड दिसते ती सुद्धा यामुळेच. ही संख्या जास्त दिसण्याचा संबंध हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी फार अधिक नसून त्यांच्या खुल्या मानसिकतेशी जास्त आहे. शेवटी डॉ. दाभोलकरांनी आपल्या विश्लेषणात म्हटल्याप्रमाणे ‘'हिंदू कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या अंधश्रध्दांबद्दल बोलणे ही बाब मुसलमानांना रुचत नाही." हे ही खरेच. कारण ‘सर्वसमावेशकता’ हे अनोखे तत्वज्ञान हिंदू सोडून इतर कुठल्याही धर्माकडे नाही. तसेच तिथे, इतरांच्या मतांचे ‘खंडण-मंडन’ करण्याची परंपराही अस्तीत्वात नसून सरळसोट तलवारींची भाषा आहे. त्यामुळेच, ‘आपापल्या धर्माच्या ईश्वरी मान्यतांवर बाळबोध आघात करत आपल्या धर्मात निर्माण झालेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याची प्रेरणा’ हिंदू नसणार्‍या इतर धर्मीय व्यक्तीच्या मनात एकतर जन्म घेत नसावी किंवा घेतली तरी ती राबवण्यासाठी त्या व्यक्तीची हिम्मत होत नसावी.थोडक्यात सांगायचे तर ‘अंनिस’मधे असणार्‍या माझ्या बांधवांनो, ‘तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली फक्त आणि फक्त हिंदू धर्माला बडवण्याचाच ढोंगीपणा यापुढेही असाच करत रहाणार आहात. इतर धर्मातील अंधश्रध्दांवर तुम्ही ठेवलेले बोट कायमच ताटातल्या चिमूटभर मिठापुरते म्हणजे फक्त दाखवण्यापुरते मर्यादित रहाणार आहे. कारण, तुम्हाला इतर धर्मीय कार्यकर्ते हव्या तेवढ्या प्रमाणात मिळणारही नाहीत आणि इतर धर्मांतील अंधश्रद्धांवर इतके सलग प्रहार करण्याची तुमची हिम्मतही कधीच होणार नाही.’परंतू*‘आपण जे काही करतो आहोत त्यालाच फक्त विवेक म्हटले जाते अशी तुमचीही अंधश्रद्धाच आहे’* एवढे मात्र निश्चित.तसेच,बहुधर्मीय भारतात ‘सतत हिंदूंच्या अंधश्रद्धांवर बोट ठेवून आपण फार मोठी समाजसुधारणा घडवून आणत आहोत’ हा ही तुमचा गैरसमजच म्हणायचा.असो.या लेखात, *अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी असलेल्यांमधे हिंदू कार्यकर्त्यांची संख्या मोठी असण्याचे कारण, लोकसंख्येच्या बहुलतेशी जोडणे म्हणजे निव्वळ गैरसमज असल्याचे व हिंदू कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येचे कारण हिंदूंच्या खुल्या मानसिकतेशी निगडित असल्याचे आपण पाहिले.**अंतस्थ जाणीवांची एकसमान आस्था असणार्‍या भारतीयांचा स्वभाव* आपण ‘नाण्याची एक बाजू’ या पुढच्या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करूया व त्यानंतर ‘भारतासमोरील वर्तमानाचे सर्वात मोठे आव्हान’ काय आहे यावर चर्चा करूया.

अविवेक अंनिसचा - ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची - 3)
 12 April 2019  
Art

अविवेक अंनिसचा - ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)----------------------------------------by - योगेश रंगनाथ निकमऔरंगाबादYogeshnikam1303@gmail.com06 डिसेंबर 2018याआधीच्या लेखात आपण, “अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?” या मुख्य प्रश्नाच्या आधारे निर्माण होणार्‍या उप-प्रश्नांची उकल केली, तसेच वरील प्रश्न विचारणार्‍या हिंदूंना “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या चौकटीत बसवणे चुकीचे कसे आहे ते सुद्धा पहिले.आता आपण “अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?” हा प्रश्न विचारण्यामागे जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण मागच्या लेखात पाहिलेले, ‘महाराष्ट्रातील जिंतूर येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभुमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला, तसेच त्यावेळी सामिष व निरामिष भोजनाचा आस्वाद घेतला’ हेच उदाहरण पुन्हा समोर ठेऊ. अंनिसद्वारे हा कार्यक्रम घेतल्यानंतर बहुतांश हिंदू लोकांमध्ये ज्या भावना निर्माण झाल्या, त्यातील फक्त तात्विकदृष्ट्या चर्चेस योग्य असलेल्या भावना शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे.1. समजा, (हे फक्त समजायचे आहे. ईश्वरकृपेने कुणावरही वाईट प्रसंग न येवो) ज्या लोकांनी स्मशानभूमीत जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला, त्या व्यक्तींच्या घरातल्या जवळच्या माणसाचा मृत्यू होऊन अंत्यविधी झालेला आहे. अशावेळी हे लोक अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अंत्यविधी झालेल्या ठिकाणी एखादा असाच शाकाहारी – मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम ठेवणार का? ठेवला तर त्याचा मोठा गाजावाजा करून प्रसिद्धी करणार का?ते असे काही करणार नाहीत अशी अपेक्षा आहे व त्यांनी असे काही करूही नये, अशी त्यांना एक मानव म्हणून विनंतीसुद्धा आहे. कारण असे केल्याने कुठलीही विज्ञाननिष्ठता सिद्ध होणार नसून, फक्त भावनाहीन अविवेकाचेच प्रदर्शन होईल. तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ज्यावेळी जिंतूरच्या स्मशानभूमीत असा उपद्व्याप केला गेला, त्यावेळी इतर कुणाच्यातरी जिवलगांच्या निधनामुळे त्याचवेळी स्मशानात अंत्यसंस्कार होत असतील किंवा अंनिसचा कार्यक्रम होण्याच्या थोडावेळ आधी झालेले असतील किंवा या कार्यक्रमानंतर झाले असतील. त्या इतर कुणाच्यातरी भावनांचे काय? ज्याच्या जाण्यामुळे एखाद्याला दु:ख झाले आहे अशा गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाजूला जळत असताना, कुणीतरी बिनबुडाचा आनंद मिळवण्यासाठी शेजारीच बसून जेवत असल्याचे बघून त्या मृत व्यक्तीच्या आप्तेष्टांना काय वाटले असेल?इथे मी मृताच्या भावनांबद्दल बोलत नाहीये. जीवंत हाडामासांच्या माणसांबद्दलच हे सगळे चालले आहे. त्यामुळे यापुढे ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली’ ‘वाढदिवस, काव्यमैफिल’ अशा प्रकारे स्मशानाशी संबंध जोडण्याआधी थोडा विवेकी विचार केला जाईल अशी रास्त अपेक्षा आहे. बाकी आनंद साजरा करण्याबाबत कुणाचेही दुमत नाही. परंतु तो कुठे? कधी? कसा? साजरा करावा याविषयी काही सामाजीक बंधने मानवाने स्वत:च्या विवेकाने स्वत:वरच घालून घेतलेली आहेत. समाजभान असणार्‍यांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. तशी अपेक्षा नसेल तर रेव्ह पार्ट्यांवर धाडी घालण्यात तरी काय अर्थ आहे? ते लोकही त्यांचा आनंदच साजरा करत असतात की. आजच्या काळात ज्या हक्काबद्दल मोठया आवाजात ओरडून सांगितले जाते, त्या ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या हक्काचा उपभोगच तर हे लोक घेत असतात. याव्यतिरिक्त, ‘सामाजीक बंधने पाळली पाहिजेत, या समाजमनावर असलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचे कार्य आपण करत आहोत’ अशी या लोकांची श्रद्धा असल्यास त्यात चूक काय ठरेल?2. ‘हिंदू स्मशानभूमीत’ हा प्रकार घडला असल्याने त्याविरोधात बोलणारे बहुतांश लोक हे हिंदुच असणार हे उघड सत्य आहे. इतर धर्मीय मृतांचे अंत्यविधी जेथे केले जातात अशा ठिकाणी जर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असता तर याच प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या का? ‘आल्या नसत्या’ असे ज्यांना वाटत असेल त्यांनी प्रयोग करून पाहायला व आपल्या प्रयोगाच्या मोठमोठ्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करून आणायला हरकत नाही. अर्थात, आम्ही हिंदू असल्याने आम्हाला इतर धर्मीय बांधवांच्या श्रद्धांविषयी आदर आहे व त्यामुळे वरील प्रयोग एक आव्हान म्हणून स्वीकारण्यास आम्ही कुणालाही सांगत नाही आहोत.3. हिंदू धर्मात आत्मा मोक्षपद मिळवून किंवा पुनर्जन्म घेण्यासाठी, निघून गेल्याने मृत झालेल्या देहांवर अग्निसंस्कार केला जातो. उरणारी राख सुद्धा वाहत्या पाण्यात विसर्जित केली जाते. त्यानंतर मानवाचे या भूतलावर भौतिकदृष्ट्या काहीच उरत नाही. जे काही उरते ते त्या मानवाने केलेल्या कार्याच्या व बर्‍या-वाईट आठवणींच्या स्वरूपात उरते. असे असताना हिंदू स्मशानभूमीत भूते - खेते तरी कुठून सापडणार?जर अंनिसचे कार्य ‘भुता - खेतांबद्दलची जनमाणसात असलेली भीती व अंधश्रद्धा घालवणे’ यासाठीच असेल, तर त्यांनी ज्या ठिकाणी मृतदेह पुरले जातात अशा अंत्यविधीस्थळी जाणे उचित ठरणार नाही का? तेथे किमान जमिनीखाली पुरलेले मृतदेह तरी बर्‍यावाईट अवस्थेत अस्तीत्वात असतात. याव्यतिरिक्त, ‘न्यायाच्या दिवसापर्यंत तेथेच शांतपणे पडून राहण्याची संकल्पनाही आहेच.’ त्यामुळे, आपापल्या देहासह आत्मा किंवा असेच काहीतरी जिथे थांबून आहे, तेथे जाऊन आपले प्रयोग केल्यास ते अधिक सिद्धतेने मांडता येतील, असे अंनिसवाल्यांना वाटत नाही का?बरं हे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही योग्य होईल. कारण, ‘जेथे काहीच शिल्लक उरत नाही’ अशा ठिकाणी जाऊन ‘तेथे काहीही, अगदी भूतेही नाहीत’ हे सांगण्यात काय विशेष व वेगळेपण आहे? याउलट, ‘जेथे अजून बरेचसे काही शिल्लक आहे’ अशा स्थळी प्रयोग करून ‘तेथे काहीही नाही’ हे सिद्ध करून दाखवण्यात खरा वैज्ञानिक शहाणपणा नाही का?पुन्हा एकदा हिंदू म्हणून इतर धर्मियांच्या श्रद्धांबद्दल संपूर्ण आदर व्यक्त करत, आम्ही कुणालाही असे प्रयोग करण्याबद्दल आव्हान देत नाही. कारण आमच्या दृष्टीने यातून सकारात्मक असे काहीही सध्या होत नसून, मानवी बुद्धीचा अविवेक फक्त दिसून येतो.4. ‘स्मशानभूमीत भूत, प्रेत, आत्मे भटकत असतात अशा भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी’ जर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानात भोजन घेतले असेल तर, आणखी एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, भूत-खेतांच्या कल्पना फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत का? माझ्या माहितीनुसार तरी त्या सर्वच धर्मांमद्धे समान आहेत. विविध धर्म-पंथांमधील लोकांमधे देवाच्या संकल्पनेत जरी भेद असले तरी, भूतांवर एकमत आहे. कुणाचीही भूते प्रार्थनास्थळांमधून बाहेर न पडता अंत्यविधीच्या म्हणजे स्मशान, कब्रस्तान, सिमेंट्री इत्यादी स्थानांमधेच वास करत असल्याचे समजले जाते. अर्थात, मी भूतांचा जाणकार व समर्थक नाही आणि समर्थन द्यावे असे सांगण्यास मला कुणाचेही भूत आतापर्यंत भेटलेले नाही. पण मी कादंबऱ्यांमधून या संकल्पना वाचल्या आहेत, मराठी-हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून पाहिल्या आहेत. आपणासही भूतांचा एवढाच आणि असाच असाच अनुभव असेल.सांगायचे एवढेच की, जर भूतांचा प्रश्न हा एवढा वैश्विक आहे तर मग 'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी स्मशानभूमीसारख्या हिंदू प्रतिकांनाच का निवडले जाते?' हा हिंदूंचा साधा सरळ व स्वच्छ प्रश्न आहे.  येथे आपणाला अंनिसच्या कार्यामुळे काही हिंदूंमध्ये जी अस्वस्थता पसरते त्या अस्वस्थतेच्या कारणांपैकी एक कारण मिळते. ते कारण म्हणजे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नेहमी नेहमी हिंदूंच्याच प्रतिकांचा आधार घेतला जातो’ हे होय.स्मशानभूमीतील वाढदिवसाच्या उदाहरणाचा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की, हिंदूंची अस्वस्थता योग्य आहे. कारण, इतर धर्मांच्या प्रतिकांचा आधार घेऊनही याच प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे उदाहरण देता आले असते, परंतु तसे झालेले नाही. या गोष्टींचा सुप्तरित्या होणारा परिणाम असा की, जेव्हा योग्य कारणासाठी हिंदू प्रतिकांचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन केले जाते तेव्हाही बर्‍याचश्या हिंदूंना ते अन्यायपूर्ण वाटू लागते. आता असे वाटणे योग्य की अयोग्य याचा काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ‘अन्यायाची भावना निर्माण होऊ नये’ यासाठी काय करता येईल? याचा विचार करायला हवा. कारण, ‘अन्याय होतोय असे वाटणे’ हे वर्तमानात मोठ्या प्रमाणात जाणवणारे सत्य आहे व ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य’ यापुढेही पूर्वीच्याच प्रकारे चालू राहिल्यास ही भावना आणखी वाढत जाऊन त्याचे अजून विपरीत परिणाम दिसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या अनिष्ट परिणामांपासून आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवण्यासाठी ‘आज, विचार करायला हवा’.असो.'अंधश्रध्दा निर्मुलनासाठी हिंदूंच्याच प्रतिकांना का निवडले जाते?' याप्रश्नाचे उत्तर डॉ. दाभोलकरांनी आपल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, हे उत्तर परिपूर्ण आहे असे मला वाटले नाही. कारण, ते उत्तर देताना हिंदू धर्माच्या एका अनोख्या वैशिष्ट्याचा विचार केलेला नाही. हे वैशिष्ट्य जगातील सर्व धर्मांच्या पाठी फक्त हिंदू धर्मामध्येच आहे आणि म्हणून ते ‘एकमेवाद्वितीय’ आहे. आपण या वैशिष्ट्याचा, त्याच्या सौंदर्याचा व त्या अनुषंगाने वरील प्रश्नासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या उत्तराचा ऊहापोह, पुढील लेखात करू.तत्पूर्वी, याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?’ असा प्रश्न विचारणार्‍यांकडे “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या चौकटीतून पाहणे ‘अविवेकी’ कसे आहे हे स्वत:लाच आणखी सुस्पष्टरित्या कळावे म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांना पुढील अनोखा प्रयोग करता येईल. खरेतर मरणोत्तर देहदानाची इच्छा व्यक्त करणारा फॉर्म मी भरलेला आहे. परंतू, भविष्यात हा प्रयोग करायचा असल्यास, माझा हा लेख म्हणजे कायदेशीर प्रमाण मानून माझा मृतदेह अंनिस कार्यकर्त्यांच्या हवाली करण्यात यावा. तसेच ते माझ्या मृतदेहाशी जे काही करतील करतील त्याला ‘विटंबना न मानता वैज्ञानिक प्रयोग मानण्यात यावा’ अशी इच्छाही मी व्यक्त करत आहे त्यामुळे या प्रयोगामुळे कुणीही आपल्या भावना दुखावून घेऊ नयेत. मी माझ्या घरच्यांनाही तसे सांगून ठेवतो व त्यांच्याकडून या प्रयोगात काहीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो.‘स्मशानात जेवणे’ म्हणजे खरेच ‘अंधश्रद्धेचे निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोण रुजविणे’ असेल तर मग, जे भोजन ग्रहण करायचे आहे ते स्मशानातच तयार करण्यास तरी काय अडचण आहे? ते ही तिथेच उपलब्ध होणार्‍या अग्नीवर? अंनिसवाल्यांनी माझ्या चितेवरच भांडी ठेऊन त्यात आपले भोजन शिजवले व ग्रहण केले, तर पुढे ‘असे केल्याने माझ्या भुताची बाधा झाली नाही’ हे त्यांना वैज्ञानिकरित्या सिद्ध करता येईल. आणि मांसाहारच करायचा असेल तर बाहेरून मांस तरी कशाला आणायचे? माझाच मृतदेह त्यासाठी वापरता येईल की. वैज्ञानिकदृष्ट्या मांस शेवटी मांसच असते. मग ते एखाद्या कोंबडीचे असो अथवा दुसर्‍या एखाद्या प्राण्याचे असो वा माझे असो. त्याचा चवीष्ठपणा जवळपास सारखाच असेल, नाही का?वाचकांनो आणि विशेषत: अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, वरील प्रयोगात वैज्ञानिकदृष्ट्या काहीही अनुचित नाही. प्रश्न आहे तो फक्त मानव म्हणून आपल्याकडे असणार्‍या विवेकाचा. इतरांच्या विवेकाला साद घालण्याचा आपलाच मार्ग तर अविवेकी नाहीये ना? हे तपासायला हवे. कारण, आपण सध्या प्रयोगशाळेत ‘पेशी’ तयार करू शकतो त्यामुळे भविष्यात प्रयोगशाळेतच एखादा जीवंत माणूसही निर्माण करू शकतो, असे समजण्यास वाव असला तरी प्रश्न ‘आपण तसे करावे की न करावे एवढाच आहे’ आणि हा ज्याच्या त्याच्या ‘विवेकाचा’ किंवा ‘अविवेकाचा’ प्रश्न आहे. तो प्रत्येकाने आपापलाच सोडवायला हवा.

एकांगी दृष्टीकोण अंनिसचा ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)
 12 April 2019  
Art

एकांगी दृष्टीकोण अंनिसचा ("चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची)----------------------------------------by - योगेश रंगनाथ निकमऔरंगाबादYogeshnikam1303@gmail.com01 डिसेंबर 2018ही लेखमाला लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करतेवेळी उल्लेख केल्याप्रमाणे, आपण ‘तिमिरातुनी तेजाकडे' या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाच्या आधारे “चौकट" अंधश्रध्दा निर्मुलनाची समजावून घेण्याचा, तसेच त्या अनुषंगाने “हिंदू धर्मीयांमधील अस्वस्थतेच्या कारणांचा शोध" घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रयत्न मुख्यत्वे, ‘जे हिंदू दाभोलकरांच्या कार्याने अस्वस्थ होत होते' त्यांची मानसिकता समजून घेण्याचा आहे‌. यातीलही बहुतांश हिंदू हे, ‘समाजातील बुवाबाजी तसेच लोकांना फसवणाऱ्या रस्त्यावरच्या भोंदू बाबांपासून ते पंचतारांकीत गुरूंविरोधात डॉ. दाभोलकरांनी जे कार्य चालवले होते त्याच्या विरोधात नव्हते' तसेच 'ते सुशिक्षित, विवेकी आचरण करणारे असून भडकवले जाण्याच्या कक्षेपलीकडे होते' हे पक्के ध्यानी धरावे लागेल. अन्यथा आपण, ‘मनामनात दाटलेली अस्वस्थता आणि प्रत्यक्षरित्या होणारा टोकाचा विरोध’ यात सरमिसळ करून बसू. गुंता होण्याची जिथे शक्यता आहे ती जागा आधीच हेरून ठेवल्यानंतर, आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूयात. ‘हिंदू समाजातील काही लोक, जर डॉ. दाभोलकरांच्या कार्याने अस्वस्थ होत होते, तर या अस्वस्थतेमागची कारणे नेमकी काय होती?’ चला, एकेक गाठ सोडवायला घेऊयात.डॉ. दाभोलकरांच्या 'तिमिरातुनी तेजाकडे' या पुस्तकाच्या 'विचार' या भागात एक प्रकरण ‘अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?’ या प्रश्नावर आधारीत आहे. याच प्रकरणापासून आपण सुरवात करणार आहोत.वरील प्रश्नाचा संदर्भ देऊन डॉ. दाभोलकरांनी, “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात येतो.” या मांडणीची चौकट उभारली आहे. जे या चौकटीतून वरील प्रश्नाकडे पहातील, त्यांना डॉक्टर जे म्हणताहेत ते 100% खरे वाटेल.पण,डॉ. दाभोलकरांच्या चौकटीमुळे,A. वरील प्रश्न विचारण्यामागील मानसिकता एवढीच आणि अशीच असते का?B. वरील प्रश्न विचारणारांवर एकांगी दृष्टीकोणाची चौकट तर लादली गेली नाही?C. वरील प्रश्न विचारणाऱ्यांना सरळ सरळ एकाच चौकटीत बसवून त्यांच्यावर अन्याय तर केलेला नाही? आणिD. अशाप्रकारे 'एकच प्रश्न विचारणाऱ्या विविध मनोवृत्तीच्या लोकांना एकाच चौकटीत बसवले जात असेल' तर हा अवैज्ञानिक व अविवेकी दृष्टीकोण नाही का?हे उप-प्रश्न निर्माण होतात. या उप-प्रश्नांना खालील उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया व त्यानंतर मुख्य प्रश्नाकडे वळूया.काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील जिंतूर येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभुमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला तसेच त्यावेळी शाकाहारी व मांसाहारी भोजनावर आडवा हात मारला. आपण केलेल्या या कार्याची बातमी त्यांनी विविध वृत्तपत्रांतून छापूनही आणली. बातमीमध्ये साधारणपणे असे म्हटले होते की, ‘स्मशानभूमीबाबत समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हे कार्य केले गेले.’अर्थातच, अनेक लोकांच्या बुद्धीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे कार्य पटले नाही. त्यांनी त्याविषयी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीचे शुद्धीकरण केले गेले तसेच अंनिसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले गेले. या सगळ्या घडामोडींचा आपल्या तात्विक चर्चेशी विशेष संबंध नाही. पण या उदाहरणाद्वारे निर्माण होणारे खालील प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत व त्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे.1. ‘स्मशानभूमीत जाऊन भोजन घेतल्याने आपली स्मशानाविषयीची अंधश्रद्धा दूर झाली’ हे आपण एकवेळ सत्य जरी मानले, तरी त्याने काय साध्य होईल? तुम्ही व मी आपल्या मुलाबाळांसोबत, पाच-पंचवीस नातेवाईक जमवून एखाद्या सुटीच्या दिवशी स्मशानात जाऊन सहभोजन घेणार आहोत का? की एखाद्याच्या डोक्यात उद्या स्मशानात चमचमीत व खमंग पदार्थांचे हॉटेल उघडण्याचा विचार निर्माण होईल? त्या हॉटेलची जाहिरात कशी असेल? ‘भीती सोडून भूताची, चव घ्या कोंबडीची’ अशी?खरे तर मानवाचा विवेक जोपर्यंत जागृत आहे, तोपर्यंत असे काहीही होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशनातील भोजनाच्या अशा कितीही पंगती उठवल्या, तरी त्याचा स्मशानाला पिकनिक स्पॉट बनवण्यासाठी काहीही उपयोग नाही.2. घरात प्रेत असताना ते टिकवून ठेवण्यासाठी, त्यावर सतत औषधी तेल चोळण्याची प्रथा पूर्वीपासून बहुतांश समाज/धर्मांमधे अस्तीत्वात आहे. आज शितकरण पेट्या घरी आणून नातेवाईक येईपर्यन्त मृतदेह टिकवून ठेवला जातो. येथे हा, टिकवून ठेवणे शब्द फार महत्वाचा आहे. कारण त्यामागे, ‘प्राण निघून गेलेला देह हा ताबडतोब सडायला सुरवात होते’ हे वैज्ञानिक कारण आहे. असा सडत चाललेला मृतदेह घरात असताना काही खाण्याची इच्छा मानवाला होत नाही, हे त्याच्या आंतरिक जाणीवेतून आलेल्या सुजानतेचे लक्षण आहे. मग तोच मृतदेह ज्या ठिकाणी नेऊन जाळला किंवा पुरला जातो अशा ठिकाणी, म्हणजे “स्मशानात” जाऊन खाण्यापिण्याची भावना त्याच्या मनात निर्माण होणे शक्य आहे काय?3. स्मशान.. जाणे अपरीहार्य असले, तरी ज्या ठिकाणी मनुष्य जाऊ इच्छित नाही अशी जागा. इतरांसाठी का होईना जेंव्हा तिथे जावे लागते तेव्हा कुठल्याही साधारण मनुष्याच्या ठिकाणी, क्षणभरासाठी का होईना वैराग्याची भावना जन्म घेते. पण, प्रत्येकजण हा काही या भावनेने प्रेरित होऊन लगेच संसार सोडून वैराग्याच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्याने जाऊही नये. मुद्दा असा की, सारखे सारखे स्मशानात जात राहिल्याने “वैराग्य भावना” वाढीस लागून, जास्त लोक त्यांची संसारीक कर्तव्ये सोडून भटकत फिरायला लागतील, ज्यामुळे, कुठल्याही समाज व्यवस्थेचा सुरळीत गाडा विस्कळीत होऊ शकतो. म्हणूनच सर्व जाती/ धर्म/ पंथ/ संप्रदायातील मानवांनी आतापर्यंत स्मशानापासून दोन हात लांब अंतर राखले असावे. हे एवढे साधे तत्वज्ञान आहे.काळाच्या प्रवाहात गावाबाहेर असलेली स्मशाने आपोआपच गावकूसच्या आत आली आहेत. स्मशानाशेजारी उभ्या राहिलेल्या मोठमोठ्या इमारतींमधे लाखो परिवार संसार करत आहेत. स्मशानासमोरून जाणार्‍या हमरस्त्यांवर न थांबणारी वर्दळ वाढली आहे. या सगळ्यातून लोकांची भुता-खेतांविषयी भीती आपसूक नाहीशी झाली आहे किंवा होत आहे. त्यासाठी, विशेष काही कष्ट कुणाला करावे लागलेले नाहीत व करण्याची आवश्यकताही नाही. असे असताना अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावाखाली चाललेले हे उपद्व्याप योग्य आहेत का?4. एखाद्या शहरातल्या हमरस्त्याशेजारी असलेल्या स्मशानातून भूते - हडळी मध्यरात्री बाहेर येऊन रस्त्याच्या मधोमध 'झिंगाट' नाचताना कुणी पाहिली आहेत काय? रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्यात सहभागी होण्यासाठी कुणी खेचून नेत आहे का? का स्मशानजोगी आपल्या स्मशानातल्या जगण्याच्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवून सोडत फिरत आहेत?सांगायचे एवढेच की, स्मशान, त्यातली भूते किंवा स्मशानाशी संबंधीत लोक हे समाजाच्या मनात स्मशानाविषयी अंधश्रध्दा पसरवण्याचे कार्य आजघडीला तरी करताना दिसत नाहीत. (कुणी सांगावे, कदाचित ते अंधश्रध्दा विरोधी कायद्यालाही घाबरत असतील.) मग तरीही स्मशानावर 'अंधश्रध्दा निर्मुलनवाल्यांचे अतिक्रमण' कशासाठी होत आहे?उलट मानवी मनाच्या ठायी असलेल्या 'भिती' या भावनेचा आधार घेत अनेकदा चित्रपट व मालिकांमधून स्मशान, भूते व त्यांच्याविषयीच्या अंधश्रध्दा पसरवून गल्ले भरले जातात. असे असताना, या प्रकारचे चित्रपट व मालिका बनवणारांना 'अंधश्रध्दा विरोधी कायद्याच्या आधारे' चतूर्भुज करण्याचे महान कार्य न करता, माणूस मेल्याशिवाय गपगुमान ओसाड पडून असणाऱ्या स्मशानाच्या व त्यात नसणाऱ्या गरीब बिच्चाऱ्या भूतांच्या मागे अंनिसवाले का म्हणून लागले आहेत?असो.वरील प्रकारच्या विविध प्रश्नांचा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की, या प्रश्नांचा हिंदू धर्माशीच काय, कुठल्याही धर्माशी अजीबातच काही संबंध नाहीये. हे प्रश्न कुठल्याही धर्माच्या लोकांना पडू शकतात.आणि जर असे प्रश्न विविध धर्माच्या लोकांना पडणार असतील तर आपल्याला, लेखाच्या सुरवातीला उपस्थित झालेल्या उप-प्रश्नांचे उत्तर मिळते.A. “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी" वरील प्रश्न विचारलेले नसून कुठल्याही विवेकी मानवाच्या मनात निर्माण होणारे हे साधे सरळ तात्विक प्रश्न आहेत. त्यामुळे,B. “अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामातील समितीच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल लोकमानसात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी प्रश्न उपस्थित केले जातात” असे म्हणून ‘प्रश्न विचारणार्‍यांवर’ एकांगी दृष्टीकोण लादण्याचा हा प्रकार आहे व त्याद्वारे,C. ‘प्रश्न विचारणार्‍यांवर’ अन्याय केला गेला आहे. तसेच,D. विज्ञान भलेही भौतिक जगतातील कुठल्याही क्रियाकलापांचे स्पष्टीकरण देत असेल परंतु, मानवाच्या मनोजगताचे काय? त्याचे उत्तर देणे विज्ञानाला शक्य नाही. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. एकाच घरातील दोन मुलगे A व B हे, त्यांच्या आई-बाबांसोबत रात्री झोपण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये जातात. A सहा वर्षांचा आहे व B त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. रात्री मुलांना झोपवण्यासाठी अंगाई म्हणणे, गोष्ट सांगणे, दरवाजाबाहेरील बागुलबुवाची भीती दाखवणे इत्यादि गोष्टी त्यांच्या जन्मापासून सारख्याच घडल्या आहेत. सकाळी आई-बाबा व A लवकर उठून खाली आलेले असल्यास, उशिरा उठणार्‍या B ला एकटेपणाचे भय वाटत नाही. याउलट हेच A च्या बाबतीत घडल्यास त्याला मात्र एकटेपणाची भीती वाटते. A चे हेच वागणे जेंव्हा तो B च्या वयाचा होता तेव्हाही असेच होते. या उदाहरणाद्वारे निर्माण होणार्‍या, ‘एकाला भीती का वाटते व दुसर्‍याला का वाटत नाही?’ या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर काय असेल? सगळी भौतिक परिस्थिती समान असतानाही हे होत असेल, तर या दोन मुलांकडे कुठल्यातरी एकाच चौकटीतून पाहणे योग्य ठरेल का? विज्ञानामधे एकाच गोष्टीला एकच तत्व लागू होते. उदा. पाणी म्हणजे H2O. पण मनोजगताच्या बाबत असे होत नाही. त्यामुळे एकाला भीती वाटण्याचा जो काही सिद्धान्त असेल तो दुसर्‍याला लागू पडत नाही. तेथे प्रत्येकाकडे असणार्‍या विभिन्न मनांचा सिद्धान्त लागू होतो. त्यामुळे, 'एकच प्रश्न विचारणाऱ्या परंतु विविध मनोवृत्तीच्या लोकांना एकाच चौकटीत बसवले जात असेल, तर हा सुद्धा अवैज्ञानिक दृष्टीकोण आहे,’ हे सहज स्पष्ट होते.आता, ‘हा दृष्टीकोण अविवेकी कसा?’ हे या लेखात विस्तृतपणे स्पष्ट केलेलेच आहे. तरीही हे स्पष्टीकरण अपुरे वाटत असल्यास अंनिसच्या कार्यकर्त्यांना भविष्यात आणखी एक प्रयोग करता येईल. तो प्रयोग कुठला? हे या लेखमालेतील पुढच्या लेखात पाहूया व त्याचवेळी, "अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का?" असा प्रश्न विचारण्यामागे जी अस्वस्थता आहे तिचाही शोध घेऊया.

माझी अस्तित्वाची पाऊलवाट
 18 February 2019  
Art

'माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट'(लेख स्पर्धेतील ऊत्कृष्ट ठरलेला हा लेख)माणसाचं मन अस विचित्र अाणि लोभी असत की देह ठेवला तरी आपल अस्तित्व अापल्या मुला बाळांच्या नातवंड पंतवंडाच्या रुपानी ते शिल्लक राहावं अस वाटतं त्याला. अापलं कुळ आपल गोत्र अापलं घराण चालू राहिलं की मरणोत्तरही  वारसा रुपाने अस्तित्वात असणार आहे अशीअंत्यसमयीची भावना असते.तस तर अापल्या या जगातल्या अस्तित्वावरच आपलं प्रेम असत!म्हणून तर माणूस मरणाला घाबरतो. खर तर अापल्या अस्तित्वाच्या पाऊलवाटेची सुरवात होते ती अापल्या कुटूंबातल्या  अमक्याचा मुलगा / मूलगी या स्थानाने.  अापलं नाव , वडिलांच नाव(यात अाईच नाव अजूनही मधे लावायची प्रथा नाही याचा खेद अाहेच मनात) अाडणावं,आपले कुटूंब, अापली भावंडे या अापल्या  अस्तित्वदर्शक अशा  वाटा, ऊपवाटा पाऊलवाटा असतात असतात.तशी बालपणातली माझी पााऊलवाट फारशी हिरवळीची , मृदू नव्हती मात्र!स्वातंत्र्य प्राप्तीच्या वाटेवर चालताना बालपणीच अाई वडीलांच घर , माया , अासरा  सोडलेल्या ,एककल्ली, तापट अाणि अापलं तेच खरं करायची सवय असलेल्या माणसाच्या शिस्तीत राहण सोप नव्हत माझ्यासाठी! 'मोडेन पण वाकणार नाही'  म्हणून  वारंवार अगदी दर दिवाळीच्या तोंडावर नोकरीवर लाथ मारणार्‍या माझ्या वडिलांना कित्येकदा  अामच केवळ तीन माणसांच कुटूंब पोसणही अवघड जायच. अक्षरश: 'पोटासाठी दाही दिशा' याचा प्रत्यय मला आणि आईला पावलो पावली यायचा.दरवर्षी नवी नोकरी नवं गाव! कुठल्या गावच्या घरात पाणी नाही तर कुठे वीज नाही, कुठे कुडाच्या भिंती तर कुठे शेणामातीची जमीन. त्यात अनेकदा दरमहा काहीतरी नक्की पगार हाती  यावा म्हणून घरापासुन लांब राहून   मिळेल ती नोकरी करणारी अाई! त्यामूळे घरातली स्वयंपाकीण,  मोलकरीण , पाणक्या  सगळ्या भुमिका  लहानपणापासूनच करायची मी. अगदी विहीवरून कावडीनी पाणी भरणं, कोसभर अंतरावरच्या गावच्या हौदावर धुणं पाणी करायला जाण, जमिनी भिंती सावरण, चुलीला पोतेर घालणं,  रोज कंदिल पुसणं , रेशनला रांग लावून निकृष्ट धान्य अाणून त्याचा स्वयंपाक करणं सगळं , या सगळ्या चक्रातूनच लांबवरचु शाळा गाठणं,  अाणि मग जमेल तसा अभ्यास! कष्ट पडले याचं वाईट नाही वाटत मला ! ऊलट या कष्टांनी मला कणखर बनवल. येईल त्या परिस्थितीला धडक मारून ऊलथवून लावायच प्रशिक्षणच होत ते! मला जीवनातल्या  सर्व प्रकारच्या चढ  ऊतारात त्याचा ऊपयोगच झाला! पण एक खंत मात्र कायमची आहे मनात. या विपरीत दिवसांना तोंड देताना ना माझ्या समवेत आई होती ना कोणी पुढच पाठचं भावंड. कुटूंबातील तिघांची  तोंड तीन दिशांना! असो.अापली अशी स्वत:ची वेगळि व ज्याला 'प्रतिमा दर्शक' म्हणता येईल अशी वेगळी पाऊलवाट  अापण चालू लागतो  ती कुटूंबाचं बोट सोडून शालेय शिक्षणाला आरंभ केल्यावर ! आपली शााळा ,तिथले शिक्षक,वर्गमित्र मैत्रीणीसहाध्यायी यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संबंध येऊ लागले की अापलं अस्तित्व अापण कळत नकळत दाखवू लागतो. अंगात फारच  कणखरपणा आणि साहस असल्याने मी शाळेत मात्र बर्‍यापैकी स्वत:ला स्थापीत करायची. अगदी अकरावी मॅट्रिक पर्यंत अाठ गांव अाणि सात शाळांच्या परिसरांत वावरले तरी! कधी खेळ, कधी चित्रकला ,कधी वक्तृत्व , भाषा , नियतकालीक यातून चमक दाखवत! गणित मात्र चांगलाच वीक पाॅईंट!शाळा संपल्यावरच त्याचा पिच्छा सुटला आणि भाषा व साहित्याच्या गळात गळा झाला!शिक्षणक्रम , परिक्षा व तिचा निकाल , खेळ , कला या शिक्षणाखेरीज अन्य व्यक्तिविकास ऊपक्रमात सहभागी होऊन मूल अापलं स्वतंत्र अस्तित्व  विकसित करत असत.    मी माझ्या अस्तित्वाची अन्य मैत्रिणींपेक्षा जरा  वेगळी अशी पाऊलवाट  चालायला लागले ती शाळेबरोबरच  अन्य क्रिडामंडळातील सहभागाने अाणि मुख्य म्हणजे मला घडवणारी 'राष्र्टसेवादल पुणे' या देशप्रेमी, समतावादी व चारित्र्य घडवणार्‍या संस्थेबरोबर! एस .जोशी. ऊर्फ अण्णा , बापुसाहेब काळदाते, भाऊसाहेब मराठे , अनूताई लिमये, ग.प्र प्रधानसर , साधना साप्ताहिकाचे अाधारस्तंभ यदूनाथजी थत्ते , माझी मावशी व  अाधी स्वातंत्र्य सैनिका अाणि नंतर अाजन्म समाजसेविका म्हणुन नव्वदीतही कार्यमग्न असणार्‍या  विमलताई गरूड ,अनेक अादर्श व अांतर्बाह्य पारदर्शी, निर्मळ , देशप्रेमी, समाज बदलू पहाणारी व्यक्तीमत्व! अाम्हा लहान मुलांच बोट धरून अाम्हाला अारोग्य , सभाधीटपणा , कला ,अभिनय , सामाजिक ऊपक्रमात सहभागी करून घ्यायची! त्याग,  समर्पण, सहअनुभूती, जातीभेदाला थारा न देणं, विज्ञाननिष्ठा, समानता असे अनेकानेक  स्ंस्कार या सेवादलानी घडवले माझ्यावर!या अशा वेगवगळ्या वाटा जोडत  द्विपदवीधर होता होता मला माझा मनाजोगता  जोडीदार  निवडता आला! लग्नाला संमती देताना वेगळी जात अाणि शाकाहारी  मौंसाहारी हा मोठा फरक अाईला डाचत होता .पण या वेळी मात्र वडिल  पाठीशी राहिले अाणि संसार  व नोकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू  झाली.शैक्षणिक क्षेत्रातील  नोकरीने अपार आनंद दिला . सरकारी व अनूदानप्राप्त सस्थेतील  आरक्षणाच्या   धोरणामुळे मोठ्या  संधींपासून  वंचित राहवं लागल मात्र! लायकी असुनही पदं मिळाली  नाहीत! पण मी अनेक ऊपक्रम राबवले. मुलांना अनेक प्रकारे घडवता आले.याचं समाधान मोठ आहे. मुलांना  घडवताना मी दैखील घडत गेले. वाचत लिहीत नव शिकत राहिले. कथासंग्रह कविता संग्रह प्रसिद्ध झाले. अनेक बक्षिस अनेक पुरस्कार मिळाले.माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट पुढे  राजमार्ग झाला. दोन्ही मुलं ऊत्तम शिकली. कर्तृत्व गाजवतायत. अाम्हाला ऊभयतांना अाजी अाजोबांच प्रमोशन मिळालं. माझ्या सासुबाई सासरे अाणि माझे अाई वडिल यांच्या बाबतची सारी कर्तव्ये पार पाडण्याची अार्थिक व शाररिक क्षमता देवानी दिली.अाज मितीला अर्धअधिक जग हिंडून  झालय. थरारक खेळाची मजा मी सत्तरीच्या ऊंबरठ्यावरही घेते. अाणि  काय  हव!सपत्तीचा लोभ नसल्याने अनेक गरजुंना व संस्थाना मदत करण्यात व सामाजिक कार्यात सहभागी होतो.अशी ही वाटचाल! अापल्यामागे काय राहिल  कसं राहिल याची चिंता तरी मग कशाला! सर्वेपी सुखीन:संतू  सर्वे  संतू निरामयह: हीच प्रार्थना सर्वांसाठी देवाकडेअंजना कर्णिक, माहिम, मुंबई

प्रपोज
 8 February 2019  
Art

*प्रपोज*भेटलो आम्ही बागेतनजरानजर झालीदोघांनाही एकमेकांचीखूप ओढ लागली.....मनात  आले माझ्याभेटेल  का तो पुन्हा मलादुसर्‍या दिवशी परतगेले पाहायला मी त्याला....अनाहूत   भेट परत  झालीपाहून आम्ही सुखावलोनजरेनच संवाद  साधलादोघेही  खूप आनंदलो...मनात  विचार आलामिळेल का तो मलात्याचीही अवस्था तिच होतीतोही त्याच विचारात दंगला.....भेटू लागलो दोघेही रोजआला प्रीतीला बहरझोंबू लागले प्रीतवारेसर्वांनी रोखली आमच्यावर नजर...भीती  होती मनात तेच झालेआमच्या घरात हो समजलेघरच्यांनी नाहि विरोध केलाआम्हा दोघांनाही समजून घेतले....मग  कााय त्याने  मलासर्वांसमोर मला *प्रपोज* केलेछान सुंदर लाल गुलाब दिलेमी लाजून लाजून लाल झाले...,दोन्ही घरचा होकार आलादोघांच्याही मनाचा  मोरआनंदाने नाचू लागलालग्नाचा सोहळा आमचा सुरु झाला....*वसुधा नाईक,पुणे*

अक्षरधन
 7 February 2019  
Art

_____________________*अक्षरधन*______________________कविता माझी अक्षरधनाचीभावनांनी सुरेख गुंफलेलीशब्द शब्दाने अाणली मजाअक्षरधनाने कविता रंगलेलीरेखाटलेय त्यात माझे मनमाझे जीवन गुपीत सारसुंदर विचारांनी सजवला मीअक्षरधनांचा मस्त हो हार...माझे जीवन हो रंगमहालचारोळी अन कवितांचालपवले अक्षरधन रंगमहालातपूर आला अर्थपूर्ण भावनांचा...माझी जीवनगाथा मांडलीखजिना कवितांचा साठवलासिनेमा जीवनाचा अहो मीशब्दमहालात की हो सजवला....वही माझी अक्षरधनाची छानफारच हो जपून ठेवलीयचाहूल लागता तुमची की होमी वही समोर आणलीय....काय येणार हो आपल्या बरोबरमाझै अक्षरधन सर्वांच्या मनात राहतीलमी जगात नसताना पण होलोकं माझी आठवण तरी काढतील....*वसुधा नाईक,पुणे*

"संविधान वाचा व संविधान वाचवा"
 22 January 2019  
Art

"संविधान वाचा व संविधान वाचवा""रिपब्लीकन मुव्हमेंट" याचा शाब्दीक अर्थ पाहिला तर, लोकांनी चालवलेली चळवळ.देश स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही, अजूनही आपल्या देशात लोकांनी चळवळ चालवावी अशी गरज का भासते.याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर, केवळ एवढेच म्हणू शकतो की, "सध्या देशाची शाशन प्रणाली बघता,देश लोकशाहीकडून हुकूमशाही, दडपशाहीकडे वळत चालला आहे."परंतू जर दिर्घ कारण बघितले तर विवीध पैलूवर प्रकाश टाकावा लागेल.आज शाशनप्रणाली जी हुकूमशाही,दडपशाहीकडे वाटचाल करू लागली आहे,ती कशाच्या बाबतीत? याचेही खुप सुक्ष्म निरीक्षण करावे लागेल.आधीच हजारो वर्षे विवीध परप्रांतीयांच्या हुकूमशाहीत, राजेशाहीत,गुलामगीरीत राहिलेला भारत देश संपूर्ण मानसिक गुलाम झालेला.ही मानसिक गुलाम कशाची तर, प्रथा परंपरेच्या नावावर लादलेल्या अमानवी,पशुतूल्य नियमांची.या नियमांमधे,मनुने सांगितलेला चातुर्वण,म्हणजेच समाजातील लोकांच्या समुहाला चार वर्णात विभागून,समाजात वर्णाच्या आधारावर पाडलेली फुट. समाजातील मानवाने मानवात पाडलेली दरी. मानवाने मानवात निर्माण केलेला भेदाभेद.वर्णाच्या भेदाभेदातून निर्माण झालेल्या जाती, पोटजाती, भेदाभेद अशा अराजकतेच्या श्रूंखला निर्माण होवून, जातपात,देवधरम या अनिस्ट रूढी परंपरांचा भारत देश संपूर्ण मानसीक गुलाम झाला.परप्रांतीयांमधे इंग्रजही भारतात आले. आणि येतील लोकांमधे मुळातच मानसिक गुलामगिरीच्या पडलेल्या सवयीचा फायदा घेत, पुन्हा तेच "फुट पाडा व राज्य करा" या नितीचा अवलंब करून शेकडो वर्षे राज्य केले.भारतवासियांना गुलामगिरीत डांबून ठेवले.जर इंग्रजांनी भारतात शिक्षणप्रणाली सुरू केली नसती,  शिक्षण घेवून इथले लोक इतर देशाच्या सामाजिक व राजकिय स्थितीचे अभ्यास करू लागले नसते. इतर देशाच्या सामाजिक व राजकिय स्थितीचे ज्ञान मिळवू लागले नसते, तर कदाचित देश स्वातंत्राची जाणीव ही भारतवासियांना झाली नसती.'स्वातंत्र्याची जाणीव होणे, म्हणजेच गुलामगिरीत असल्याची जाणीव होणे. म्हणजेच जेव्हा व्यक्तीला गुलामगिरीत असल्याची जाणीव होते,तेव्हाच त्याला स्वातंत्रप्राप्तीची जाणिव होवू लागते. हे मानसशास्त्रीय कारण म्हणता येइल.याचा अर्थ जेव्हा देशात स्वातंत्र प्राप्तीची चळवळ होवू लागली, तेव्हा भारतीयांची परप्रांतीयांच्या राजवटिचे गुलामित्व झिडकारण्याची मानसिकता तयार होवू लागली.ही गुलामी कोणती? तर केवळ राजकिय. म्हणजेच त्यांना स्वताचे राजकिय स्वातंत्र हवे होते. स्वताचे शाशन हवे होते. देशातील नैसर्गीक व भौगोलिक साधन संपत्तीवर देशाचा अधिकार हवा होता.याचाच अर्थ बाहेरील  लोकांच्या भौतीक गुलामगिरीतून सुटका हवी होती.  आणि अखंड प्रयासाने व कित्येकांच्या बळीने, परप्रांतीयांच्या भौतीक, भौगोलीक, राजकिय, आर्थीक गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र देखील प्राप्त झाले.परंतू शतको शतकापासून चातुवर्ण, मनुवादाच्या ज्या मानसिक गुलामगिरीने इथल्या समाज व धर्मठेकेदारांना बांधून, जकडून ठेवले होते, त्या तुच्छ मानसिक गुलामगिरीतून भारतीय धर्मवादी,जातवादी, वंशवादी, लिंगवादी, मनुष्याने स्वताला मुक्त केले नाही.आणि अशा स्थितीमधे जी स्वातंत्रपुर्व काळात स्वातंत्रप्राप्तीची चळवळ होती, देश स्वातंत्र्यानंतर त्या चळवळीचे रुप बदलले.कारण, देश दोन प्रकारच्या गुलामगिरीत होता. संपुर्ण देश हा परप्रांतीयांच्या राजकिय गुलामगिरीत,आणि या देशातील चतुवर्णातील चौथा वर्ण ज्याला शुद्र म्हटले जायचे तो व स्त्री वर्ग, उच्च वर्णीयांच्या, मनुवाद्यांच्या मानसिक गुलामगिरीत.आणि त्यामुळे परप्रांतीयांपासून जरी संपुर्ण देशाला राजकिय पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले, मात्र या वर्गाला देशातीलच मनुवाद्यांपासून, चातुवर्णापासून स्वातंत्र मिळू शकले नाही.अशा स्थितीत देशांतर्गत कलह निर्माण होवून,पुन्हा दोन गट तयार झाले.यात एक गट, जो मानव उत्पत्तीचा वैज्ञानीक व नैसर्गीक कारण आणि सत्य नाकारून पुर्व व परंपरावादी पध्दतीने दुसऱ्या वर्गावर मानसिक गुलामगिरीचे अधीराज्य गाजवू बघतो. आणि दुसरा या सगळ्यांनी पिडीत वर्ग जो आधुनीक व वैज्ञानीक विचारशैली अंगीकारून या मानसिक गुलामगीरीला झिडकारू पाहतो.या पिडीत वर्गाला चातुवर्ण मान्य नसुन, मनुवाद मान्य नसुन, जातीय दांभीकपणा मान्य नसून, धर्मांधपणा मान्य नसून, तो संविधानाने जे प्रजातंत्रामधे देशाच्या संपुर्ण नागरीकांना, लिंगभेद, वंशभेद, जातीभेद ,धर्मभेद, प्रांतभेद न ठेवता समता, न्याय, स्वातंत्र, बंधूत्व बहाल केले आहे त्या  सवैंधानीक मुल्याचा व अधिकाराचा हा दुसरा, म्हणजे पिडीत वर्ग पुरस्कर्ता होय.आणि या दुसऱ्या वर्गाला सवैंधानीक  आधारावर   स्वातंत्र हवे आहे ते मानवी मुल्य रूजवीणारे.स्वातंत्र प्राप्तीनंतर, संविधानाला परमोच्च स्थानावर ठेवून, सवैंधानीक कायदे व नियमांवर देशातील राजकिय व सामाजीक घडामोडी चालाव्या, देशाचे राज्यकारभार चालावे हा प्रामाणीक प्रयत्न व मागणी या दुसऱ्या पिडीत वर्गाची असते. परंतू प्रत्यक्षात मात्र पारंपारीक पध्दतीने चातुवर्णाला मानणाऱ्या प्रथम वर्गाला, संविधान हा फक्त राजकारणात सक्रीय होण्यापुरता मान्य असून, संविधानात नमुद केलेल्या अस्पृश्याच्या उध्दाराच्या काही बाबी वेशीवर टांगून, कायदा वेशीवर टांकून, पुन्हा दडपशाही, हुकूमशाही, अराजकीय व गढूळ राजकारण करून, शाशन करून, दांभीक चालिरीती, जशा की संविधानाने स्पस्ट उल्लेख केला की "धर्मनिरपेक्ष" म्हणजेच कोणत्याही एका धर्माचा तिरस्कार न करता, कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन किंवा चालना न देता सर्वांना समान स्थान व समान अधिकार मानने, या बाबीचे सर्रास उलंघन होवून, "गौ हत्याकांड" सारख्या घटना घडवून देशात एका धर्माला पाठिंबा,रक्षण, प्रसार , प्रेरणा दिली जावून, संविधानाविरूध्द जावून संपूर्ण देशवासीयांना सक्तीने एका धर्माच्या निर्बंधनाकडे ढकलण्याचे कट, प्रयत्न केले जाताना दिसत आहे.म्हणजेच असे म्हणता येइल की, स्वातंत्र प्राप्तीनंतर, प्रजातंत्र लागू झाल्यानंतर देशात दोन गट, वर्ग, समुह उदयास आले. एक जो लोकशाही मधे संविधानालाच परमोच्च स्थानावर मानून, संविधानच हा देशाचा कायदा,कानून असून संविधानाने बहाल केलेली समता, स्वातंत्र, बंधूता, न्याय हीच राज्यकारभाराची सुत्रे असावी असे मानणारा, तर दुसरा वर्ग संविधान हा फक्त देशाला लोकशाही राज्याची ओळख निर्माण करून देवून, राज्यकारभार करण्यापुरता मर्यादित ठेवून, प्रत्यक्ष समाजकारणात पुर्वीच्या चातुवर्णालाच प्रस्थापित करून, जातीवादी, धर्मवादी, वंशवादी, लिंगवादी समाज व्यवस्था टिकून राहावी या प्रयत्नांचा व धोरणांचा पुरस्कर्ता.अशा अवस्थेत या दोन्ही वर्गात गृहकलह, शितयुध्द निर्माण होवून या प्रथम वर्गाच्या विरूध्द, संविधान व मानवी मुल्ये रूजवीण्यासाठी हा दुसरा म्हणजे शोशीत वर्गाकडून "रिपब्लीकन मुव्हमेंट" म्हणजेच लोकांची चळवळ चालविली जाते.येणाऱ्या काळात व सध्या स्थितीतही देशात सवैंधानिक राज्य, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आज प्रथम गरज होवून बसली आहे ती, संविधान साक्षरतेची. संविधान जागृतीची. संविधान म्हणजे काय? संविधानात काय आहे? संविधान नागरिकांना कोणते अधिकार देतो व का?त्याच प्रमाणे  संविधानाने नागरीकांना देशाचे नागरीक म्हणून, अधिकारासोबत कोणते कर्तव्य, जबाबदाऱ्या दिल्या? विशेष घटकांसाठी विशेष तरतुदी कोणत्या व त्या देण्यामागील कारण काय? ह्या सगळ्या बाबी जाणून घेवून, समजुन घेण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे ते देशाचे सुज्ञ नागरीक म्हणून प्रत्येक व्यक्तीने संविधान हातात घेण्याची. हातात घेतलेल्या संविधानाचे पान चाळण्याची. प्रथम वर वर वाचन करण्याची. आणि नंतर सखोल वाचन करण्याची.सध्या देशातील सामाजिक व राजकिय अराजक स्थिती लक्षात येता, लोकशाही,प्रजातंत्र टिकवीण्यासाठी, संविधानाचे रक्षण होणे महत्वपुर्ण ठरते आहे. आणि जर संविधानाचे रक्षण करून लोकशाही टिकवायची असेल, तर सध्याच्या युवा वर्गासह, युवकांच्या भावी पिड्यांना संवैधानीक साक्षर करणे ही काळाची गरज ठरत आहे.काळाची ही गरज ओळखता, युवा व विद्यार्थांच्या हाती संविधान देणे आवश्यक आहे. जेणेकरून ते संविधानाचे वाचन करून, संविधान हा फक्त पुस्तकात वाचला जाणारा आदरयुक्त शब्द न राहता, प्रत्यक्षात समाजजिवनात संविधानाप्रती आदर निर्माण होवून, देशाच्या लोकशाहित कायद्यानियमावलीतील सर्वोच्च सम्मान प्राप्त धेय्य होऊ शकेल.या देशाचा जो नागरीक संविधान वाचेल,तो संविधान वाचवल्याशिवाय राहणार नाही व जो संविधान वाचेल तो लोकशाही वाचवेल.अस्मिता मेश्राम पुष्पांजलीसाहित्यिकभंडारा,9921096867

कधीतरीअसं घडावं
 19 January 2019  
Art

*कधीतरी असं घडावं...*कधीतरी असं घडावंपावसान माझ्याशी बोलावंथेंबात मी नाचावंअलगद स्वैर बागडावंमनसोक्त खेळावं.......कधीतरी असं घडावंबालपण परत यावंबालपणात जावूनत्या आठवणीत रमावंस्वच्छंदी जीवन जगावंकधीतरी असं घडावंपंख द्यावेत देवानमनमुराद फिरून घ्यावंउंच भरारी घेतवसुंधरेच निरीक्षण करावं....कधीतरी असं घडावंगाडीवर बसावंमित्रांसवे फिरायला जावंआनंदाच्या सरीत नहावंमनसोक्त गप्पात रंगावं.....,कधीतरी असं घडावंवसुंधरा होवूनहिरवीशाल पांघरावीतिच्या पोटात काय ,काय दडलयंते निरखून पाहावं....कधीतरी असं घडावंलहान बाळ व्हावंआईला घट्ट बिलगावंकशाचीही चिंता न करताबालपण पुन्हा अनुभवावं...,*वसुधा नाईक,पुणे*

मकरसंक्रांत
 15 January 2019  
Art

*तिळगूळ*तिळगूळ घेतले  खरपूस भाजूनखलबत्यातघेतले बारीक कुटूनगुळाला दिला मस्त चटकातिळगुळाचे मिश्रण घेतले सारखे करून...मस्त रसरशीत चटका बसला गुळालाखमंग सुवास आला मिश्रणालागुळपोळी केली त्याचीनैवैद्य अर्पण केला देवाला.....तिळगुळाचा बनवला लाडूसजणाने सजणीला लाडू भरवलापती पत्नीच्या नात्यातीलआपलेपणा सजणाने वाढवला...घरातील वरिष्ठांना नमस्कार केलापरंपरेचा ठोका नाही चुकवलामकरसंक्रांतीच्या सणाचा गोडवाआशिश सुमनांनी छान बहरला..,,संसारातील,कुटुंबातील गोडी तिळगुळानेआज परत द्विगुणीत केलीउत्तरायणातील या गुलाबी थंडीनेमनाची सुंदरता अजूनच खुलली...*वसुधा नाईक,पुणे*

म्हणी
 4 January 2019  
Art

*म्हणी....*आज वर्गात चौथीचा पाठ सतरावा  घेत होते.म्हणी आधी  मुलांकडूनच काढून घेतल्या.अर्थ विचारले .ज्याचाअर्थ आलानाही .तो मी समजावून सांगितला."काखेत  कळसा गावाला वळसा"ही म्हण चालू होती.माझ्या वर्गातल्या राज खामकर या मुलाने मधल्या सुट्टीतला प्रसंग  या म्हणीला मिळता असल्याने     लगेच  त्याने सांगितला,आर्यन नावाच्या मुलाची माकडटोपी कृष्णाने  काढली.ती त्याच्या पायाशीच पडली.पण ते त्याला माहित नव्हते.तो टोपी शोधत असताना...तिसरीच्या मुलाने विचारले "काय शोधतोस?" आर्यन म्हणाला "अरे,माझी टोपी फेकली कृष्णाने ती शोधतो".तो मुलगा म्हणाला "अरे,ही बघ की तुझ्या पायाजवळ".आर्यन   हसला टोपी उचलली. हा प्रसंग सांगून  राजम्हटला "काखेत कळसा अन गावाला वळसा" असे आर्यनचे झाले.मला खूपआनंद झाला.की म्हण व्यवहारात कशी येते .हे माझ्या मुलांना छान  समजले.अर्थ पण छान समजला.*वसुधा नाईक,पुणे*

क्षण ते सुखाचे
 29 December 2018  
Art

*क्षण ते  सुखाचे*अपरीचित असा तूअवचित समोर आलानजरानजर झालीमाझे ह्रय चोरून गेलामम  अंतरी तूक्षण ते  सुखाचे घेवून आला.....अचानक दिसला परत तू मजआनंद फार झाला तूजकाय   बोलावे कळेनाहर्ष झाला माझ्या मनामनाचे   विचार दिसू लागलेक्षण ते सुखाचे साठवू वाटले....अपरीचित तू आतापरीचित झाला मला'मला तू  खूप आवडतेस'या शब्दांनी आपले केले मलाया शब्दांनी धीर आला धीरक्षण ते सुखाचे होते अधीर....मी घरी बोलावले  तुलाचहा पोह तुझ्या दिमतीलानजरानजर होता तुझी माझीसर्वकाही नजरेतून तू  बोललासमजले मला तुझे आचारक्षण ते  सुखाचे होते  अपार.....आवडी निवडी समजल्याझाली ओळख दोन घराण्यांचीलग्न लागले मग आपलेकेली जपणूक आपण  नात्यांचीसांभाळ केला कुटुंबाचा छानक्षण ते सुखाचे  होते  महान....माहेरची मी पोर लाडाचीमिळाले तिला  सासर  थोरतुझ्या मुळेच घडले सारेदिवसाही दिसतील आता  तारेरंगून जावू त्या स्वप्न मालेतक्षण ते सुखाचे भरभरून  आलेत...*वसुधा नाईक,पुणे*

मला विसरताना
 26 December 2018  
Art

*मला विसरताना....*लग्न होवून देवाच्या साक्षीनेतुझ्या घरी मी पाऊल टाकलेघरातील सर्व माणसांबरोबरमन माझे संसारात छान रमले,...संसार झाला आपला छान सुरूमौजमजा,गोड  गप्पा साथीलारोज रोज घरातील काम करतानाप्रेमळ सासूबाई माझ्या मदतीला.....संसार फुलला मुलेबाळे झालीसर्वच संसारी गुंता वाढलातू काय नोकरी अन घरदारयाच्यांतच जास्त गुंतत चालला.....तरीदेखील माझे मन रमवण्यासाठीकधी सिनेमा,कधी बागेत फिरायला गेलोपण आता खरच नाही रे जमततुझ्याबरोबर घराबाहेर पडायला....दिनभर कामाच्या थकव्यानेअंग दुखते रे आता माझेतरीदेखील दिनभर तू पण दमतोस कीमग माझा विचार सोडून चेपून देते अंग तुझे.....आताशा मोठे आजारपण मागे लागलेआणि यातच माझे बरे वाईट झालेतर मला विसरताना तुला खूप त्रास झालाअसे माझ्या पहाटैच स्वप्नात आले.,,...*वसुधा नाईक,पुणे*