आस्तिक कि नास्तिक ?

                           सर्व सामान्य लोक देवाच्या आस्थेवरून दोन गटांमध्ये विभागले जातात.ते दोन गट म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक आणि नास्तिकाची व्याख्या विचारली असता जो देवाला मानतो तो आस्तिक आणि जो देवाला नाही मनात तो नास्तिक अशी ठरवली जाते . पण खरंच आस्तिक आणि नास्तिक नावाचे दोन गट आहेत? कारण आस्था म्हणजे विश्वास. एखाद्या प्रति असणारी आपली आस्था आपल्याला आस्तिक बनवते .नास्तिक हा शब्दच मुळात चुकीचा आहे. आपण केवळ आणि केवळ देवावरच्या आस्थेपोटी माणसाला आस्तिक आणि नास्तिक या दोन गटांमध्ये विभागतो. पण खरंच ते योग्य आहे ? युगंधर अशा परमेश्वर श्री कृष्णा ने देखील गीतेमध्ये कर्माला प्राध्यान दिले आहे.मग कर्माचा पुजारी हा आस्तिक नव्हे? भले तो मंदिरामध्ये जात नसेल,उपास - तपास, व्रतवैकल्य ,नामस्मरण करत नसेल पण तो आपल्या कर्माची पूजा पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करतो. रोज तो तेवढ्याच निष्ठेने आपले काम चोखपणे करतो जेवढा एखादा व्यक्ती मंदिरात जाऊन मनोभावे देवाची पूजा करतो.

                    आता आपण एक उदहारण पाहू. एका गावात एक भले मोठे शिवाचे देवालय होते. त्या गावात अशी मान्यता होती कि जो कोणी त्या देवालयातील पिंडीवर दुग्धदाभिषेक करेल त्याच्या पुण्यात वाढ होते.असेच एक कुटुंब त्या गावात राहत होते .आई ,वडील आणि दोन मुलं. मोठा मुलगा त्या मंदिराचा पुजारी म्हणून कार्य करी आणि लहान मुलगा समाजकार्य. एके दिवशी त्यांच्या आईने त्यांना मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक करण्याचे सुचवले.आईच्या आज्ञेस मान देऊन दोन्ही मुले दुग्धाभिषेकास निघाली.ते दोघं मंदिराच्या जवळ पोहचले .मोठा मुलाने सरळ गाभाऱ्यात जाऊन पिंडीवर दुग्धाभिषेक केला. तोच दुसऱ्या मुलाचे लक्ष मंदिराच्या पायरीवर बसलेल्या याचकाकडे गेले.अत्यंत दिन-दुबळा ,कृश अशी देहयष्टी असेलला तो याचक उपाशी असल्याचे दिसत होते.त्या मुलं मधला कर्मवीर जागा झाला आणि अभिषेकासाठी आणलेले दूध त्याने त्या याचकास दिले व त्याची भूक क्षमवली .तात्पर्य हेच कि दोघांनी आल्या कर्माची पूजा केली .मग दोघे आस्तिक नाहीत का ? 

                   मतितार्थ हाच कि हे दोन गट आपण,मानवाने पाडलेलेआहेत आणि आपण त्यावर वाद घालतो.देवाच्या अस्तित्वावर प्रश्न करतो .पण खरंच देवाचे अस्तित्व मानणारे आस्तिक आणि न मानणारे नास्तिक हि संकल्पना कितपत योग्य आहे? देव हि पाहण्याची,ऐकण्याची ,आजमावण्याची गोष्ट नाही.ती अनुभवण्याची गोष्ट आहे आणि तो अनुभव विलक्षण आहे.तो अनुभव कोणाला देवाची भक्ती करण्यामध्ये मिळतो तेर कोणाला आपले कर्म पूर्ण निष्ठेने करण्यामध्ये.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.