एक बाप्पाला पत्र...

बाप्पा, दरवर्षी तुझं थाटात आगमन सोहळा पार पडतो. भव्य मिरवणुक निघतात, ढोल-ताश्यांच्या गजर असतो, भल्या मोठया सजावटीत तुज आगमन होतं, मोठ-मोठ्याने DJ वाजतात, तुला आवडतं की नाही, हे माहीत नाही, पण भक्तांना मात्र आवडतं.
यंदाचं चित्र थोडं वेगळं आहे आणि ते तुला माहीतच आहे. ना कुठे भव्य मिरवणुक निघाल्या, ना कुठे जास्त ढोल-ताश्यांचा गजर झाला, ना कुठे मोठ-मोठ्याने DJ वाजला.
या वर्षी तुझी भव्य सजावटीत स्थापना झाली नाही,पण प्रत्येकाच्या मनात तुझी स्थापना झाली.
मोठमोठ्याने DJ नाही वाजला पण भक्तिभावाने केलेल्या पुजेचे दोन शब्द तरी तुझ्या कानी पडले असतील.
दरवर्षीप्रमाणे मुर्तीच्या रुपात आलास, निघालास सुद्धा. पण प्रत्येक वेळेला तु होतास आणि आहेस फक्त वेगळ्या रुपात.
बाप्पा तु नेहमीप्रमाणे यंदाही आलास आणि निघालास पण, आणि नेहमीप्रमाणे जाऊनही मनात मागे उरलास आनंद बनुन.

कळुन चुकलं की, " तुला उत्सवाची नाही , तर श्रद्धेची भुक आहे ".

काही नकळत चुकले असले तर क्षमा कर बाप्पा.

एवढचं सांगेन की ...
पुढच्या वर्षी लवकर ये !!

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.