CATEGORIES
जग आठवणींचं - - -
 29 April 2018  
Art

मनाच्या तळाशी होते,आठवणींची साठवण!आयुष्याचे अमूल्य ते क्षण,अनुभवलेले कणकण!कधी मधी आठवणींचे,पदर उलगडतात!हातात फेर धरून,आनंदाने बागडतात!कधी रडवतात, हसवतात,धीर ,गंभीर बनवतात !तर कधी आयुष्याला उमेद देऊन,आयुष्य सोपे करून जातात!कधी कधी एखादाअनुभवही,आठवण होऊन जातो!आयुष्यभर काळजाला,घट्ट चिटकून जातो!आठवण अन् भावना,या दोघी सख्या बहिणी!दोघी रचत असतात,नेहमी कहाणी नवनवी!दोघींना एकमेकींशिवाय,कधी करमत नाही!मन तरंगात व्यक्त होण्याची,संधी कधी सोडत नाहीत!कधी आठवणींच्या - --संगतीनं भावना मुक्त होतात!तरआठवणींच्या तालावर,चाळ बांधून  नाचतात!अनुभव त्यांचा सख्खा भाऊ!समज अन् अनुभवाची गोड जोडी!आठवण हट्टी ,बाळबोध,तर भावना वेडी!आठवणींची गाठ,इतकी मजबूत असते!की सुटता सुटत नाही,ती थेट काळजाला बांधून जाते!मनाच्या दालनात,राहतात सर्वजण एकत्र!फिरत असतात,प्रतिक्षणीआयुष्यात सर्वत्र!अस असतं राज्य भावनांचं!!जग आठवणींचं!!अनुभवाने भारलेलं,जीवन तुमचं आमचं!!सौ चारुशीला लक्ष्मीकांत धुमाळ

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा साठी निवड झालेली माझी कविता
 29 April 2018  
Art

" कवी कट्टा २०१८ बडोदा " येथील साहित्य संमेलनासाठी निवड झालेली माझी कविताशिर्षक ' कस ' पाठवित आहे .👇👇कवितेचे शिर्षक :     कस(वृत्त :  वियद्गंगा . लगागागा ४ वेळा )खरे ठरण्यास सोन्याला जळावे लागते आधीतसे खाणींत रत्नाला कळावे लागते आधीघणांचे सोसता ठोके दगडही देव की व्हावातसे संतत्व येण्याला छळावे लागते आधीजरी या उंच वृक्षांना वेढती ह्या तरु वेलीपुन्हा ते बीज होण्याला फळावे लागते आधीउगवते बाजरी, ज्वारी गव्हाचे शेत भाताचेतरीही भाकरी होण्या दळावे लागते आधीपरिक्षा रोजची आहे प्रतिक्षा पास होण्याचीतरी या शर्यतीमध्ये पळावे लागते आधीसुनामी येतसे कोठे कधी भूकंप ही होतोमुखवटे मीपणाचेही गळावे लागते आधीजिवाला जीवनामध्ये यशाचे टोक गाठायाभवाच्या तप्त तेलाने तळावे लागते आधीअसा मोठेपणा सारा मिळे ना सहज कोणालाकधी जाता पुढे पुन्हा वळावे लागते आधीपरी त्या ध्येय्य लक्षास वेधण्या व्याध होऊनीस्वतःच्या अंतरंगाला मळावे लागते आधी---- कवी सुधीर नागलेमु .पो. गोरेगांव, ता . माणगांव,जि. रायगड, महाराष्ट्र राज्य .Email. Id.sudhirnagle56@gmail.comMobile no.9145840567.🙏🙏🙏🙏

dare complate
 20 April 2018  
Art

    आजकाल व्हॉटसअप वर DC नावाचा रोग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे.ह्या रोगात रोगी स्वतःच आजारी पडतो नी त्यावरचा इलाज आपल्या प्रियजनांनकडून करवून घेतो.रोगी मित्राने आजारचा संदेश धाडल्यावर आपली इच्छा असो वा नसो आपल्याला त्याच्यावर बिनपैश्याचा इलाज हा करावाच लागतो,कारण रोगी हा आपली अंतिम इच्छा असल्यासारखं पेच त्याच्या मित्रांसमोर निर्माण करतो (agar aap muze sach me dost mante ho to...)     मग बिच्चारे आम्ही मोबाईलच्या मेंदूतून रोगी मित्राचा एक तजेलदार छायाचित्र व्हॉटसअप च्या स्टेटस मध्ये लटकवतो .आणि 24 तासानंतर मूर्त अवस्थेत असणार हे छायाचित्र अमूर्त होते याला कारणीभूत म्हणजे मार्क झुकेरबर्ग ची करणी.त्या नंतर त्या छाायाचित्राखाली मित्रांच्या विशेषणांनी 2~4 फुल वाहून फोटो ला मानवंदना देतो.आणि ह्या सगळ्याचं फळ म्हणून आपल्याला views च्या रूपाने पोकळ आहेर मिळतो.जितका आहेर जास्त तितकं मित्राच्या आत्म्याला शांती जास्त.अस केलं की रोगी मित्र आजारातून उठून माणसात बसतो म्हणजेच तो बरा होतो.आणि आपण मित्रच जीव वाचवून मित्राच्या~मैत्रीला जागलो हे जगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण दोन लेटर छापतो ; DC ***. मैत्री निभवायची म्हणजे अशी छोटी मोठी झंगट ही करावीच लागतातमोरे_गणेश.

वणवा भडकला रं...
 18 April 2018  
Art

   काल सकाळी लाल सुंदरीने कॉलेजला सवारी चालली होती. गर्दी कमी असल्याने विंडो सीट मिळाली, त्यामुळे पाठीला ताण देत, पायावर पाय टाकले आणि मुंडकी ४५ अंशात बाहेर वळवली. सकाळचं आल्हादायक वातावरण असल्याने आपसूकच डोळ्यांच्या बाहुल्या बाहेरील निसर्गात विलीन झाल्या. वाऱ्याची मंद झुळूक, डोंगराच्या अडोशातून सुर मारणारी सूर्याची किरणं, आंब्याचा मोहक मोहोर आणि जीवानीशी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या. अशा प्रकारे निसर्ग आपल्याच धुंदीत मग्न झाला होता. आणि मनात विचार आला की खरचं महाराष्ट्रच्या नंदनवनाला शोभेल असाच थाट आहे आपल्या कोकणचा. कॉलेज मध्ये तीन–चार लेक्चर्सची गोळा बेरीज करून पुन्हा स्वारी घराच्या वाटेवर निघाली.     कॉलेजमधून घरी परतताना पुन्हा अपेक्षेप्रमाणे विंडो सीटच्या शेजारी ढुंगण टेकायला जागा मिळाली. गर्मीच्या मोसमात विंडो सीट मिळणे म्हणजे आमच्यासाठी तो `शिवशाही`चाच थाट असतो. नेहमीप्रमाणे डोळे बाहेर वटारले. पण दिसावं ते काही भलतच. चित्रकाराने मेहतीने चित्र काढल्यावर अनावधानाने पाण्याने भरलेल्या पेला त्या चित्रावर पडण्यासाठी मुकावा आणि थोड्याच वेळात ते चित्र `पाण्यात अखंड मिसळून` जातं त्या प्रमाणे आगीचे रौद्र रूप निसर्गाला काळ्या भुकटीत विलीन करत होत. रस्त्याच्या दुतर्फा हे चित्र होत. हृदयाच्या भावना कोलमडून पडल्या होत्या म्हणून स्तब्ध झालेलं डोळे मेंदूला प्रश्न करू लागले; हेच आहे का आपले ते सकाळचं स्वप्नातलं नंदनवन ?  नंदनवनाच  आता `काळ`वंदवन तर होत नाही ना?  कोकणाच्या सौंदर्याबद्दल इतर वेळी ताशेरे पिटवनारे आपण अश्या वेळी कोठे शेपूट घालून बसतो ? असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यांमार्फत मेंदूवर उमटत होते. न्हावी वस्तरा मारून शेंबड्या पोराचं जसं टक्कल पाडतो तसं आगीमुळे सारा डोंगर उघडा पडत होता.    काय वाटलं असेल त्या चिमुकल्या पिल्लांना जे आकाशाला आपल्या पंखांनी गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी घेऊन आले होते. काय वाटतं असेल त्या पिल्लांच्या आईला जीला फक्त चार दिवसांचा मातृसहवास लाभला असेल. काय वाटलं असेल त्या आदिवासी बांधवांना, ज्याची आर्थिक पुंजी वनात मिळणाऱ्या `रानमेव्यावर` अवलंबून असते. रानात लागलेली आग तर शमली पण आता त्यांच्या पोटातली अन्नाची आग कशी शमणार. काय वाटलं असेल त्या शेतकर्याला ज्याचा हौसा दोन मिनिटात होत्याचा नव्हता झाला.  वणव्यात असं बरंच काही होत जे ऐकून, वाचून, पाहून आपलं काळीज करपटून जाईल. पण जोपर्यंत त्या वणव्याच्या झळा आपल्या दैनंदिन आयुष्याला  लागत नाही तोपर्यंत हे सगळं आपल्यासाठी कल्पनेतलेच गणित असतं.    संध्याकाळी ‎हे सगळं एका कोल्हापूरच्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा ती जे वाक्य बोलली ते अगदी पांढऱ्या रस्सा प्रमाणे होत, रुचकर होत पण तितकंच झणझणीत. म्हणाली ``तुम्ही कोकणवाले किती नशीबवान आहात ना; तुमच्याकडे वणवे लागतात (म्हणजे वणवे लागण्याईतकी नैसर्गिक साधनसंपत्ती तरी तुमच्याकडे आहे ) आमच्याकडे वणवे नाही लागत , आणि  तुम्ही कोकणवाले किती कुचकामी आहेत ना, म्हणजे फुकटात मिळालेल्या ह्या निसर्गाचं तुम्ही साधं संवर्धनही करू शकत नाही. तुमच्या कडे `चणे` तर आहेत पण ते चणे  चावण्याईतक सामर्थ्यही तुमच्या `दाता`मध्ये नाही आहे.`` ‎    वणवा हा जरी शास्त्रीय व्याख्येप्रमाणे झाडांच्या फांद्यांमुळे  होत असलेल्या घर्षणामुळे होत असला तरी, वणवा लागण्यात सिगारेटचा झुरका मारून थोटक न विझवता फेकणाऱ्या वाटसरुंची महत्त्वाची भूमिका असते.वणवा कोणत्याही कारणाने लागला तरी तो विझवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या खाजगी संपत्तीचे ज्या आकांताने आपण संरक्षण करतो त्याच प्रमाणे नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे महत्त्वाचे आहे.        आज पुन्हा तीच वाट, फरक फक्त इतकाच होता.  काल लाल सुंदरीसमावेत निसर्गसुध्दा घावत होता. आज सुंदरी धावतेय, निसर्ग तिथेच `निस्तेज` अवस्थेत...©मोरे_गणेश.

#लोकशाहीच्या स्तंभावरचा बलात्कार.
 17 April 2018  

      गेले दोन–चार दिवस सोशल मीडियावर `असिफा` ह्या आठ वर्षाच्या निरपराध मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आपण सगळेजण तिच्याबद्दल फोटो, स्टेटस आणि पोस्टी टाकून भारतीय  न्यायव्यवस्थेवर, धर्माचं राजकारण करणाऱ्यांनावर आणि अप्रत्यक्षरित्या भारतीय लोकशाहीच्या स्तंभांवर आपण `बलात्कार` करत आहोत. आपण वास्तव्य करत अहो तो जगातील सगळ्यात मोठा  लोकशाहीप्रधान देश आहे. आपली लोकशाही चार स्तंभांचा आधार घेत कशी बशी ताठ मानेने उभी आहे. पण जेव्हा `बलात्कारासारख्या` हिडीस घटना होतात तेव्हा हे स्तंभ एक पोकळ बांबू म्हणून लोकशाहीला टेकू देवून उभे असतात.     लोकशाहीचा चौथा स्तंभ; `प्रसिध्दीमाध्यमे`. आजकाल असं वाटतं की, जाती–धर्माची कुबड्या घेतल्याशिवाय टीआरपी वाढतच नाही. बलात्कार एका बालिकेवर झाला ह्यापेक्षा अमुक अमुक धर्माच्या मुलीवर तमुक तमुक धर्माच्या भामट्यांनी बलात्कार केलं अस सांगून आमच्यासमोर TRP ची चमचमीत थाळी वाढली जाते, आणि ती आम्ही अगदी चवीने मिटक्या मारत खातो तो विषय वेगळा. सलमान खानच्या घशाखाली एक रात्र काय तर जेवण उतरलं नाही तर आमचा सल्लू मियां आला हेडलाईन वर पण 8 वर्षाच्या पोरीसाठी 8 ओळींचा मथळा लिहिण्यासाठी ह्यांच्याकडे रिकामी जागा नसते. ते ही आम्हाला मित्राने टाकलेल्या स्टेटस वरून समजते. मग अमाची पण वाटचाल #justiceforasifa च्या दिशेने सुरू होते. अजुन तरी काय करणार हो आम्ही.     लोकशाहीचा तिसरा स्तंभ; `प्रशासन`. आता राजकारण्यांच्या रक्तातच `राजकारण` असल्याने ते बलात्कारासारख्या गंभीर विषयामध्येही आपल्या मताची पोळी भाजून घेतात. आम्ही रात्री अपरात्री मेणबत्त्या तर जाळतो पण ते अंधकारात लोटलेल्या पिडीतेच्या परिवाराला सांत्वनाच्या प्रकाशात आणण्यासाठी नाही तर मेणबत्तीच्या ज्यालाचा वापर करून विरोधी पक्षांबद्दल लोकांच्या मनात कसा जाळ पेटवता येईल ह्यासाठी जळत्या मेणबत्यांचं प्रदर्शन भरवल जातं. आणि राहिला प्रश्न सरकारच, ते पीडितेच्या कुटुंबीयांना लाखभराची पुंजी देऊन त्यापुढील कारभार न्यायपालिकेवर सोपवून आपले हात झिडकारून देते.       लोकशाहीचं सगळ्यात जास्त विश्वासपात्र स्तंभ; `न्यायपालिका`. आता तरी न्यायदेवताने डोळ्यावरची पट्टी काढावी असं वाटतं. प्रश्न असा आहे की, त्या पोरीच्या कोवळ्या मांसावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांनी क्षणाचाही विलंब केलं नाही, ना मनी कोणती लाज बाळगली मग बलात्कार झाल्यावर अशा रानटी कुत्र्यांना न्यायपालिका चार–पाच वर्ष का कुरवाळत बसते ?  का फुकटची पोसते अशा नराधमाांना ? बलात्कार झाल्यावर रस्त्यावर जनतेला मेणबत्तीला माचिस लावल्याशिवाय जर त्या निरपराध पीडितेला न्याय मिळत नसेल तर संविधानाच्या पहिल्या  पानावर धूळ बसली आहे असं आपल्याला नाही वाटतं?लोकांना स्तब्ध करणारे असे आहेत हे आपले लोकशाहीचे स्तंभ.                                                 परवा ज्या महामानवाची जयंती आहे ते आंबेडकर सांगून गेले की, `आपण सगळ्यात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत`. माफ करा पण मी त्याही पुढे जावून असं म्हणतो की,` आपण एक भारतीयाच्या अगोदर एक माणूस आहोत`. तरीपण माणसासारख वागायला आपल्याला का इतकं जड जातंय हो. त्या बलात्कार झालेल्या कोवळ्या जीवापेक्षा ज्यांना खरचं आपला धर्म, जात, पंत, पक्ष इतका मोठा वाटतो त्यांनी दोन मिनिट डोळे बंद करून कल्पनेतच त्या `असिफा`च्या जागी आपल्या पोटच्या पोरीला, बहिणीला, मैत्रिणीला किंवा आपल्या ओळखीच्या कोणत्याही `ती`ला उभ करा. उत्तर नक्की मिळेल, `मानवता`पेक्षा कोनाताही मोठा धर्म नाही.#Justice_For_Asifa..!©मोरे_गणेश.                      

रसरशीत गुलाबजाम
 25 March 2018  

काल माझी चड्डी मैञीण अन् मी गेलो होतो पिक्चर बघायला...बघायचा होता तो सोनु के टिटू की टट्टी की काय  ते सोनु के टिटू की स्विट्टी, पण काही तांञीक अडचणी मुळे आम्ही "गुलाबजाम " पहात होतो .पहील्या काही मिनीटातच त्या भल्यामोठ्या स्क्रीनवर  पाकात मस्त भिजलेले लुसलुशीत ५ गुलाबजाम  होते.  आम्ही दोघीनी एकमेकींकडं पाहील.. एखाद्या  पिळदार बांध्याच्या, हॉट हिरोकडं पहात रहाव तश्या अधाश्या सारखं पहात होतो आम्ही गुलाबजामकडे.आणि तेवढ्यात स्वप्नील एक अख्खा गुलाबजाम  उचलुन तोंडात  टाकतो.. आई शप्पथ लाळ टपकायची फक्त  बाकी होती.एकमेकींकडं पाहील न् न बोलताच ठरल होत,  आज गुलाबजाम खायचेचं.इंटरव्हल झाला, theater canteen च्या   counter वर कॉफी घेताना न राहून मी विचारलचं,"दादा गुलाबजाम  मिळेल का?" त्या दादाने अन् सोबत  बाकी लोकांनी अस्स पाहील माझ्याकडे... मग् तो बोलला desert  मध्ये डोनट आहे, देऊ?..छ्या गुलाबजाम अन् डोनट?....पिक्चरमध्ये पुढ येणारे गुलाबजाम चे टेम्पटींग सिन्स अक्षरक्ष: डोळे झाकत झाकत पाहीले.बाहेर आलो, हलवाईचं दुकान शोधल (पुण्यात हलवाईचं  दुकान  लग्गेच सापडत).. "काका गुलाबजाम भेटतील का आर्धा किलो?"  काकानी माझ्याकडे एक तुच्छतेने भरलेला कटाक्ष टाकला.. काय झाल आता?हलवायाच्या दुकानात गुलाबजाम चं मागितले होते मी.तो मऊ रसरशीत गुलाबजाम कधी चाखतेय अस झालेलं.तेव्हढ्यात काका बोलले  "अहो माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात " आईचाघो...मी पण म्हटलच मग् "उद्यापासून पाटी लावा बाहेर, मिठाई खाण्यासाठी शुद्ध मराठी येणे आवश्यक आहे "..गुलाबजाम अन् माझ्या जीभेतली अंतर आता अंत पहात होती आणि मी पुणेकर  काकांना  उलट उत्तर देऊन माती खाल्ली होती. खबरी( माझी चड्डी मैञिण)  जाम वैतागली होती माझ्यावर.आता जर् काका गुलाबजाम द्यायला नाही म्हंटले तर...पण काकांनी काट्यावर बॉक्स ठेऊन त्यात गुलाबजाम टाकायला सुरुवात केल्ती. रागातच त्यांनी बॉक्स हातात दिला. आई शप्पथ सांगते जन्मो जन्मी चा प्रियकर खुप मोठ्या दुराव्या नंतर  भेटल्यासारखा वाटला तो बॉक्स.काकांकड पाठ केली अन् दोघींनी एक एक गुलाबजाम  तोंडात टाकला. डोळे मिटले..तो जीभेवर विरघळत होता आणि आम्ही त्याच्यात..आहाहा स्वर्गसुख..पाकात भललेली बोट अन् ओठ चाटून घेतले,  गुलाबजाम चा बॉक्स बॅगेत टाकुन निघालो घरी, घाईने...एका वेळी एक गुलाबजाम खाऊन समाधान  झालयं का कधी कुणाचं?....

नीतिमत्तेच्या ठेकेदारानो !..
 28 February 2018  
Art

नीतिमत्तेच्या ठेकेदारानो !... सावधान गाठ माझ्याशी आहेआरे ! तुम्ही करून करून तरी काय करणार ?तेच तेच तत्वज्ञानाचे डोस पाजणार , अक्कलेचे तारे तोडणारसाधू संतही थकून गेले , तर तुमची काय बिशाद ?सत्यावर करून कुरघोडी , असत्याची बांधूच माडीम्हणे क्रांती करणार डोंबलाची ? आरे समाज कीर्तनांनी सुधारणारना तमाशानी बिघडणार . इतिहास साक्षी हे असच चालायचं ...नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! करा हवं ते ...आम्ही नाहीच बधणार ...आपुन तर बाबा मर्जीचे मलिक , काय बी झालं तरी तुमीच आकाविचार करण्याची गरचच काय ? , तुमचाच झेंडा जिंदाबाद ...मुर्दाबादआरे सुधरा रे ...तुम्ही ओरडा घास फुटेस्तोवर आम्हाला त्याच काय ?नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्ही लाख म्हणाल आम्ही नाहीच सुधारणारतुमचं आपला नेहमीचंच तरुण पिढी बिघडली नाहक बोंबलतायआम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू , तुम्हाला हवं ते तुम्ही कराचांगले - वाईट तेव्हाही होते अन आजही आहे, आम्हाला कशाला दोष देतानीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्ही कशाला आम्हाला अक्कल शिकवतायकौप्या करू , पेपर फोडू ? काहीही झालं तरी पासच होऊ ...नाही तरी शिकून माही कुठे हापिसात हुनार, आम्ही बरेभाई , दादा , अमक्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष , तमक्या पक्षाचे संघटकनीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्हाला काय कळतंय राजकारणातलं ...ठरलंय आमचं कागदी घोडे नाचवण्याचं , साऱ्यांनाच दारिद्र्य रेषेखालील यादीत टाकायचं पूर्वीचे संस्कारकेंद्रे आता पदव्याचे कारखाने जगाचा पोशिंदा पोरका , भारवाही मेला वाहता ओझे ...आपली अक्कल किती माहित्येय त्यांना विहिरीतच नाही पोहऱ्यात कुठून? ...फाटकी झोळी , फुटकी थाळी , आमच्यासारखे दळभद्री आम्हीच ... नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! कशाला रक्त आटवताय उगाच आमच्या सारखे आम्हीच ...आबासाहेब म्हस्केदिनांक ०१/०२/२०१८LikeShow more reactionsComment

तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...
 28 February 2018  
Art

अगंतुझ्यासाठी मी काय नाही केलं ?खोटं बोललो , स्वकीयांना फसवलंधर्मांतर केलं , वेषांतर केलं ..एवढंच काय झेंडे बदलले पक्षांतरहि केलंतू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...वाट्टेल त्या थापा मारल्या , भ्रामक आश्वासने दिलेतुझ्यासाठी काय - काय करू म्हणजे तू भेटशील ?तुझ्यापायी बायको पोराबाळांना वाऱ्यावर सोडलं ...समाजकारणातून राजकारणाचं गाजर दाखवलं ...तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...येतेस - जातेस आपल्या मर्जीने ...तू आहेस तरी कोण ?रात्रंदिनी तुझेच भास , एवढं मात्र नक्की तू माझ्यासाठी आहेसच खासतिझ्यापायी मी कसा पार वेडा झालो , भ्रमिष्ट कधी , कधी हवालदिल झालोकिती खटपटी केल्या , उप द्व्याप केले तरीही तू भेटलीच नाहीतू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...थोर तुझी ग माया ,थोर तुझी छाया अशी कशी ग तू ?तू असताना - नसताना असतो मात्र नुसता जीवाला घोरमीच काय तुझ्यासाठी सर जग महात्म्य तुझं थोरतू काहीही म्हण तुझ्या कर्तृत्वाला लाख लाख सलामतू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...विचार कसला करताय मित्रानो तुम्हीही तिचेच गुलामसत्ता म्हणा , खुर्ची म्हणा नाहीतर म्हणा संगदिल सनमतरीही तुझेच भास , तूच खास , तुझ्यावरच विश्वासकिती पिढ्या बरबाद झाल्या, किती जण वाया गेले ...तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी काय पण ...आबासाहेब म्हस्के

मरणाचेही भांडवल करणारे गारदी
 28 February 2018  

निवडणुकीची घोषणा होताच नेते मंडळी जागी झालीझाडून कामाला लागले , करूया म्हटले मोर्चेबांधणी जाहीरनाम्याची घोषणा झाली  , आनंदाची बरसात झाली त्यांनी  स्वप्नाचा गाव दावंला , आम्हीही हुरळून गेलो पोळ्याचा  बैल सजवावासणाला , मतदार हि सजला आश्वासनाच्या पावसानं कधी सहानुभूतीनं भिजला हा हा म्हणता निवडणुकीचा धुराळा उडाला ...मतदार सवयीप्रमाणे पुन्हा एकदा बावळा झाला नानाविध झेंड्याखाली पुन्हा एकदा गुदमरला गेला जाती पातीच्या राजकारणालाच आपसूक बळी पडला कामा  पुरता मामा , कळंला ना  त्याना राजकारणी कावा खाण्यापिण्यासाठी गुलामी पत्करून  जिंदाबाद , मुर्दाबाद गरजला  सत्तेसाठी घेऊन झोळी ,लाजत आली  कमळाबाईतळ्यात - मळ्यात करीत सावध झाला  धनुष्य बाणपटरी सोडून रेल इंजिन निघालं आश्वासनांचा धूर सोडतघड्याळ म्हणाल  हात मिळवणी करावी कि करावा  टाटा तुम्ही आम्हाला वोट द्या , आम्ही फक्त चोट देवू पाहिजे तर  गांधीछाप देऊ  पाच वर्षे तोंड न दावू , पाय पडतो तुमच्या ,फक्त एकदा निवडून द्या भाऊ स्वातंत्र्याने  सत्तरी ओलांडली तरी  उघड गुपित आम्हाला  कधी कळलेनाहीज्याच्या हाती ससा, तोच इथे  पारधी , मरणाचेही भांडवल करणारे  गारदीआबासाहेब म्हस्के  

अपेक्षांचा अपेक्षाभंग ...
 23 February 2018  

ऑनलाईन साईटवरून मित्राच्या घरच्यांनी त्याचं ठरवलेलं लग्न अखेरीस मोडलं .कारणं दोन -1. मुलीला मुलाच्या घरच्यांसोबत रहायचं नाही पण लग्नानंतर मुलीचे आईवडील मात्र मुलीसोबत रहाणार .2. पोरीचं शिक्षण , तिची एकूण पात्रता आणि तिच्या अपेक्षा यांची एकत्र तुलना केली तर सगळ्या गोष्टी एकमेकांपासून कोसकोसभर लांब होत्या .मित्राला क्ष म्हणूया .क्ष इंजिनियर झालाय .वर्षाचं पॅकेज काही लाखात आहे .वागणं , बोलणं , रहाणं अतिशय उत्तम. अगदी हरिश्चंद्रानंतरची ही एकमेव पैदाईश आहे की काय असा समोरच्याला प्रश्न पडेल एवढा सभ्य . वयाने माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे .त्याच्यासोबतच्या मित्रांची लग्नं झाली , ते सेटल झाले म्हणून ह्याच्या घरच्यांनी याच्यामागेही लग्नाचा लकडा लावला .अखेर हो- नाही करता साहेब तयार झाले . अगोदर ओळखीत मग विवाह संस्थेत आणि सरतेशेवटी ऑनलाइनवर येऊन गाडी थांबली . जाती - धर्माचं बंधन नसल्यामुळे केवळ सुशिक्षित आणि चांगली असावी एवढीच घरच्यांची अपेक्षा . फारशी शोधाशोध न करता एक मुलगी पसंत पडली . ऑनलाईन पत्रिका एक्सचेंज झाली , ऑफलाइन जुळवाजुळवही झाली . पत्रिका जुळत्ये म्हणून घरच्यांनी पुढची बोलणी करायला सुरुवात केली . अगदी पारंपरिक पद्धतीने 'बैठक' झाली नसली तरी अनौपचारिक भेट घेऊन काही बोलणी ठरली . घरच्यांच्या परवानगीनेच यांच्याही भेटीगाठी सुरू झाल्या .तोपर्यंत महत्वाच्या विषयांवर कमी आणि हवा - पाण्याच्या विषयांवरच त्यांचं जास्त बोलणं व्हायचं . मित्र शांत असला तरी भिडस्त नाही त्यामुळे खाजगीत निवांत भेट झाल्यावर त्याने अगदी स्पष्टपणे त्याच्या अपेक्षा सांगून टाकल्या .त्याचं बोलणं ऐकल्यावर तिनेही वर सांगितलेल्या तिच्या अपेक्षा सांगितल्या . झालं , पुढच्या दोनच दिवसात लग्न मोडलं .या सगळ्यात दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचा मला उहापोह करावासा वाटतो .1. स्त्री - पुरुष समानतेचा एवढा डंका पिटायचा तर जो नियम त्याला तोच तिलाही का नाही ?2. जोडीदाराबद्दलच्या प्रत्येकाच्या अपेक्षा , स्वप्नं भव्यदिव्यच असतात नव्हे असाव्यातही .मात्र ही स्वप्नं पहाताना आपण जमीन तर सोडत नाही ना ? हे पण कळायला हवं की .दर रविवारी मोठमोठ्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत वर- वधू पाहिजेत ह्या शीर्षकाखाली ढिगाने जाहिराती असतात . लक्षपूर्वक वाचल्यास लक्षात येईल की स्वतः दहावी -बारावी फार फार तर ग्रॅज्युएट वगैरे होऊन ,  किडुकमिडुक काम करणाऱ्या किंवा जेमतेम महिना भागेल असा व्यवसाय/ नोकरी  करणाऱ्या मुला- मुलींच्या अपेक्षा फक्त देव खाली आला तरच पूर्ण होऊ शकतील .( अमेरिकेची आर्थिक आघाडी - महानगरपालिका- उंदीर मारण्याचा विभाग , प्रकर्षाने आठवण झाली .) याच कारणांमुळे अविवाहित किंवा उशिरा लग्न होणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे .असो , प्रश्न ज्याचा - त्याचा आहे .मित्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पोस्ट लिहायला परवानगी दिलेली असल्यामुळे इति लेखनसिमा ...!- आदित्य शेखर कुलकर्णी .