मुंबई LIFELINE - An article by Rupali

आज कस अगदी fresh आणि छान मोकळं मोकळं वाटतंय. का? नका विचारू.?, एवढं मोकळं ह्या आधी, इथे कधीच वाटलं नव्हतं.! अरे मुंबईची lifeline लोकल ट्रेन रिकामी आहे ss आणि आज चक्क मला, काहीही त्रास सहन न करता, बसायला मिळालाय आणि तेही window seat. कशी मिळाली? अरे आज Sunday morning त्यामुळे मस्त निवांत बसण्याचा योग आला आहे नाहीतर its impossible!

        Local train म्हणजे मुंबईची 'lifeline' पण या lifeline न प्रवास म्हणजे जीव अगदी नकोसा होतो. आता सेंट्रल line ला राहायला आल्यापासून तस खूप कमी वेळा सीटवर बसायला मिळत. एरव्ही ट्रेनमध्ये उभं राहायची पंचायत. बहुतेक प्रवास तर ट्रेनच्या door ला लटकूनच, (हवा खान्यासाठी म्हणून न्हवे तर प्रवासाला पर्याय नाही म्हणून) आणि कधी तर, मग चोरत उतरण्यासाठी मार्ग काढत अंगभर घाम गाळत, अनेक कसरती करत, massage करवून घेत सगळ्यां speed breakers ना कसं बसं पार करत आणि good luck ने चौथ्या seat वर बसूनच प्रवास होतो. Daily प्रवास करणाऱ्यांसाठी एखादा गड जिकल्यासारखं आहे हेे.!!😅  

        रोजचा अंबरनाथ ते ठाणे आणि तिथून पुढे वाशी ट्रेन पकडून नवा प्रवास..; सकाळी जाऊन संध्याकाळी return; approx इथून तिथून २ तासाची journey आहे. पण खरंच destination वर पोहचणं, म्हणजे एखादी achievement झाल्यासारखं वाटत. बर गर्दी दरम्यान, आत बसायला जाव म्हटलं; तर पुन्हा बाहेर पडायचे वांदे. त्यात daily कामावर जाणार्यांनी स्वतःचे असे नियम बनवलेले ते वेगळे; एका seat वर जर ४ जण बसले असतील आणि त्यापैकी कुणीही उठला तर नवीन माणसान चौथ्या seat वरच बसायचं. "आमचा रोजचा group आहे, आम्ही इथंच door मधे उभं राहणार." कधी कधी वाटत लोकशाहीचा ही लोकच किती गैरफायदा घेतात.

        त्यात रोजच्या रोज लेडीज डब्यात, किमान २ भाडणं तर अगदी न चुकता ठरलेली. त्यातले अनेक शब्द प्रयोग ऐकताना, कानातून वाफा येतायत अस वाटतं.? यार कुठे आलो आहोत आपण.?? ह्या intelligent लोकांमध्ये हे अस विनाकारण, अर्थहीन discussion का करतायतय हे.?? मला तर वाटत प्रत्येक लोकलच्या डब्याला आता ह्याची सवयच झाली असेल आणि भांडण नाही ऐकलं तर त्या मुक्या डब्यालाही, चुकल्यासारखं वाटत असेल.😅

        पण हे सगळं पाहताना खरचं खूप दुःख होतं. प्रवासाला कारण आहे मात्र तो असा.?? त्यातल्या अनेक स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसणारं tention, ताण, थकवा आणि जिद्दही ठळक दिसते. मुंबईत, घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री म्हणजे; अगदी झाशीच्या राणी पेक्षाही कमी नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लढाईच असते तिची. काय काय आणि किती करत असते ती..!! घरातली कामं, मुलांचं आवरा, नवरा मग घरातली नाती-गोती सगळ्यांची मन राखुन, घड्याळाच्या काट्यासारखं धावत पळत, वेळेत job वर हजर राहणे. रोजचं ठरलेलं गणित. आता अंगवळणी झालय…! आणि बर का, ह्या दिवसभराच्या गणितात एक जरी चूक झाली, तर तिच्या हाती बाकी काय.; ती शून्य.! चुकून घरचं काही करण्यात राहून गेलं, तर घरचे आहेतच शिकवायला आणि कामामध्ये काही प्रोब्लेम झाले तर boss...! पण आता मात्र मुंबईतल्या आधुनिक स्त्रिया, ह्या ट्रेनच्या पळापळीत आता सगळ्याचाच ताळमेळ राखायला शिकल्या आहेत; न्हवे तयार आहेत.!!

 अस म्हणतात, राग हा आपल्याच माणसांवर काढला जातो; कदाचित ह्या ट्रेन ने प्रवास करणाऱ्या स्त्रियां बहुतेकश्या समदुःखी असल्यामुळे नकळत आपुलकी निर्माण होऊन, एकमेकांवर राग काढवासा वाटत असेल. मला नाही वाटत की त्या स्त्रिया,  एवढा राग घरी किंवा office मधेही कुणावर काढत असतील. सगळा शीण, भडास इथे ट्रेन मधल्या भांडणात मुक्तपणे निघताना दिसते. ह्या ladies डब्ब्यात, भांडणातून नको नको ते सगळं बोललं जातं, अगदी चांगल्या वजनदार शब्दांनपासून ते कान बंद करावे लागतील अश्या हलक्या शब्दापर्यंत. का अश्या ह्या भांडतात.? का अश्या शिव्या शाप देतात.?? काय अपेक्षित असावं.?? पण खरं सांगू, हे सर्व भांडण उरकल्यावर एक वेगळीच शांती आणि relief असतो त्यांच्या चेहऱ्यावर.!! हो मी पाहिलंय.!! आपल्याला भूक लागली असेल आणि अचानक कुणीतरी pizza आणून द्यावा तसे काही भाव दिसतात त्या चेहऱ्यावर. अगदी meditetion केल्यासारख्या relax होऊन जातात. यातल्या बऱ्याच स्त्रीयांसाठी, ही एकमेव relaxation thearpy असावी. कारण काही वेळा; खरच गरज नसतानाही भांडण उकरली जातात आणि मनाला शांती मिळेपर्यंत हवी तशी भांडलीही जातात. घरातील सहवासातल्या माणसानंपेक्षा; ऑफिस मध्यल्या लोकांवर राग काढण्यापेक्षा; एका अनोळखी माणसावर हाथ धुऊन घेतले तर कोण आहे विचारायला.?? त्यातही काही एवढ्या बेफिकीर, की आजूबाजूला काय चाललय ह्याच काही सोयरसुतक नसत ह्यांना, आपल्याच धुंदीत, कानाला Earphone लावून, डोळे बंद करून, स्टेशनला उतरेपर्यंत ध्यान, तसच ध्यान करत मग गर्दी डब्यात कुठेही लोटून घेऊन जाऊदे; डोळे तर आपलं स्टेशन आल्यावरच उघडतात. हे सगळं ठरवून होतं की आपसूक होतं.??

        उभही राहता येणार नाही इतकी गर्दी असूनही ह्या स्त्रिया सणवारही अगदी सगळा ताण विसरून आनंदाने साजरे करतात. कधी दसऱ्याला गाडी चे handles तोरणाने सजवून, दिवाळी ला लहान लहान कंदील बांधून तर कधी ही train पताक्यानी सजलेली दिसते जणू स्वतःच घर असल्यासारखं सजवतात सगळं अगदी पारंपरिक पद्धतीनं. कधी तरी यांना गरबा खेळतानाही बघितलं होत.  या धकाधकीच्या जीवनात वेळ काढायचा आणि सण साजरे करायचे म्हंटल तर कसाही वेळ निघू शकतो फक्त ती गोष्ट करण्याची उमेद पुरेशी आहे हे शिकायला मिळत यावरून.

        पुरुषांच्या डब्यातही याहून वेगळं काही आहे का.? असेलच कदाचित, हो पण स्त्रियांच्या डब्यांत जे घडतं त्याहून वेगळं नसेल बहुतेक; पुरुषांच्या डब्यातुन भजनांचा ही आवाज येतो कधी कधी ...

        यात वाईट वाटत ते handicap डब्यात प्रवास करणाऱ्या अपंग लोकांचं. रेल्वे प्रशासन अजूनही त्यावर काही विचार करेल ही अपेक्षा. एखादा wheel chair वर चालणारा व्यक्ती आला तर ट्रेन आणि door च्या मधील slider अभावी तो स्वतंत्रपणे ट्रेन मधे चढुही शकत नाही. मग काही मदत करणारे हाथ पुढे येतात आणि त्याला ट्रेन मधे चढवले जाते. आधीच त्यांना नॉर्मल माणसासारखं प्रवास करण अशक्य असत त्यात काहीही व्यंग नसणारी माणस उगाच त्या डब्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असतात ते बघून अस वाटत हीच abnormal मानस आहेत.

        आणि एक, आश्चर्य वाटत सगळ्यांना प्रवाश्यांना पाहिलं की, म्हणजे आपणही त्याला काही अपवाद नाही; पाहिलं आपल्यालाच ट्रेन मधे चढायला मिळायला हवं आणि उतरायलाही. स्वतःच स्वतःचे नियम केलेले.  ह्या गडबडीत, १५-२० च्या जागी; जेमतेम ७-८ जणच ट्रेन पकडण्यात यशस्वी होतात, ही गोष्ट वेगळी.  आणि ह्या सर्वात, काही वेळा luck ही depend करत बरं का..!

        अश्या हया मुंबईच्या lifeline चा आपल्या दैनंदिन जीवनात खारीचा वाटा आहे. जर ही lifeline थोडा वेळ जरी late असेल किंवा बंद असेल तर सगळंच विस्कळीत होताना दिसत.

        हा माझा मुंबई lifeline चा अनुभव होता. तुमचेही काही असेच अनुभव असतील तर जरूर share करा.


रूपाली कुटे बावकर

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.