किशोर झोटे यांची प्रेरणादायी मुलाखत

स्टोरीमिररवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेख लिहणाऱ्या किशोर झोटे यांची प्रेरणादायी मुलाखत:
नक्की वाचा

१ ) आपले पूर्ण नाव - किशोर भीमराव झोटे


२ ) आपले शिक्षण कसे झाले याबद्दल सविस्तर सांगावे - १ ली ते ७ वी ठाणे मनपा शाळा क्र. ३४ तर  ८ वी ते १० वी मो.कृ. नाखवा हायस्कुल ठाणे. पुढे ११ वी मिलिंद विज्ञान कॉलेज औरंगाबाद १२ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य विदयालय औरंगाबाद. डी.एड. शिशु विकास अध्यापक विदयालय औरंगाबाद. बहि:स्थ बी.ए. व मराठी एम.ए. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद. दुसऱ्यांदा बी.ए. मराठी स्पेशल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ नाशिक. संमंत्रक, गांधी विचार , मानवाधिकार इ. पदवी व पदवीका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ नाशिक येथून. बहि:स्थ बी.पी.एड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद. भोज विद्यापीठ अपंग विद्यार्थी पदवीका अभ्यासक्रम.


३ )  आपल्याला साहित्याची आवड कशी निर्माण झाली? आपल्याला लेखनाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

- आजोबा आईचे वडील कालकथित भिकाजी दशरथ मगर 

व मामा प्रा. सुभाष भिकाजी मगर यांच्या कडून साहित्याची आवड व लेखन प्रेरणा.


४ ) साहित्याशी संबंधित कोणकोणत्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला?

- पुस्तक घेण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नसल्याने बचत करून किंवा खाऊ ऐवजी पुस्तक घेत असे. तेंव्हा पोस्टाने साहित्य पाठवावे लागायचे. पोस्टेज खर्च व सहभाग शुल्क पाठवणे तडजोड करतांना कधी माघार घ्यावी लागे.


५ ) आजच्या साहित्याबद्दल आपले काय मत आहे?

- प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड करत आहे.


६ ) आजच्या डिजिटल आणि सोशल मिडीयामुळे साहित्यिकांसाठी कोणत्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत ?

- वैश्विक संधी उपलब्ध होत आहे. वाचक वर्ग मिळत आहे.


७ ) आपल्या साहित्याबद्दल सांगावे ?

- इ. ८ वी मराठी सहामही परीक्षेत निबंध लेखनात पहिला पाऊस यात पहिली कविता लेखन. कॉलेजमधे कविता लेखन डी.एड. ला वर्ग मित्र सतिष कबाडे याच्या मदतीने साप्ताहिकात पहिली कविता छापून आली. याच दरम्यान विविध प्रकारचे लेखन. दैनिक, साप्ताहिक , मासिक, त्रैमासिक,षण्मासिक, वार्षिक, द्वैवार्षिक व दिवाळी अंकात लेखन. विनोदी कविता पक्या प्रेमात पडला पहिली बक्षिसपात्र कथा. आता वेळे अभावी लेखन खंड पडत आहे.


८ ) आपली पहिली साहित्यकृती कोणती आणि ती कशी प्रकाशित झाली ?

- डी.एड. ला वर्ग मित्र सतिष कबाडे याच्या मदतीने साप्ताहिकात पहिली कविता छापून आली.


९ ) साहित्यिक सन्मान आणि पुरस्कार याच्याशी आपले कसे नाते आहे?

- बरेच राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मात्र लेखन हे स्व आनंदासाठीच करत आलो आहे.


१० ) नवोदित लेखकांना आपण काय संदेश द्याल?

- वाचन वाढवावे व आपले लिखान आधी आपण व नंतर आपल्या जवळच्या व्यक्तीस वाचनास दयावे. दुरुस्ती करून सर्वांसाठी पोस्ट करावे. कोणी त्रुटी दाखवल्यास स्विकार करा. प्रसिध्दीसाठी नाही तर स्वतःला व्यक्त करण्यासाठी लिहा.


११ ) स्टोरीमिररवर लिहिण्याचा आपला अनुभव कसा आहे?

- खूपच छान.


१२ )  स्टोरीमिररबद्दल काही सांगावेसे वाटते?

- मी स्वतः लिहतो व इतरांना स्टोरी मिरर वर लिहण्यास सांगतो व अडचण आल्यास मदत करतो. लेखक व लेखीका असे दोन WA ग्रुप बनवुन लेखक दिले आहेत. 

    स्टोरी मिरर बदलत्या काळानुरूप बदलत असून. मंच व ऑडिओ हे नवेपन असलेले टॅब उपलब्ध करून दिले आहे व सहा भाषांत विविध स्पर्धा सर्व वयोगटांसाठी आयोजित करत आहे. खरं तर आम्ही लेखक मंडळी या संधीचा फायदा घेण्यास कमी पडत आहोत.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.