LyricalAjinkya

#न पाहता#
न पाहता ..न पाहता ..
मन हे माझे झाले तुझे ..ना कळे हे होते कसे ..
जिव माझा का गुंततो ,तुझ्याचसाठी का झुरतो ..

न पाहता ,तुला न पाहता ..
बावरलो कसा ,तुला न पाहता ...

न पाहता ..न पाहता ..
जग हे वाटे सारे नवे..भावनांचे उडती थवे ..
तगमग का काळजाची ..वाढे ओढ भेटीची ...

न पाहता ,तुला न पाहता ..
बावरलो कसा ,तुला न पाहता ...

न पाहता..न पाहता..
साथ दे तू माझी जराशी , ना वाटे भीती कशाची ..
शब्द शब्द मी वाचतो ,वाचुनी पुन्हा का  हासतो ....

न पाहता ,तुला न पाहता ..
बावरलो कसा ,तुला न पाहता ...

-- LyricalAjinkya

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.