ओ वुमनिया


    काय प्रचंड महापूर आणि ऊत येतो सांगू,महिलांना या महिला दिनीच्या स्तुती सुुुुमनांचा काय विचारूच नका,भ्रमणध्वनी नुसता ओसंडून वाहत होता शुभेच्छांच्या वर्षावात. काय जड जातंं माहिती आहे? पंंच पक्वान्न जेवल्या सारखंच वााटतं! ८ मार्च! जगभरातील सरसकट सगळ्या महिलांचा दिवस! का हो? एवढा पुळका? फक्त ह्या एकाच दिवशी? घरातल्या लक्ष्मीला फक्त तो एक दिवस? ८ मार्च ? का? एकचं दिवस समजुन घ्यावं तिला? मी पुरूषांवर ठपका नाही ठेवत हया बाबतीत आणि ठेवणारही नाही! काही घरात बाई, बाईलाच समजुन घेत नाही, आणि ती ही त्याच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतुन तावून,सुलाखून, अनुभव घेऊन निघालेली असताना सुद्धा! स्वतः एक बाई, असुुन?


१. रूपाली- असेल 30 वर्षांंची,सासू कडून तिने तिचं हक्काच स्त्री धन मागितल म्हणुन ,तुझ्या लग्नात तुझ्या आई वडिलांनी काय दिल?ना हुुंडा ना ,सोनं नानं? आणि ह्या एवढ्याशा गोष्टी वरून सासुने तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली,झालं  रूपाली आज नैराश्य आणि उदासीनता ह्यांची बळी आहे.  


२.तेजश्री- नुकतीच ४-६ महिन्यापूर्वी आई झालेली,खूप उत्साही,बाळासाठी हे करायचं,ते करायचं,हे नको,ते नको,पण घरात तिच्या लांबच्या आत्या होत्या,त्या तिच्या बाळा बद्दल एवढं अतिप्रेम दाखवायच्या की तेजश्री चिडचिडी होऊ लागली,ना तिला होणारा त्रास तिला बोलून दाखवता यायचा,ना व्यवस्थित रित्या व्यक्त होता यायचं,आतल्या आत घुसमटत बसायची,आपल्या पेक्षा आपल्या बाळावर कोणी दुसरंच नाहक हक्क सांगतयं,ति ही हळू हळू नैराश्याकडे झुकलीचं.


३. तृप्ती-ही काम करणारी महिला, आय मीन आजच्या भाषेत वर्कींग वुमन, घरचं जेवढ सांभाळून घेता येईल ते सांभाळून कामावर जाते,अर्थात मुलं सासुआईच सांभाळतात,सगळं करतात मुलांसाठी पण,जिकडून मारता येईल तिकतिकडून,मुद्दाम तृप्तीला टोमणे मारणारचं,आमची काय,पर्स उचलंली की चालली,सगळंच ह्या उतारवयातही मलाच करावं लागतं हो!आणि सासुआईंचा मान त्या हे जितकं तिला ऐकवायच्या,तितक्याच पटीने कमी होत चाललेला,अर्थात हे ऐकवून त्यांनी सगळया करणीवर पाणी तर फिरवलंच होतं पण तृप्ती ला मनोविकाराच्या दरीतही ढकलून दिलं होतं!आणि ती सल तिला टोचतं रहायची,की तु काहीही करत नाहीसं,तुझ्या मुलांसाठी ही तु काहीच करू शकत नाहीस आणि जाॅब तर जरूरीचं आहे,नाहीतर कसं भागणार,एकाच्याच पगारात?


४.आशा-ही ६० ची आहे बरं का,सगळंच करते आवडीने,मुलगा सुन दोघेही कामावर जातात,नातवंडांना तयार करून,भरवून,डब्बे वगैरे सगळं करून,शाळेच्या बसपपर्यंत सोडून येऊन,परत बसची वेळ झाल्यावर आधीच तिथे हजर,वयाच्या मानाने चटपटीत,सगळीच कामं पटापट आवरून मोकळी,पण हीला सगळ्यांनीच गृहीत धरलं होतं,की तिला ही ,तिच्या आवडीचं करावं वाटतं असेल ?ह्याचा कोणी विचार करत नव्हतं,ती मध्येच उदास व्हायची,आधी सासुसासरे,नवरा,मुले,आत्ता त्यांची मुलं सगळयांसाठी जगले! माझ्या साठी?मी काहींच नाही केलं,अशिच मरून जाईन का मी? माझ्या ईच्छा मारून? ही पण नैराश्याचा सदस्य होती,आहे!


५. पुजा-हीने सर्वांना खुश ठेवायचा पणचं केला होता जणू,कोणी काही तोंडातून शब्द बाहेर पाडायचा अवकाश,ही सेवेसाठी प्राण पणाला लावून प्रसंगी रात्रंदिवस झटून,दिलेला शब्द पाळणारचं आणि ते त्यांना करून देणारचं,पण तरीही घरातले समाधानी नव्हते,मग हळुहळू सोडायला लागली,कुठे महत्त्व दयायचं,कुठे नाही तिला कळू लागले पण घरातल्यांना बदललेला स्वभाव फार रूचला नाही मग काय ही रोज घरात खडाजंगी खडाष्टकं. पुजा आपल्या हक्कांसाठी अकरावा रूद्र बनली होती, नैराश्याला आपला गुरू मानुन!


६.विशाखा- हीचं बालपण खुप खडतर गेलेलं,आई वडील असूनही त्यांच प्रेम न मिळालेली,दुखाःच्या बाबतीत दुःखाचे परडे जवळ जवळ 95% भरलेलं,सुख कमीच,लग्नानंतर सगळं चांगलं असूनही नैराश्याने तिला कवटाळलंच,अस्तित्वाची पाळेमुळे खणून काढू लागली,बालपण,सासरपणाची बोचरी मानसिक टोचणी तिला मोठ मोठी आजारपणं देऊ लागली,कोणालाही  तीचं चुक नसेल तर  ती काहीच बोलत नसायची,पण त्या मुळे तिची प्रतिकारशक्ती कमी होतं होती,तिचे डाॅकटर तिला एकदा बोललेच, तु जे वाटतं ते बोल,स्वतःला दरवेळी वाईट वाटून घेण्यासाठी तु जन्म नाही घेतला,ज्याचा राग त्याच्यावरचं काढत जा,कुढत बसलीस की तु कितीही पौष्टिक खा,मन शांत नसेल तर तु अशिच आजारांना आमंत्रित करत राहशिल,बोलून दाखवाता आलेच पाहिजे,तुझ्या केस मध्ये. मग विशाखाने विचारांती ठरवलं,नाही पटलं कोणाचं त्यांना बोलायचं,आणि नाही म्हणायला शिकायचं आणि तु तर त्रास खाऊन,पिऊन मोठी झाली आहेस,तेव्हा ही त्या परिस्थितीत तु खुश रहायची ना गं,घरातलं घरी ठेवायचीस,आणि बाहेरून घरात काहीच आणतं नव्हती तु?अगदी नको ते विचारही,अगदी सोपं आहे आता ही,आपल्यावर असतं सगळं,आपण करून घेतला, तरचं त्रास होतो!नाहीतर काय मजाल आहे कोणाची? जो आपल्या विरोधात जाऊन आपल्याला त्रास देईल! आणि क्रमांक १-५ सगळ्या मैत्रिणी बरं का विशाखाच्या , तिने ना एक वसा घेतला होता हाती,तिने जसं स्वतःला नैराश्यातून बाहेर काढलं,ती सगळया मैत्रिणींना त्यातून बाहेर काढेल,नाही काढून दाखवेनचं हा तिचा आत्मविश्वासच! आणि तिने विचार केला आपण एक साखळी बनवू शकतो, मैत्रीणी नैराश्यातून बाहेर पडत पडत ,त्यांच्या मैत्रिणींना बाहेर यायला मदत करतील आणि हा नैराश्याचा,उदासीनतेचा विकार मुळापासून उपटुन फेकून दयायचा ,अगदी एवढ्या दूरवर फेकायचे? की परत त्याचं बिज,पाळेमुळे परत कधीच रुजता कामा नये,नाही त्या सुकलेल्या बियाणांची आपल्या घरी नेऊन मशागत करावी कोणीही! 


विशाखाची साखळी कामाला लागली होती,आहे,बऱ्याच मैत्रिणींना मदत झाली हया साखळीची,कोणी जास्तचं त्रस्त दिसायचं तेव्हा ,विशाखा त्यांना समजावून सांगायची,मेंदू ला सांग त्रासाला लांब ठेव,तु करून घेते आहेस म्हणुन होतोय तुला त्रास ,तु नको करून घेऊस मग बघ?काही कठिण नाही,कोणी काहीही बोललं,तुझ्या मनाला लागल तर तु तो त्रास त्या माणसा बरोबर घालवुन टाक,तुझ्या मेंदूत त्याला खायला प्यायला घालून त्याच वर्षानुवर्षे आदरातिथ्य करत बसू नकोस,हुसकावून लावं त्या नैराश्याला,अगदी मुजोर आहे तर घे काठी हातात आणि यथेच्छ बदडून काढ त्याला,सोडून दे,मन गुंतवून ठेव तुझ्या छंदात,गाणी ऐकत रहा आवडीची,परत लहान मुल हो,मजा कर ,अहं... सगळं घरटं आवरून हं, स्वतःवर प्रेम करायला शिक,काळजी घे स्वतः ची,मग्न ठेव एखाद्या चांगल्या कार्यात मग बघ,स्वतःला बदल ,समोरचा माणुस बदलत नसतो,ठामपणे नकार दयायला शिक,तु घरातील महत्वाची कडी आहेस,तु कोलमडून पडलीस की अख्ख्या साखळीचं गणित बिघडेल कायमचं! विशाखा नेहमीच म्हणते मला ना सगळं करायचं आहे पण घरचं सांभाळून,आणि मला कधिही अचानक मरण आलंच,तर मी त्या क्षणी एवढी परिपूर्ण हवी की माझ्या चेहऱ्यावर दुःख नाही समाधानी हसू असावं! अरेरे मी काहीच नाही जगले?माझं हे राहिलं?ते राहिलं?मी उगाच नको त्या गोष्टींना प्राधान्य देत राहिले,किती गोष्टी,छंद,आवडी निवडी अर्धवट,अपूर्ण राहिले,अरेरे? हेच अरे,अरेरे नको आहे मला! जिवन एकदाच मिळतं,माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही,ही वन टाईम इन्वेस्टमेंटआहे,जे आहे,हेच आहे,इथेच वर्तमानकाळतच जग,भूतकाळ,भविष्यकाळाचा अतिरेकी हल्ला नको करूस मेंदू वर,एवढासा जिव आहे तो,किती कचरा भरालं?चांगल्या गोष्टी टाक ना त्यात.............

    शेवटी काय आपणच बदलूया,ज्यांना खरंच बदलायला आवडतं त्यांनी जरूर बदलाव,ज्यांना नाही बदलायचं  रडत बसा आयुष्यभर उगाचच,आणि जमलंच तर नक्कीच आपल्या आजूबाजूला बघा तुम्ही सगळयांच बाबतीत सुखी आहात,ओढून ताणून दुःखी राहून पुढची पिढी ही तशीच बनवायची? नाही ना? मग बदल करा स्वतः मध्ये,एकमेकांना घरातल्या बायकांना,बाईने समजुन घेत, मग नाती कोणतीही का असेनात? मगचं खऱ्या अर्थाने महिला दिन साजरे होतील,आणि  ते गाणं आहे ना त्यावर ह्या सगळ्या नैराश्य मुक्त महिला रोजच महिला दिन साजरे करतील.......ओ वुमनिया......अहा वुमनिया ....ओ वुमनिया!


  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.