नीतिमत्तेच्या ठेकेदारानो !..

नीतिमत्तेच्या ठेकेदारानो !... सावधान गाठ माझ्याशी आहे
आरे ! तुम्ही करून करून तरी काय करणार ?
तेच तेच तत्वज्ञानाचे डोस पाजणार , अक्कलेचे तारे तोडणार
साधू संतही थकून गेले , तर तुमची काय बिशाद ?

सत्यावर करून कुरघोडी , असत्याची बांधूच माडी
म्हणे क्रांती करणार डोंबलाची ? आरे समाज कीर्तनांनी सुधारणार
ना तमाशानी बिघडणार . इतिहास साक्षी हे असच चालायचं ...
नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! करा हवं ते ...आम्ही नाहीच बधणार ...

आपुन तर बाबा मर्जीचे मलिक , काय बी झालं तरी तुमीच आका
विचार करण्याची गरचच काय ? , तुमचाच झेंडा जिंदाबाद ...मुर्दाबाद
आरे सुधरा रे ...तुम्ही ओरडा घास फुटेस्तोवर आम्हाला त्याच काय ?
नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्ही लाख म्हणाल आम्ही नाहीच सुधारणार

तुमचं आपला नेहमीचंच तरुण पिढी बिघडली नाहक बोंबलताय
आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू , तुम्हाला हवं ते तुम्ही करा
चांगले - वाईट तेव्हाही होते अन आजही आहे, आम्हाला कशाला दोष देता
नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्ही कशाला आम्हाला अक्कल शिकवताय

कौप्या करू , पेपर फोडू ? काहीही झालं तरी पासच होऊ ...
नाही तरी शिकून माही कुठे हापिसात हुनार, आम्ही बरे
भाई , दादा , अमक्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष , तमक्या पक्षाचे संघटक
नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! तुम्हाला काय कळतंय राजकारणातलं ...

ठरलंय आमचं कागदी घोडे नाचवण्याचं , साऱ्यांनाच दारिद्र्य रेषेखालील यादीत टाकायचं पूर्वीचे संस्कारकेंद्रे आता पदव्याचे कारखाने जगाचा पोशिंदा पोरका , भारवाही मेला वाहता ओझे ...
आपली अक्कल किती माहित्येय त्यांना विहिरीतच नाही पोहऱ्यात कुठून? ...फाटकी झोळी , फुटकी थाळी , आमच्यासारखे दळभद्री आम्हीच ... नीतिमत्तेच्या ठेकेदारानो ! कशाला रक्त आटवताय उगाच आमच्या सारखे आम्हीच ...

आबासाहेब म्हस्के
दिनांक ०१/०२/२०१८

LikeShow more reactionsComment


  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.