आयुष्यावर बोलू काही.....

Vasudha Naik

Vasudha Naik

1 November 2018 · 1 min read

आयुष्यावर बोलू काही.....

आयुष्यावर बोलावे
वाटले जरा मला
सांगावेसे वाटले
मनातले मी तुला.....

आयुष्य  सर्व वाहिले
मी माझ्या कुटुंबाला
जीव लावला मुलाबाळांना
हाती सुखाचा प्याला आला....

जीवन अर्धेअधिक सरले
आयुष्याच्या हिंदोळ्यावर रमले
गतकालातील आठवणीत
मी मात्र सुखावले......

आई बाबांची एकुलती एक कन्या
सुखात,लाडाने मी वाढलेली
लग्नानंतर वैभव मला मिळाले
त्यांच्यातच मी रंगून गेली....

संसार झाला सुरू माझा
स्वप्नवत आयुष्य सुरू झाले
मौज, मजा , थोडी जबाबदारी
दिवस भुर्रकन जावू लागले....

मध्यांतरी वैभवचे आजारपण आले
मी मात्र खचून नाही गेले
सर्वच येणार्‍या परिस्थितीला मी
मात्र धीराने तोंड दिलै.....

मुलांना लाडाने, शिस्तीने वाढविले
शाळेतही उत्तम कार्य केले
सर्वांच्याच कौतुकास मी पात्र ठरले
नवजीवनास मी सामोरी गेले.....

दररोजच्या व्यापातून जरा
मी बाजूला थोडी सरकले
कविता , चारोळी , बालकाव्य
याचे लेखन मी करू लागले....

जीवनाच्या  या नव वाटेवर
कवितांचा मज ध्यास लागला
नमन सर्व गुरुजनांना माझे
ज्या सर्वांमुळे माझा हा छंद वाढला....

माझ्या कविता आता प्रसिद्ध
होवू लागल्या आहेत स्टोरीमिरवर
सर्वांच्याच साथीने माझे नाव
कोरू लागेलय वाचकांच्या ह्रदयावर......

*वसुधानाईक,पुणे*

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.