रम्य पहाट

Vasudha Naik

Vasudha Naik

27 October 2018 · 1 min read

🌄      

कोंबड्यानं बांग दिली
रम्य पहाट झाली

वासुदेव आला
गाणं गाऊ लागला

झुंजूमुंजू झालं
उजाडाया लागलं

सूर्य डोकावू लागला
सोनैरी किरणं दारी
माऊली सडा घाली दारी

सोनेरी किरणांनी
न्हाली धरती
पक्षी घरट्यातूनी
बाहेर पडती

पृथ्वी जागी झाली
सर्व प्राणीमात्र
आवरू लागली
आवरून मुलं
तयार झाली
शाळेला निघाली
माय माऊली
कामाला लागली

*वसुधा नाईक,पुणे*

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.