केळ्यांची कटकट!

https://thinkaddictworld.blogspot.com/2020/02/blog-post.html

डिस्क्लेमर  : हे लिखाण एका सुग्रण बायकोने बनवलेल्या केळ्याच्या रेसिपीचे नाही!

त्या दिवशी  मी पार्किंग वरून किराणा दुकानात जात होते. समोररून रस्ता ओलांडून एक म्हातारी महिला (निश्चितपणे ७५ वर्ष पेक्षा जास्त) चालत येत होती. ती माझ्या कडे बघून जोरात ओरडली "एफ ** क  यू" आणि पुढे चालू लागली ! मी आजू बाजूला बघितले। तसे जवळ कोणीच नव्हते.  मला धक्काच बसला. मी थांबले, मागे वळून मी तिच्या कडे बघतच राहिले. या युगात अमेरिकेत बऱ्याच लोकांना स्थलांतरित लोक आवडत नाहीत. मला वाटले की वंशविद्वेष आणि माझ्या त्वचेचा रंग यावर आधारित द्वेष असावा. हजारो विचार माझ्या डोक्यात आले. मी तिचा सामना करावा का? नको  ... ती माझ्या आजीचे वयाची आहे. दुर्लक्ष करेन अस ठरवलं . मी तिच्यापासून  माझे लक्ष वेधण्यापूर्वी ती वळली आणि तशीच थांबली. मी ठाम ठरवलं कि आता जर का परत काही वाईट बोलली तर मला विनम्रपणे तिला सांगावे लागेल की हे वर्तन स्वीकार्य नाही. ती पुन्हा इंग्लिशमध्ये मोठ्याने रागाने ओरडून  म्हणाली (ह्या वेळी दुसरी कडे बघून ) ”मी तुला बर्‍याच वेळा सांगितले कि मला हिरवी केळी आवडतात ” तुम्ही परत पिवळ्या रंगाचिंच केळी निवडली होती. मी गोंधले की हिला कसे माहित की मला हि थोड़ी कच्ची हिरवी केळी आवडतात ! मी ती कुठे बघते तिथे लक्ष केंद्रित केले. ती एका म्हाताऱ्या आजोबांना बोलत होती जो नक्कीच तिचा नवरा असावा. तो मागेच राहिला होता, सर्व कार जाण्याची वाट पाहून आता क्रॉस करुण तिच्या दिशेने चालत येत होता. तिच्या आरड़ा  ओर्डिने त्याला काहिच फरक पडला नव्हता, तो अगदी काकडी सारखा थंड! पण माला तर  त्याचि डायच आली.  हे मात्र नक्की की इंडियन असो किंवा अमेरिकन, बायकोचा नवऱ्याना नांव ठेवल्या शिवाय दिवस चांगला जातच नही. रागाच्या भरात चालताना त्या आजिला मागे राहिलेल्या नवऱ्याचा पत्ताच नव्हता. शिवि माझ्यासाठी नसून नवऱ्या साठी होती. या परिस्थितीत मी फक्त कोलैटरल नुकसान होते. इतर किराणा सामाना बरोबर केळी घ्यायला आले होते. माझ्या हि नवऱ्याने नेहमी सारखी  हीच चूक केली होती. माला हि केली सॊडून परत पिवळी केळी आणली. त्याला मी ह्या वरून बरच झापलं होतं. मी धार्मिक नव्हे, पण खुप फिल्मी आहे. जर वारा आणि लाइट् इफेक्ट्स जोडला जाऊ शकला अस्ता तर तो क्षण एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा काही कमी नव्हता . मला वाटले की देव मला काही प्रकारचे सिग्नल पाठवित आहे. अशीच कटकट करत राहिलिस तर येत्या २५ -३०  वर्षांत काय होशील याची एक भयानक  झलक दाखवतोय. नवऱ्या वर चिडलेली बायको खिलजी पेक्षाही क्र्रूर  दिसते, हे मी फर्स्ट हॅन्ड अनुभवलं आणी मला आढळले कि आतापासून निदान मला केळ्यांची खिटखिट बंद करायला हवी.


आवडला तर नक्कीच लाइक आणि शेअर करा   


https://addictthink.wixsite.com/thinkaddict/post/%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%96-%E0%A4%9F%E0%A4%96-%E0%A4%9F

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.