आठवांची शिदोरी !

     लहानपणापासुन स्वप्नाच्या हिंदोळ्यावर स्वार असलेली मी..! खऱ्या दुनियेच्या रंगात रंगायला अजूनही घाबरते. कितीतरी अनुभवांमधून दोन वर्षापूर्वी हे रंग आत्मसात करायला शिकण्याकडे पाऊल टाकल  होत मी पण कोण जाणे नियतीला मला या खऱ्या रंगांमध्ये रंगूच द्यायच नाहीये की कदाचित माझा स्वभावच मुळात हे नवे रंग स्वीकारत नाहीये कळेना  !

    दोन वर्षापूर्वी एक अशी व्यक्ति माझ्या आयुष्यात आली जिणे माझं भाव विश्वच बदलून टाकलं.  या व्यक्तीशी कधी माझी मैत्री ही होईल आणि मी इतकी गुंतून जाईल हे वाटलं  नव्हतं.नकळत झालेली मैत्री,काहीही विचार न करता अगदी सहज निखळ घडलेले संवाद आणि अनामिक लागलेली ओढ..सगळं अगदी माझ्या स्वप्नांसारख..! कुठलच मुद्दाम केलेलं वक्तव्य नव्हतं की जाणून केलेली तस्करी नव्हती, सगळं स्वछ्छ आणि नैसर्गिक घडत होतं. मग एक दिवशी ही मैत्री गोड आहेच तर एकमेकांशी लग्न करायला काय  हरकत आहे असा विषय आमच्यात झाला आणि कधीच कुणालाच हो न म्हणणारी मी लाजतच थोड वेळ हवाय म्हणुन विचार करायला लागले. लग्न या संकल्पनेत ही व्यक्ति मला मोजतीये याच आश्चर्य आणि आनंद  दोन्ही होत होतं मला..! स्पष्ट होकार चेहऱ्यावर दिसत होता पण नेहमीप्रमाणे घरची मंडळी यावर काय प्रतिक्रिया देतील या भितीने मी वेळ मागितली. 

    त्याच्यात आणि माझ्यात अनामिकपणे स्वप्नांची आरास वाढत होती पण माझ्या घरून या सगळ्यावर वेगवेगळे विचार आणि व्यर्थ वक्तव्यावरून विवाद सुरू झाले. उगीच काहीही कारणं काढून हे स्थळ माझ्यासाठी कसं योग्य नाही हे मला दाखवून देण्याचा प्रयत्न होऊ लागले आणि यासगळ्यात आमच्या दोघांमध्ये कुरबुर होऊ लागली. तरीही खूप संयमाने आणि संजूतदारीने आम्ही जवळ जवळ वर्षभर एकमेकांचा घट्ट हात धरून होतो. मी यथाशक्ति माझ्या घरच्यांच मत परिवर्तन करत राहिले. त्यांना समजाऊन सांगण्यापासून ते त्यांच्याशी अबोला  धरून त्यांना उमजवून देण्यापर्यंत सगळं करून झालं होतं माझं. कधी कधी काही गोष्टी जवळच्याना बोलून समजत नाही कदाचित लिहून समजतील म्हणुन मी माझ्या बाबांना पत्र लिहून पाठवलं पण बरेच दिवस त्यावरही काहीच चर्चा नव्हती.प्रत्येकवेळी माझ्या घरून नकारच एकुन त्या व्यक्तीनेही हात टेकले. पण तरीही कुठेतरी मला आस होती आणि मी प्रयत्न करत होते. पुन्हा पुन्हा घरी संवाद साधण्याचा. आई , मामा किंवा अजून कुणी मोठी व्यक्ति जी बाबा आणि भावाला पाटवून देऊ शकेल अशा संगळ्यांशी मी बोलत होते. त्याला त्रास नको म्हणुन आणि आम्हा दोघांच वाईट गोष्टीवर नातं संपू नये म्हणुन मी त्याच्याकडे न  बोलता त्याच्या बहिणीला सांगत होते की, मी हार मानली नाहीये अजून. आणि ताई ही मला समजून घेत होत्या आणि साथ देत होत्या.

    पण वेळ जात होती तसतशी, नाहीच होणार आमच लग्न असा स्वतःच्या मनाला समजून सांगत आम्ही हळू हळू आमच्यातले संवाद कमी केले. एकदा शेवटच भेटूया म्हणुन तो मला भेटायला आला ही पण तो पूर्वीसारखा अजीबात भासत नव्हता. भेटण्यासाठी तो आतुर नव्हता, भेटल्यावरही माझ्याशी बोलण्याचीही जणू त्याला ईच्छा नव्हती. काहीतरी विचित्र आभास होत होते मला त्याच्या वागण्यातून. पण कदाचित ही शेवटची भेट म्हणुन तो असा वागत असावा असं मी स्वतःला समजावत होते. त्याला मी अजूनही प्रयत्न करते हे सांगणार तितक्यात रंगत त्याने माझं बोलणं थांबवलं आणि मलाही पूर्ण खात्री शिवाय त्याला हे सांगू की नको असा झालं नि मी गप्प झाले. मुसमुसंत मी गाडीतून बाहेर पडले आणि तो निघून गेला. 

    त्यानंतर त्याने माझ्याशी बोलणं पुर्णपणे टाळलं पण घरच्यांशी मी रागात का होईना या गोष्टींवर बोलत होते, त्याच्या ताईशी सगळं शेअर करत होते. पण अचानक एक दिवस त्याने कुठल्यातरी मुलीसोबत सोशल मीडिया वर एक फोटो टाकला आणि मी बिथरले. मी त्याच्या ताईला विचारलं, त्यानाही हे विचित्र वाटलं. 'मलाही हे त्याचं वागणं पटलं नाहीये' अस म्हणुन त्या मला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यादिवशीपासून मी घरच्यांशी बोलण्याचे प्रयत्न खऱ्या अर्थी थांबवले. माझ्यात राग , प्रश्न , प्रेम , आठवणी या सगळ्याच थैमान सुरू झालं. मग दोन तीन दिवसाने ताईनी मला सांगितलं ती फक्त मैत्रीण आहे असा काहीही नाही जसा मी विचार करत होते. पण माझं मन मानत नव्हतं. ताईनी म्हंटले म्हणुन मान्य केलं की फक्त मैत्रीण असेल आणि उगीच पराचा कावळा नको म्हणुन त्याला ही  या विषयावरून मी काही बोलणं टाळल. पण तरीही एक राग मनात खदखदत होताच.

    मी यथाशक्ति रोज स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस अचानक रात्री त्याचा मला फोन आला आणि "उद्या मी मुलगी बघायला जातोये यांनातर आपण कुठलाच संपर्क ठेऊ नये हे सांगायला मी तुला कॉल केलाय, तुला काही बोलायचय तर बोल " असा आवाज कानावर पडला. मी सुन्न होते , माझं तुझ्यावर प्रेम आहे, काळजी घे यापलीकडे काहीच बोलू शकत नव्हते. मला रडू आवारात नव्हतं आणि त्याला रागात मला समजून घेणं जमत नव्हतं. "तुझ्या घरचे आहेत का तयार? नाही ना मग हे रडणे त्यांच्याकडेच कर! "  असं म्हणुन त्याने फोन ठेवला. मी रात्रभर रडत राहिले, कुठे चुकले, का हे सगळं घडतंय असे प्रश्न कृष्णाकडे करत राहिले. कुणीच नसतं तेव्हा कायम माझ्या कृष्णाने साथ दिलीये मला पण आज त्याच्यावरही मी प्रश्न करायला लागले होते. या सगळ्या विचारात सकाळ झाली, आकाशात ढंग दाटून आले होते, थंड हवा पसरली होती पण मला काहीही जाणवत नव्हतं. मी सकाळी सहालाच माझी स्कूटी काढली आणि थेट कृष्ण मंदिराकडे निघाले. मंदिरात एक बुवाजी पूजावंदन करत होते. मी गेले आणि मनातल्या काहुरासकट दंडवत घातले आणि एकटक देवाकडे बघत बसून राहिले. अचानक माझा फोन वाजू लागला पण मला तेव्हा कुणाशीच बोलण्याची ईच्छा नव्हती. मी त्याकडे दुर्लक्ष केल आणि मनातूनच कृष्णाला प्रश्न करू लागले. पण कुणीतरी पुन्हा पुन्हा मला फोन करत होतं म्हणुन मी बघितलं तर आई सारखी कॉल करत होती मला.  ईच्छा नव्हती पण इतके फोन सकाळी सकाळी का करत असावी म्हणुन मी फोन उचलला तोच आई म्हंटली बाबा त्या स्थळासाठी तयार झाले. मी थोडावेळ अवाक झाले!! याला चमत्कार म्हणू की आणि काही कळत नव्हतं मला. विश्वास बसेना म्हणुन मी आईला परत विचारलं, बाबांशी स्वतः बोलले आणि लगेच ताईला फोन केला. ताई खूप खुश झाल्या पण त्यांचा तो दुसरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरलेला होता म्हणुन 'फक्त बघून येतो, तु आता काळजी करू नको 'अस सांगून त्यानी फोन ठेवला . मी खूप खुश होते देवाला शतःशाआभार मानून , माझा  कृष्णा खरंच आहे हे स्पष्टपणे उमजून दंडवत घालून मी मंदिरातून बाहेर पडले. पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि मला त्या खूप भावू लागल्या. मी घरी आले, आधी बघितलेल्या स्वप्नंना यावेळी मुक्तपणे रंगवू लागले. तो मला बघायला येणार त्यासाठीची तयारी आणि यादी बनवू लागले!!! 

   संध्याकाळ झाली. ताईंचा मला कॉल आला "मी खूप खुश आहे, तु यूद्ध जिंकलस आणि आता सगळं नीट होणार ,आम्ही त्या दुसऱ्या मुलीला नकार दिलाय " हे एकून  मला भरून आलं की ती त्याची ताई असूनही आमची फक्त फोन वरुन इतकी बॉंडिंग झाली होती. पण मला वाट होती ती त्याच्या फोनची. मी ताईंना न राहाऊन विचारलच की तो का नाही कॉल करत आहे मला . यावर ताई म्हंटल्या अगं नको टेंशन घेऊस आज जरा प्रवास आणि ते स्थळ मुळे जरा दमला असेल तो बोलेले उद्या . मला हे पटत नव्हतं पण कदाचित ताई म्हणताएत तर तसंही असेल म्हणुन मी समाधान ठेवलं. माझ्या मामाकडून रितसर त्याच्या जीजूकडे फोन गेला. बघण्याचा दिवस ठरवूया आम्ही काळवतो असं जिजूकडून कळलं. तीन चार दिवस उलटून गेले तरीही त्याचा मला एकही मेसेज किवा फोन नाही,मग परत माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला. आनामिकपणे का होईना पण मी इतक घरच यूद्ध जिंकल्यावर त्यानेच मला फोन कराव असा अपेक्षित होतं  मला. मी ताई कर्वे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की का तो बोलत नाहीये माझ्याशी. ताई ने मला समजाऊन सांगितलं की "त्याला थोडा वेळ हवाय पण तो करेन कॉल तु तुझ्यावर लक्ष  दे बेटा नको काळजी करू". पण माझं मन मानेना , मला वारंवार त्याचा त्या मुली सोबतच्या फोटोची आठवाण होत होती. कसबस समजावत मी ताई म्हंटल्या प्रमाणे तयारी आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होते. 

     घरच्यांशी यूद्ध मांडलं होता म्हणुन मी दीड वर्षापासून घरी गेले नव्हते , ती आता तो बघायला येणार आणि माझे घरचे शेवटी माझ्यासाठी उभे राहिले या उत्साहात मी घरी जायला निघाले. मनात वेगवेगळी स्वप्न आणि एकअनामिक वादळ असं  दोन्ही घेऊन मी घरी पोहचले. मी फायनली साग्रसंगीत बघण्याच्या कार्यक्रमाला बसणार म्हणुन घरच्यांचीही तयारी आणि आपसूक काळजी सुरू झाली. पण त्याच्या घरून अजूनही तारीख ठरवण्यासाठीचा कॉल नव्हता आणि मला त्याचाही! मला राहवेना म्हणुन मी त्याला मेसेज केला की तु काहीच का बोलत नाहीयेस माझ्या घरून होकार येऊन पंधरा दिवस उलटून गेले होते. त्यावर 'मला हे लग्न करायच नाहीये ' हे उत्तर वाचून माझ्या पायाखालची जमीन जाणवेनाशी झाली. मला कारण कळेना , मी खूप राग आणि खूप विचित्र भावनेत अडकले होते. आभाळ कोसळव तसं पूर्णपणे कोसळले होते मी. खूप प्रश्न केले मी त्याला , ताईना फोन केला ,त्याच्या जिजूंनाही फोन केला .पण  ते ही प्रश्न चिन्हात होते. आम्हीही त्याला समजावतोयए पण तो कुणाचच ऐकत नाहीये आणि आम्ही म्हणुन तुझ्या घारच्याना तारीख कळवू शकत नाहीये असा त्यांनी सांगितलं. 

     खरंतर मी शुंन्य झाले होते. तो माझ्याशी फोनवर एकदा तरी बोलावा इतकंच मी त्याच्याकडे मागत होते. पण त्याला ते ही करायच नव्हत. माझा तुझ्यात इंट्रेस्ट नाही असा सांगून एक क्षणात त्याने मला आयुष्यातून काढून टाकलं. मी घरच्यासमोर हे दाखाऊ शकत नव्हते आणि स्वतःला कसं सावारू ते ही समजू शकत नव्हते. एखाद्याला जबरदस्ती तुमच्यावर प्रेम करायला नाही लावू शकत तुम्ही आणि तशा नात्याला टिकवता येणं कठीण असतं इतकच समजून मी गप्प झाले. आता कुणाशी बोलण्याच, भांडण्याचं किवा देवाकडे काही मागण्याचंही त्राण माझ्यात उरला नव्हतं . मी निशब्द ,निरर्थक आणि शून्य भासत होते स्वतःला. कुणी अचानक इतकं कसं बदलू शकतं ?काय  नेमकं असं झालं ज्याने तो माझ्याशी इतका दुरावला? माझ्या घरच्यांच्या रागामुळे माझा एकदाही विचार करावासा नाही का वाटलं त्याला?मीच कुठेतरी चुकले का? माझ्याशी बोलूही नये इतकं काय नेमकं वाईट वागले मी त्याच्याशी? अशा असंख्य प्रश्ननी कितीतरी दिवस मी नीट झोपले नाही. संगळ्यांसमोर हसून वागणं कठीण होत होतं मला. वारंवार अजूनही प्रयत्न करावे का मी असा वाटत होतं आणि यातच एक दिवस ताईच सोशल मीडिया स्टेटस मला दिसलं "Brother got engaged " आणि ते ही त्याच मुलीसोबत जिच्या बाबतीत माझ्या मनात बरेचदा पाल चुकचुकली !

      मला redflags, intuition, gut feeling यावर मी पूर्वीसारखं लक्ष दिलं नाही आणि  स्वतःच्या मूळ स्वभावावर मी दुर्लक्ष केल याची लख्ख जाणीव झाली. या चंदेरी दुनियेच्या चमचमत्या रंगांत  मी किती वाईटरित्या भरडले गेले याचं दर्शन झालं जणू मला. विश्वास, सार्थ प्रेम, भावना  हे माझ्या स्वप्नादुनियेसारखे या खऱ्या दुनियेत नाहीत आणि माणसं एका क्षणात बदलू शकतात इथे याची मोट्ठी शिकवण मिळाली मला!! पण तरीही मी केलेलं प्रेम निखळ आणि अजूनही तितकच खरं आहे. म्हणुन कितीही वेदना झाल्या तरीही त्या प्रेमाच्या आठवणी मिटवता येण शक्य नाही मला ! मी बरेच दिवस स्वतःला आणि कृष्णाला या संगळ्यासाठी प्रश्न करत राहिले कधी कधी कोसत ही राहिले. मागण मागूनही ते पूर्ण का झालं नाही ?का कृष्णाने माझी साथ दिली नाही ? असं पुन्हा पुन्हा देवाला विचारात राहिले. 

पण शेवटी कृष्ण  म्हणतात तसं "जर तुमच प्रेमच तुम्हाला स्वीकारत नसेल तर ईश्वर पण त्यात काहीच करू शकत नाही " हेच सत्य मला स्वीकारायला लागलं !!! तरी या आठवांची शिदोरी मी उराशी घट्ट बांधून आयुष्याची पुढची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतीये..! 

तुम्ही मात्र वाचत रहा..कोण जाणे माझी ही शिदोरी कदाचित कुणाच्या तरी उपयोगी ठरेल..!!!

                                                                                            

                                                                                     - विशाखा 

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.