रामायण

'रामायण'..अखंड भारतीयांच्या मनातील श्रद्धेचा,आपुलकी चा विषय...पौराणिक महत्व जेवढे तेवढेच प्रभु श्री राम हे आमचे आराध्यदैवत च🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
आठवतय मला लहानपणी आजी आणि आजोबांकडून रामायणातील गोष्टी आम्ही ऐकायचो...त्यावेळी श्री राम म्हणजे देव आणि रामायण काय तर देवाची गोष्ट.. असा काहीसा बालमनीचा समज असायचा.हळूहळू थोडे मोठे झाल्यावर..श्रीराम आणि श्री कृष्ण म्हणजेच भगवान श्री विष्णु चे अवतारच हे ज्ञान प्राप्त झाले होते. त्यावम्हणतं##'महाभारत'###जरा डोक्यावरुन च जायचे पण मौखिक गोष्टी घरातील जेष्ठांकडून कानावर पडत गेल्या... हळूहळू एकप्रकारे बालमनांवर ###भारतीय ###संस्कृती चे### संस्कार## आमच्या नकळतपणे बिंबवले जात होते.
बालपणीच्या सर्वात प्रिय आठवणींपैकी एक म्हणजे संपूर्ण कुटुंबातील सदस्य,शेजारी, अबालवृद्ध सर्वांनीच एकत्र येऊन ###श्री #रामानंद## #सागर### यांचे श्री 'रामायण###',###'महाभारत' ###आणि '#श्री #कृष्णा# या दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ९वाजता लागणाऱ्या सिरियल बघणे हा संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात आर्वजून बघितला जाणारा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
'श्री रामायण' जेव्हा चालू होते त्यावेळी फार लहान होतो...परंतु अजूनही तो रविवार आणि त्या आठवणी मनात ताज्या आहेत...रविवार.. सुट्टी चा वार असला तरी मोठ्यांप्रमाणे बालगोपाळ सुद्धा लवकर उठत..पटापट आवरून घ्यायचो कधी एकदा ते सिरियल चालू होते असे वाटायचे.त्यावेळी सर्वांकडेच T.V.📺 असायचा असे नव्हते.. परंतु आपुलकी एवढी असायची की शेजारी असो वा रस्त्यावर ,हाँटेल (Hotels)ज्याला जसे जमेल तसे सर्वच स्तरावरील लोक या सिरियल बघायचे.विशेषतः आमच्या ##वाड्यात तर जणूं हा छोटेखानी उत्सव च असायचा.आमचे ##आजोबाआणि ##बाबा## ##विधिज्ञ(Advocate) तर मोठे काका ##ज्यज## ..असल्याने घरात खूपच राबता असायचा..##आजोबा ##स्वातंत्र्य ##सैनिक आणि ##सामाजिक ##कार्यकर्ते असल्याने घरात नेहमीच र्वदळ असायची.भरीस भरं गावाकडचे खेडोपाडी चे पक्षकार(Clients)शेतातील गडी माणसे आप्तेष्ट सर्वांच्या येण्यानेच वाडा खऱ्या अर्थाने दुमदुमला जाई मग नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी र्वदळ जरा जास्तच असायची.वाड्यात आम्ही भावंडे फार प्रेमाने रहायचो कधी भांडणे देखील जोरदार व्हायची परंतु शनिवारी दिवसभर आम्हाला उद्या भांडू नका वेळेवर...नावे ठेवून घेऊ नका लोकांसमोर... व्यवस्थित शांत बसायचं रामायण बघताना!!!!😢😢👍👍👍👏👏👏😍😍😍🙄🙄🙄अशा अनेक सूचना देण्यात येत असे.सकाळी च बैठक (Hall)व्यवस्थित आवरल्या जायची...लोकांना बसण्यासाठी विशेष काळजी घेत TV च्या Angle नुसार बसण्याची सोय केली जात असे.आजोबांना थोडे कमी दिसायचे म्हणून त्यांची खूर्ची जरा TV जवळ असायची.साधारणतः सकाळी८.४५पर्यंत सारेच जमा होत असायचे.येताना कोणीही रिकाम्या हाताने येतच नसायचे काहीतरी खाऊ आम्हा बालगोपाळांसाठी आर्वजून असायचा आणि सिरियल पेक्षा घरी सगळे येणार...खाऊ मिळणार या गोष्टींचा आनंद बालमनांसाठी सुगद अनुभव होता. एकीकडे पुरुष र्वग,महिला र्वग,तर जिथे कुठे थोडी जागा उरायची ती आमच्या वाटयाला येत असे.आमची आजी ##'अखंड ##रामनामाचा'##जप करत असायची त्यामुळे तिच्या जवळ फक्त एका विशिष्ट आसनावर मी आणि आजी बसायचो...आजी जपात मग्न  असायची तिला सिरियल आवडायची... ती ब्रेक लागला कि जपमाळ म्हणतं असे..तिचीच Copy म्हणून मी देखील ब्रेक मधे उजळणी लिहित असे.Multitasking चे धडे आणि बाळकडू असे उपजतच मिळायचे.PIN DROP SILENNCE फक्त ब्रेक मध्येच तुटायचा...कोणाला पाणी वगैरे देणे..आई आणि काकू एकीकडे चहाचे आधन ठेवून येत असे.तल्लीनतेने सर्वजण रामायण बघायचे..चूकून जर एखादे बाळ रडले तर त्याच्या आईला फार त्रासदायक होत असे...सिरियल मधील पुढच्या संवादांचा अंदाज आजोबांनी अचूकपणे सांगितला कि टाळ्यांचा कडकडाट🙌🙌👏👏 आपसूकच होत असे...काही कळत नसल तरी आबांसाठी आम्ही टाळ्या जोरजोरात वाजवायचो.👏👏👏👏
फक्त गौरी गणपती, नवरात्र सोडले तर वर्षभर प्रत्येक रविवारी हि रेलचेल असायचीच.दिवाळीत तर फराळ ,पंगती या सर्वांचा आनंद  वृद्धिंगत करायचे.सिरियल संपली कि मोठ्यांसाठी चहा☕☕☕☕☕तर बालगोपाळांसाठी..बेसनाचे, रव्याचे, शेंगदाण्याचे लाडू किंवा चिवडा ,गडगिळे,फळे असा काही ना काही खाऊ करून ठेवलेला असे. निघतांना सर्वजण थोरांचे नमस्कार करून आर्शिवाद घ्यायचे.महिला वर्गाचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटोपला कि बैठकीत बसलेल्या आजोबांचा सारेच निरोप घ्यायचे..छोट्यांसाठी आजोबा अंजीर किंवा आक्रोड असा खाऊ निघतांना देत असायचे.पुढच्या रविवारी नक्की भेटू अशा आणाभाका देत सर्वजण एकमेकांचा निरोप घ्यायचे.एव्हाना रस्त्यावर देखील सिरियल संपल्यानंतर र्वदळ सुरु होत असे.
काळानुरूप परिस्थिती बदलत गेली हळूहळू सर्वांच्या घरी TV आले..BLACK N WHITE ,COLOUR TV आणि मग काही वर्षांनी Remote असणारे TV ..नवीनTV ची कुंकू लावून पूजा करण्यात येत असे.काळ जरूर बदलला परंतु या पिढीने आपुलकी फार जपली होती.पूर्वीचे लोक अतिथीदेवो म्हणत पाहुणचार करायचे..थोरांना भेटलो कि आपसूकच दंडवत घातल्या जात असे.शेजारपण जपले जायचे..सुखदुःखात गल्लीतले परिवार एकोपा पिढीनुसार जपायचे.आज रामायण पुन्हा सुरु होणार हि बातमी वाचली आणि क्षर्णाधात सर्व बालपण डोळ्यांसमोर उभ राहिले.आज रामायण पुन्हा सुरु होणार आहे याचा आनंद आहेच पण उद्या त्या Modern LED TV असला तरी...घरात माणसे कमी तर जागा भरपूर...TV समोर चष्मातून TV बघणारे आजोबा देखील नाहीत कि जप करणारी आजी ही नाही😥😍🙏🙏...कोणी अतिथी नसणार किंवा कुणी आप्तस्वकीय!!!...असेल तो फक्त आपला पिंजरा...सध्या COVID_19..CORONAचेच खरतरं आभार मानावसे वाटतात ...चुकलेल्या माणसाला... माणुसकीने वागायला शिकवत आहेस...एरव्ही जाती,र्धम...देश..प्रांतवाद यात गुरफटून गेलेल्या भारतीयांना तू पुन्हा आमच्या संस्कृती ची ओळख करून देत आहेस...###अतिथीदेवो भव.###वसुधैव##कुटुंबकम्##हीच आपली ###संस्कृती##..हे विसरत जाणाऱ्या आम्हाला तू पूर्वव्रत आणण्यासाठी केवढा रे ##खटाटोप करोना#!!!आम्ही नक्कीच राष्ट्रहिताच्या दृष्टीने च वागणूक करु...मनातील विसर पडलेल्या श्री प्रभु रामचंद्रांच्या विचारांचे आकलन व पालन करू...एव्हाना घरात बसून आम्हाला(माणसाला) आमची चूकी कळाली आहे.निर्सगाच्या आणि त्या परमात्मा परमेश्वराच्या हातातील आम्ही केवळ एक खेळणे आहोत...किमान एवढे जरी आपल्याला कळाले तर या अनमोल जीवनाची किंमत तर कळेलच शिवाय खरा आनंद नेमका कुठला हे ही कळाले तर ##दुग्धर्शकरा ##योगच म्हणूयात.श्री ###सीता ##रामचंद्रारपणमस्तु###🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳डॉ. गौरी निरखी२७/०३/२०२०.#####

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.