मला स्वाभिमानाने जगायला आवडेल....


       का जन्माला आलेय मी .. ओझ आहे ना मी .. तुम्हाला मी नकोच होती ना .. सर्व बोलतात मी जन्माला येऊन पाप केलंय ... हो का खरच मुलगी म्हणून जन्माला येणं जर अमान्य असेल तर मी ते स्वाभिमानाने बदलायला तयार आहे  .
स्त्री ला दोन घरांची उद्धरीन म्हणतात पण त्याच दोन्ही घरातील परिस्थिती काय आहे ..जन्माला आल्यावर तीला मारली जाते आणि जरी तिच्या नशिबाने ती जगली तरी तिच्या नशिबात तिचे हक्क , तिचे अधिकार तीला मिळतात का ?  जन्माला आल्यापासून तिचं मत यांना किंमत नसते पण तरी दुसऱ्यांचा मान राखण्यासाठी ती गप्प राहते आणि असे करावे लागले तरी मी आनंदाने करेन .. मुलींचं अस्तित्व हे चूल मुल या पलीकडे आहे तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तिने स्वाभिमानाने जगले पाहिजे पण तिने असे केलं तर ती चूक करते तर मला ही चूक करायला आवडेल .तू मुलगी आहेस तुला घरकाम आलेच पाहिजे . घरकाम आले पाहिजे मान्य आहे पण मुलगी आहे म्हणून आले पाहिजे हा आग्रह का ?  त्यानंतर लग्न झाल्यावर तिच्या नशिबाने मिळालं तर ठीक नाहीतर तिच्या नशिबात जो हुंड्यासाठी छळ होतो , तीला मुलगी झाली म्हणून छळ होतो ती गप्पपणे सहन करते , .. त्या नंतर मुलांचं ऐका आणि ज्यांच्या साठी आयुष्य खर्ची केलं त्यांनी वृद्धाश्रमात ठेवणे या पेक्षा वाईट गोष्ट काही नाही . सर्वांसाठी माझं आयुष्य सार्थकी लागणार असेल तर मला हे पाप करायला आवडेल.इतकं कडवट आयुष्य जगणं जर अवघड असेल तर मला ते सोप्प करायला आवडेल ..या दुविधेत जगणं जर कठीण असेल तर मला ते करायला आवडेल ...
प्रश्न नाही का पडत की का हे विष पचवायला आवडेल मला ??
कारण मी एक मुलगी आहे याचा मला अभिमान आहे आणि ज्या कारणांनी मला मोकळा श्वास घेता येत नाहीये ते मार्गच जर बंद केले तर आज मी कोणाचीतरी मुलगी आहे कोणाचीतरी बहीण आहे कोणाची तरी बायको आहे कोणाचीतरी आई आहे या सर्वांमुळे च माझ्या जगण्यावर जर तलवार येत असेल तर ... तर त्यांना समजून सांगून मला ह्यात सुधारणा तर आणता येईल .. माझ्या सारख्या या जगातील लाखो मुलींनी जर त्यांच्या हक्कांसाठी जर लढा दिला तर बदल घडवून आणण्यासाठी काही वेळ नाही लागणार ...स्त्रीचं सुख म्हणजे सोन्या चांदीचे अलंकार , पगारदार नवरा या मध्ये नसून तीला आदराने वागवण्यात आहे हा !! हा !!माहीत आहे आपले कर्मठ लोक त्यांचे पुरोगामी विचार आणि त्यांचा पुरुषी मनोवृत्ती नाही जगून देत आम्हाला , तेच संपवायचं आहे आज मिळून सामना करू...आपल्या वडिलांना ,भावाला, मुलांना योग्य त्या  विचारांचं बीजारोपण तरी करू शकतो ..

 समाज हा परिवर्तनशील असतो , परिवर्तन आपणच घडवायचं असते कारण आपण त्या समाजाचे एक घटक असतो.रोज सकाळ संध्याकाळ रडणं पेक्षा एकदाच आवाज उठवा जेणेकरून पुन्हा कधी आपण मुलगी असण्यावर कोणी आवाज उठवणार नाही ..स्वतःच्या हक्कांसाठी लढा .. आणि त्यात काहीच गैर नाहीये ..

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.