डिजिटल भारतातील नोकरशाही!!!

हा हा म्हणता जग डिजिटल झालं. इंटरनेट च्या मायाजालात गुंतलेल्या या जगात मानव किती बुद्धिवंत आहे याचं एक जणू उदाहरण म्हणून डिजिटल युगाकडं पाहण्यात काही गैर नाही. इथं मानवची काम करायला देखील रोबोट निर्माण केले गेले तिथे नोकरशाही तरी मागे कशी राहील खरंतर भारतात नोकरशाही म्हणजे कागदी घोडे नाचवणारी एक संस्था किंवा व्यक्तीसमूह अशीच समजूत काही वर्ष आधीपर्यंत होती.. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी प्रचलित म्हण या कागदी घोडे नाचवणाऱ्या संस्थेला अतिशय तंतोतंत लागू पडत होती किंबहुना ती त्यांच्यासाठीच बनवली गेली असं म्हटलं तरी त्यात वावगं काही नाही.... या म्हणीला बगल देण्यासाठी म्हणा किंवा लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा पुरवण्यासाठी म्हणा किंवा १९९१ च्या खा.उ.जा. धोरणानंतर खाजगी क्षेत्राचे वाढलेली स्पर्धा डोकेदुखी ठरून अस्तित्वाबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाचे उत्तर म्हणून म्हणा एकदाचे हे डिजिटल नोकरशाही युग सुरु झाले आणि बरेच प्रश्न पटापट सुटतील अशी आशा तरी निर्माण झाली. या बदलामुळं सरकारी बाबू आपल्या पदरी असलेली कामाबाबतची उदासीनता, मरगळ झटकून कामाला लागतील अशी अपेक्षा होती. ज्या कागदी घोड्यामुळे भ्रष्टाचार बळावला होता तो कमी होईल अशी अपेक्षा होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गरीब गरजू जनता जिच्या सेवेसाठी हे नोकरशाह त्या पदावर बसलेले आहेत त्याना संवेदनशील पणे समजून घेऊन त्यांची काम चोख आणि वेळेत बजवतील अशी अपेक्षा होती. परंतु आज इतक्या वर्षानंतर देखील ते सहजशक्य झालं आहे का? आज इतक्या वर्षांनी देखील तीच मरगळ, तीच उदासीनता आणि तोच वेळकाढूपणा याने सरकारी ऑफिस त्याच गतीने काम करताना दिसतो.. दिवस दिवस उपाशी त्या सरकारी बाबू आज आपल काम नक्कीच करून देतील म्हणून उभं राहणं आणि रोज पदरी येणारी निराशा यामुळे डिजिटल नोकरशाही निर्माण झालेली दिसते. आजही संवेदनशील अधिकारी कुठेही पाहायला मिळत नाही...सगळं काही डिजिटल झालं पण सामान्य माणसाला अजुनही कुठे कळतं काही त्यातलं... जरी ऑनलाईन फॉर्म भरायचा असला तरी कधी सिस्टिम एरर कधी, बंद पडणारी संकेतस्थळ आणि ते सगळं झालंच तर शेवटी कागद आणून समोर ठेवल्याशिवाय कोणताही फॉर्म तसाच भरला जातो असपण नाही मग त्यासाठी होणारी पळापळ या सगळ्यांत शेवटी हा सामान्य माणूस थकून जातो आणि शेवटी त्याला त्या योजनेत काही स्वारस्य उरत नाही... त्यामुळं आपली डिजिटल नोकरशाही योजना लोकांपर्यंत पोहचवते कि त्यातली आडकाठी बनतेय हे आता तपसण्याची वेळ आली आहे.. अन्यथा पुन्हा एकदा सरकारी काम म्हणजे डोक्याला घाम आणि मोजा फक्त दाम असं काही कलंक लागला तर त्याला बगल देणं अशक्य होऊन बसेल...




  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.