श्री.पांडुरंग परब -अल्प परिचय- (दादा समाजसेवक )

त्या दिवशी मानेकाका रस्त्यातभेटले. मानेकाकांचा परिचय म्हणजेत्यांच्या नावावर ६०-७०पुस्तक प्रकाशितआहेत. बहुतांशी नाटकचआहेत. आपली पोस्टाचीनोकरी सांभाळून त्यांनीहा छंद जोपासला. नुसती नाटक लिहूनते थांबले नाहीततर ती विविधकार्यक्रमांना सादरही केलीत. सामाजिक , त्यातून कौटुंबिक जाणिवेचे दर्शनत्यांच्या लेखनातून घडते. मलाहीत्यांच्या एका नाटकातभूमिका करण्याचा योग्य आला. फार सुंदर अनुभवहोता तो.

मानेकाका भेटले कि हमखासविषय निघतो तोदादाचा. दादानी आपली हयातघालवली मुंबईत. परंतु एकसाधं घर घेतलंनाही. कित्येक वर्षते १० बाय१० च्या भाड्याच्याखोलीत राहत होते. खोलीचा एक कोपराआणि अर्धीअधिक भिंतपुस्तकांनी आणि लिखाणसाहित्यांनी भरून गेलीहोती. दिवसभर एकामेडिकल स्टोरमध्ये काम करायचेआणि रात्री ओळखीच्याठिकाणी जेवण करायचे. अर्थात पैसे द्यावेलागत. दादाना लेखनाबरोबरचसमाजसेवेची देखील आवड होती. कित्येक स्थानिक तसेच तालुकापातळीवर त्यांची नेतेमंडळींशी ओळखहोती. सुरवातीला  भगव्याचा वार त्यांनास्वस्त बसू देतनव्हतं.  

सानेगुरुजींच्या विचारांचा लिखाणाचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. गुरुजींचं साहित्य लोकांपर्यंत विशेषतः लहान मुलांपर्यंत पोहचवण्याचं कार्य ते करत होते. त्यातूनच माननीय शशीताई लाड यांनी त्याना ' साने गुरूजी कथामाला, अंधेरी विभागाचे अध्यक्ष बनवले.  पुढे ते ' राष्ट्रसेवादल, अंधेरी विभागाचे अध्यक्ष बनले. नेहमीच आशिर्वादासारखे उभे असणारे कदमसर , अरविंद केरकर साहेब, मुसाभाई आणि जनता दल साथीने त्यांना साथ दिली. वाचनातूनच त्यांचीविचारसरणी ' जनता दलभिमुख' बनू लागली. त्यातूनचलिखाण घडू लागले.

ते जिथे राहतहोते तिथे त्यांनीएक मंडळ स्थापनकेले होते.  त्यांच्या संसकाराच्या आणिविचारांच्या  मुशीतूनआम्ही घडलो. माझ्यावयाचीकाही मुले आजराजकीय , सामाजिक क्षेत्रात कार्यरतआहेत. पण दादामात्र शालेय शिक्षकासारखेतिथेच राहिले. कोणताहीमोह नाही. किसेभरुगिरीनाही. आवाजही अगदीनम्र समाजसेवकासारखा. पणमत  अगदीविचारांच्या कसोटीवर घासून पारखूनघेतलेली.

काही वर्ष मेडिकलमध्येकाम केल्यानंतर त्यांनीआपला मोर्चा पतपेढीकडेवळवला. लिखाण, समाजसेवा मात्रचालूच होती. त्यांच्यामुळेसमाजात किंवा विभागात फारमोठा बदल घडलाअसं नाही, पणत्यांच्यातलं जे उदात्तआणि मंगल होत, ते आम्ही घेतलं.

या फाटक्या झोळीच्या समाजसेवकाकडेकाहीजण कुत्सिक नजरेने पाहायचे. काही चेष्टा करायचे. जे त्यांच्या मरणोत्तरदेखीलकरताहेत. त्यात त्यांना कोणताआनंद मिळतोय देवजाणे.

कोणताही मनुष्यप्राणी आपल्या गुणदोषांसहित जन्मालायेतो. स्वतःसाठी जगजगताआपण समाज्याचे काहीतरीदेणे लागतो याभावनेतून जे सामाजिककार्य करतात, तेचखरेतर जगले असंम्हणता येईल. नाहीतर जनावरसुद्धाजगतात.

आपलं कुटुंब कोकणात ठेवूनदादानी समाजसेवच विडा घेतला. तेच बाळकडू त्यांच्यामुलालाही मिळाले. तोही उत्तमकविता करतो. एकसामाजिक संस्था चालवतो.

दादानी पत्रकारिता करताना आपल्यासहमित्राबरोबर त्याच्या पाक्षिकात लिखाणकेले.परंतु स्वतःचसाहित्य पुस्तक रूपाने मागेठेवण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.दादा लवकरगेले. त्यांची निवडणूकलढविण्याची त्यांची इच्छा त्यांनीपूर्ण केले. शेवटपर्यंत दादा समाजसेवक राहिले.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.