लॉकडाऊन – शोध माणसातून हरवलेल्या माणसाचा

       माणसाला माणसाची जात आज कळून चुकली,

माणुसकीच्या मुखवट्या मागची माणुसकी ही कळून चुकली.



भारता येवढा सुसंस्कृत आणि संमृद्ध देश या जगात सापडणे कठीणच आहे. आपल्या संस्कृतीचा पोवाडा हा साता समुद्रापार गायला जातो. आपल्या संस्कारांचे कौतुक हे जगातल्या प्रत्ये‍क घराघरात होते. आनंद वाटतो हे सगळ एैकुन. पण आपण खरचं ह्या कौतुकास पात्र आहोत का? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. आणि हि गरज निर्माण केली ती, सध्या अवघ्या जगात थैमान घालणारा, प्रत्येक देशात मृत्युचे तांडव करणारा चीन मधील वुहान शहरातून उदयास आलेला ‘कोविड-१९’ म्हणजेच ‘कोरोना’.

खरतर कोरोना हे फक्त निमित्त झाले, ज्यामुळे कदाचीत ‘माणुसकी’ ही माणसाची जातच नाही हे सिद्ध झाले, माणुसकीच्या मुखवट्या मागचा भावना वजा माणुस अवघ्या जगासमोर आला.

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गरज आहे ती, संयमाची, सर्वांनी एकजुट होण्याची, स्वत:वर विश्वास ठेवण्याची आणि इतरांच्या विश्वासास पात्र ठरण्याची.

परंतु आपल्याकडे याचे प्रमाण र्दुदैवाने कमी असल्याचे पहायला मिळते.

एकिकडे सिग्नल वर कोणी भुकेला जीव खायला मागायला आला तर, “देवाने चांगले धडधाकट हात पाय दिलेत तरी भिक मागतात. मेहनत करायला मुळावर येतं ह्यांच्या” असं म्हणतं नाक मुरडणारे, कधीही कोणत्याही प्रकारचे दानधर्म न केलेले लोक, आज लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या पोटाची भुक भागावी म्हणुन पुढे सरसावले आहेत. तर दुसरीकडे घरात होम कॉरंटाईन असलेल्या लोकांना, शेजारधर्म विसरलेल्या शेजारवर्गाकडुन आणि काही ठिकाणी त्यांच्याच घरातल्या सदस्यांकडुन, तर काही ठिकाणी कोरोना पॉझीटिव आढळलेल्या रूग्नांच्या कुटुंबियांना तुच्छतेची वागणुक मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. आणि काय तर म्हणे “सरकारने सांगितले आहे, सोशल डिस्टंस पाळा आणि आम्ही तेच करतो आहे”.

सोशल डिस्टंस पाळणे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे. जेणे करुन एखाद्याला कोरोना असेल तर त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये. यात त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना वाळित टाकल्या प्रमाणे तुच्छतेची वागणुक देणे, हे अमानवी कृत्य, खरोखचं माणसातुन हरवलेला माणुस दाखवुन देते.

रोज सिमेवर हजारो जवान आपला जीव मुठीत घेऊन, भारतीयांच्या आणि भारतमातेच्या रक्षणासाठी मृत्युच्या होळीत स्वत:ला झोकुन देतात. त्यांचे नशिब थोर म्हणुन त्यांना आपल्या देशाची सेवा करता येते. वेळ आलीच तर भारतमातेचे पाय स्वत:च्या रक्ताने धुण्याचे भाग्य त्यांना लाभते. या कोरोना मुळे घरात राहुन देशाचे रक्षण करण्याचे पुण्य, या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान आपल्याही पदरी पडले आहे, पण काही लोक तेही नाकारत आहेत.

‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या सरकारच्या विनंतीला ठेंगा दाखवत, या परिस्थितीचे गांर्भीय जाणूण घेण्याचा प्रयत्नच न करणारे बरेच देशद्रोही आजही विनाकारण घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. इतरवेळी “एकच आयुष्य आहे. हव ते व हव तेवढं मनसोक्त खाऊन आयुष्य जगुन घेतल पाहिजे असा आदर्श ठेवत रोज सकाळी उशीरा उठणारे, लॉकडाऊन सुरू झाल्या पासुन अचानक आपल्या आरोग्याप्रति जागृक होत, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. कॉश बॉक मिळावा म्हणुन ऑनलाईन वस्तु मागवत असलेल्या लोकांना, आज अचानक किराणामाल आणि भाजी विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सताऊ लागला आहे, हे ही नवलचं.



ज्या प्रमाणे देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणुन त्याने आईची निर्मिती केली, त्याच प्रमाणे माणसाला माणसातला देव शोधता यावा म्हणुन देवाने डॉक्टर ची निर्मिती केली असावी असं मला वाटतं. आजवर कित्तेक लोकांनी डॉक्टरांमधील हा देव अनुभवला देखील आहे. पण आजची परीस्थिती बघता या डॉक्टरांनाच देवाच्या आधाराची गरज आहे असे दिसुन येते. कोरोनाने आपल्या भारतात प्रवेश केल्यापासुन हे डॉक्टर रोज मृत्युच्या धारेवर चालत आहेत. दिवस रात्र एक करत, या कोरोनाला झुकवत भारताला विजयी बनवण्यासाठी झटत आहेत. पण र्दुदैवाने ’ नागरीकांना त्रास होऊ नये म्हणुन, स्वत: नागरीकांच्या घरी तपासणी साठी गेलेल्या डॉक्टरांवरती जमावाकडुन हल्ला होतो, दगडफेक होते’ हि बातमी जेव्हा कानावर पडते तेव्हा प्रश्न पडतो कि, भक्तीभावाने, श्रद्धेने पाहिल्यावर आपल्या नजरेला दगडातला ही देव दिसतो, मग देवासमान काम करणारा हा माणसातला देव आपल्याला का नाही दिसतं? जर याच डॉक्टरांनी सेवा पुरवण्यास नकार दिला तर, जसा हा निसर्ग पावसाळ्यात हिरवी चादर ओढतो, कदाचीत त्याच प्रमाणे आपला भारत कोरोनाने मृत्यु पावलेल्या पार्थीवांची चादर ओढेल. आणि हे असचं सुरू राहील तर कदाचीत तो दिवस दुर नाही. आणि तेव्हा वेळ आपल्या हातुन निघुन गेली असेल हेही तेवढंच खर. तेव्हा डॉक्टरांना सहकार्य करा . कारण आज लॉकडाऊन मुळे निर्माण झालेली, मन हेलावुन टाकणारी ही भयान शांतता भंग करण्याची ताकत, देवाने फक्त आणि फक्त डॉक्टरांनाच दिली आहे.

माणुसकी शुन्य असलेल्या या माणसाचे आनखी एक कृत्य म्हणजे पोलिस, सफाई कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले. आपल्या सुरक्षीततेसाठी आज ते रस्त्यावर आहेत. आपण आपल्या कुटुंबासोबत निवांत घरी असताना ते स्वत:च्या कुटुंबियांच्या जीवाला घोर लावत आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना पासुन आपला बचाव व्हावा म्हणुन आपल्याला उंबरठा ओलांडण्यास मज्जाव करणारी पोलिस यंत्रणा, स्वत: उंबरठ्या बाहेर थांबुन आपल्याला संपवण्याची स्वप्ने रंगवत असलेल्या कोरोनाला नेस्तनाभुत करण्याच्या प्रयत्नात सक्षम भुमिका बजावत आहे.

”बाबा, नका ना जाऊ. बाहेर कोरोना आहे.” असं आपल्या पोलिस असलेल्या बापाला रडत सांगणारी त्या चिमुकलीची हाक एैकली तेव्हा, खरोखरचं पोलिसांचे हे काम किती जोखमिचे आहे याचा अंदाज येतो. आपल्या इवलुश्या चिमणीचे हे बोल एैकल्या नंतर त्या बापाच्या काळजाला काय वाटले असेल, याचा जरा विचार करा आणि घरीच थांबा.


एकजुटीने मुकाबला केला, पोलिस, सफाईकर्मचारी, डॉक्टर, सरकार आणि कोरोनाशी लढत असलेल्या प्रत्येकाला पर्यायाने स्वत: ला सहकार्य केले तर हेहि दिवस जातील. पुन्हा सगळी परीस्थिती पुर्ववत येईल.

आपण जिंकु, कोरोनाला हरवु.



निकिता दिनकर गवळी.

Pune


  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.