नागपूर ते त्र्यंबकेश्वर कसे जायचे ? How to Reach Trimbakeshwar? Distance Between Nagpur to Trimbak

              नागपूर ते त्र्यंबकेश्वर कसे जायचे ? 

आशिया खंडातील भारत हा महान आणि पवित्र देश मनाला जातो. तसेच भारताची ओळख हि भारतातील धार्मिक मंदिरांमुळेच प्रसिद्ध झाली आहे. भारतात काही पवित्र देवस्थान आहेत. ते म्हणजे येथील ज्योतिर्लिंग होय. ज्योतिर्लिंग ला जाण्यासाठी खूप लोकांना याचा अनुभव नसतो, तर यासाठी आम्ही तुमची मदत करू. 

आज आपण अशाच एका ज्योतिर्लिंगा बद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग.  भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारत तसेच भारताबाहेर हि या मंदिराची चर्चा आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची गर्दी असंख्य असते. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भारतातील विविध मार्ग आहेत. 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ला येण्यासाठी  ४ मुख्य मार्ग आहेत. जसे कि विमान, रेल्वे, बस, कार  अश्या विविध सेवेनुसार तुम्ही त्रयम्बकेश्वर ला येऊ शकता.  त्र्यंबकेश्वर ला येण्यासाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे रेल्वे. रेल्वे ने आपण अगदी सहज प्रवास करू शकता. 

how to reach trimbakeshwar from nagpur?


त्र्यंबकेश्वर बस ने प्रवास 

जर तुम्ही नागपूर ते त्र्यंबकेश्वर प्रवास खासगी बस ने करत असाल तर तुम्हाला १३ ते १४ तास लागू शकतात.  हे अंतर साधारण ६८६ कि. मी. येते. बस ने प्रवास करतांना तुम्हाला अमरावती पासून २ रस्ते लागतात. औरंगाबाद शहर मार्गे येतांना तुम्हाला एक प्रसिद्ध घृणेश्वर ज्योतिर्लिंग पाहायला मिळेल आणि औरंगाबाद हे शहर पर्यटन म्हणूनही चर्चेस आहे. औरंगाबाद हे  शहर प्राचीन इतिहासा सोबत जोडले गेले आहे. या शहरात येणारे विविध देशाचे लोक पर्यटन स्थळी भेट देतात. अजिंठा आणि वेरूळ येथे प्राचीन लेण्या कोरल्या गेल्या आहेत. घृणेश्वर ज्योतिर्लिंग -वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. इलागंगा नदीच्या तीरावर वेरूळ गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुखी असून जांभ्या दगडाचे आहे.मंदिराच्या छतावर पशु-पक्षी, नर्तक, धनुर्धारी शिकारी इ. चित्रे आहेत. राष्ट्र्कूट वंशातील कृष्णराजाने हे मंदिर बांधले. सध्याचे मंदिर मल्हारराव होळकर यांच्या पत्नीने बांधले असे कळते. दरवर्षी शिवरात्रीला इथे यात्रा भरते. यावेळी मोठी गर्दी होते. नाशिक बस स्थानक ला आल्यानंतर तुम्हाला येथूनच त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी अनेक सिटी बसेस उपलब्ध आहेत आणि काही खासगी कार सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही त्यावरही प्रवास करू शकता. 

त्रयम्बकेश्वर रेल्वे ने प्रवास 

रेल्वे ने प्रवास करतांना नागपूर अजनी रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला मुख्य ३ रेल्वे उपलब्ध आहे.  मुंबई ला जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनस, महाराष्ट्र्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, ह्या रेल्वे ने तुम्हाला सहज प्रवास करता येईल. 

रेल्वे चे नागपूर ते नाशिक अंतर हे अंदाजे प्रवास अंतर ५७१ कि.मी. आहे. नाशिक ला पोहचण्यासाठी १० ते १२ तास एवढा वेळ लागू शकतो. 

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून त्र्यंबकेश्वरला कसे पोहचावे?

नाशिक रेल्वे स्टेशन ला आल्यानंतर तेथून बस किंवा ऑटो रिक्षा ने नाशिक सीबीएस ला यावे लागेल. तेथून त्र्यंबकेश्वर ला जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत.  नाशिक रेल्वे स्टेशन ते त्रयम्बकेश्वर ला पोहचण्यासाठी साधारण १ तास लागतो. त्याचा खर्च १०० ते १५० इतका येऊ शकतो.  आणि जर तुम्ही बस ने जात असाल तर नाशिक येथून जूने सीबीएस पासून तुम्हाला त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी भरपूर बसेस मिळतील.  

त्र्यंबकेश्वर येथे आल्या नंतर तेथे तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवणासाठी पूर्ण व्यवस्था आहे. त्र्यंबकेश्वर जवळच मंदिराचे आश्रम आहे. तुम्ही येथे ऑनलाईन हि बुक करू शकता. आणि दुसरे अजून गजानन महाराज आश्रम मध्ये येथे  राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे. याचा खर्च तुम्हाला ३०० ते १००० रुपये आहे. 

त्र्यंबकेश्वर जवळच हॉटेल्स सुद्धा आहे ज्यांचा एक दिवसाचा राहण्याचा खर्च ५०० ते २५०० रुपये आहे. 

त्रयम्बकेश्वर येथे खूप सारे रेस्टोरंट आणि येथे जेवणाची उत्तम सोय देखील आहे. येथील रेस्टोरंट मध्ये जेवणाचा खर्च १०० ते १५०. आणि याला पर्यांय  म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये असलेल्या धर्मशाळा किंवा आश्रम मध्ये हि तुम्ही जेवण करू शकता त्याचा खर्च तुम्हाला ४० ते ५० रुपये आहे. 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग शिव मंदिर 

त्रयम्बकेश्वर येथे नैसर्गिक वातावरण खूप आनंददायक आहे. मंदिरात जाण्याआधी त्र्यंबकेश्वर येथे सर्वात आधी आपल्याला कुशावर्त तीर्थ पाहायला मिळते. येथे स्नान करूनच मंदिरात प्रवेश करावा. येथे दर १२ वर्षांनी कुंभ मेळ्याचे आयोजन होते. जे मंदिरापासून जवळपास ३०० मी. अंतरावर आहे. शिव आखाडा द्वारा ह्याच तीर्थावर शाहीस्नान केले जाते. असे मानले जाते कि या तीर्था वर स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. आणि  तेथून पुढे गेल्यावर आपल्याला त्र्यंबकेश्वर चे मुख्य मंदिर दिसेल. जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मंदिरात गेल्यावर आपल्याला भगवान शिवाचे  शिवलिंग पाहायला मिळेल. येथे भाविक दर्शन घेण्यासाठी सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत गर्दी करतात.  तेथूनच जवळ ब्रह्मगिरी पर्वत आपल्याला पाहायला मिळतो. ब्राम्हगिरी पर्वत हा त्र्यंबकेश्वर पासून ३.५ कि.मी. अंतरावर आहे. या पर्वतावर गोदावरी नदीचा उगम आहे.  

पुढील स्थान आहे अंजनेरी पर्वत. अंजनेरी पर्वत भगवान हनुमानाचे जन्म स्थान आहे. येथे आपयल्याला भगवान हनुमानाचे पायाचे ठसे सुद्धा पाहू शकता. 

त्र्यंबकेश्वर येथील पंडितजी 

त्र्यंबकेश्वर येथील काही महत्वाच्या पूजा होतात. ते त्रयम्बकेश्वर पंडितजी द्वारा केल्या जातात. त्यापैकी म्हणजे नारायण नागबली पूजा, कालसर्प दोष निवारण, त्रिपिंडी श्राद्ध विधी, महामृत्युंजय मंत्र जप. इ. येथे पुरोहितसंघ पंडिजींद्वारा पूजा केल्याने उत्तम लाभ होतो. 

१) नारायण नागबली पूजा : त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाणारी महत्त्वाची पूजा म्हणजे नारायण नागबळी पूजा, पित्रांच्या आत्म शांतीसाठी केली जाणारी शांती पूजा. त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली पूजा हि दोन वेगवेगळ्या पूजांचे एकत्रीकरण आहे. ज्यामध्ये नागबळी पूजा व नारायण बळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा त्र्यंबकेश्वर येथील पुरोहिसंघ गुरुजींकडून  नारायण नागबळी पूजा एकत्रितच केल्या जातात.  

आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे, हे निश्चित प्रमाणे माहिती नसते. त्यामुळे असे पूर्वज मृत्यू लोकांत भटकत असतात परिणामी त्यांना पितृदोषाला सामोरे जावे लागते, ह्या विधी क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे.  हि पूजा भारतामध्ये फक्त त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते. जिथे भगवान ब्रम्हा, विष्णू  व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत. येथे नारायण नागबली पूजे ला खूप महत्व आहे. कारण हि पूजा पूर्ण भारतामध्ये फक्त त्रयम्बकेश्वर मंदिर परिसरात केली जाते. हि पूजा केल्याने पितृदोष नष्ट होतो असे मानले जाते. येथील धार्मिक विधींना खूप महत्व आहे. 

२) कालसर्प दोष पूजा : त्र्यंबकेश्वर येथे केली जाणारी काळसर्प दोष पूजा ही एक महत्त्वाची पूजा आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत काळसर्प योग असेल तर त्याच्या जीवनात व्यवसाय, शिक्षण, नोकरी, वैवाहिक समस्या, असमाधान, दु:ख, निराशा, नातेवाईकांशी भांडणे किंवा कुटुंबाशी वाद इत्यादी विविध प्रकारच्या समस्या असतात. त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जन्मदाखल्यात हा दोष आढळताच त्र्यंबकेश्वर मंदिरात ही कालसर्प शांती पूजा करावी. यामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. हि पूजा आपल्या कुंडली मध्ये दोष आढळल्यास केली जाणारी पूजा आहे. कालसर्प दोषाचे  एकूण १२ प्रकार आहेत.  

३) त्रिपिंडी श्राद्ध विधी: जेव्हा एख्याद्या व्यक्तीच्या तीन पिढीतील पूर्वजांना अनैसर्गिकरीत्या मरण आले असेल तर अशा व्यक्तीच्या आत्मा शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध पूजा केली जाते.सहा घराण्यातील पितरांना सदगती मिळण्याकरिता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. त्रिपिंडी श्राद्ध हे एक काम्य  श्राद्ध आहे, जे एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या स्मरणार्थ अर्पण केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तीन वर्षे त्रिपिंडी श्राद्ध वंशजांनी केले नाही, तर मेलेले हिंसक होतात, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी पिंडदान विधी  केली जाते.   

४) महामृत्युंजय मंत्र जप विधी : या शक्तिशाली मंत्राचा जप कोणीही कधीही करू शकतो, पण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्र जप विधी आणि ब्रह्म मुहूर्ताची सकाळ या ठिकाणी करणे योग्य आहे, असे येथील गुरुजींनी  सुचविले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे एक पवित्र स्थान असून येथे सर्व विधी धार्मिक पद्धतीने केले जातात, तसेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणूनही ते गणले जाते.  त्रयम्बकेश्वर हे भगवान शिवाचे प्रमुख देवस्थान आहे, येथे महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील  नकारात्मकता दूर होते. 

म्हणून त्र्यंबकेश्वर ला पवित्र असे देवस्थान मानले जाते.

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.