बालमन

*बालमन*

निरागस,अवखळ
स्वतःच्याच विश्वात रमावे
असे ते बालमन
ना कशाचेच तेथे देखावै.....

हसरे ते बालमन
ना चिंता कशाची
रंगत आणतात खेळातून
संगत असते मित्रांची.....

अल्लड ते बालमन
भातुकलीच्या खेळात रमते
मित्रांसवे छान सजते
मन भरून आनंद लुटते....

शांत तेही बालमन
थांग मनाचा समजेना
काय चाललय मनी
काही केल्या उमजेना.....

रम्य ते बालमन
आईबाबांच्या कुशीतले
आजीआजोबांच्या मायेतले
भावंडांच्या संगतीतले.....

अवखळ अल्लड बालमन
धुंद वार्‍यावर तरंगतेय
फुलापानांच्या संगतीत
पाखरू होवून फिरतेय.....

वारा जसे ते बालमन
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसतयं
पावसात चिंब चिंब भिजतयं
इंद्रधनूवर झोके घेतयं.....

*वसुधा नाईक,पुणे*

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.