दिवाळी

Vasudha Naik

Vasudha Naik

5 November 2018 · 1 min read

,.*दिवाळी*

सोनपावलांनी दिवाळी आली
लक्ष्मी आली माझ्या घरी
दीपदीपातूनी उजळती दाही दिशा
गुंफुनी झेंडूफुले तोरण बांधते दारी....

दिवाळसणाचा अतीव आनंद
उटण्याचा धुंद सुगंध
फराळाची लज्जतच न्यारी
रंगांची ,पणत्यांची सजावट दारी...

वेगवेगळ्या पणत्यांनी सजले
प्रत्येक घराचे सुरेख अंगण
चमचमणार्‍या तार्‍यांनी भरले
उंच उंच नभांगण.....

नभांगणातील इंद्रधनूचे रंग
वसुंधरेवर  अवचीत अवतरले
प्रत्येकाने आपल्या घरासमोर
ते रंग रांगोळीत छान सजवले....

नवनवेली सुरेख नवरीबाई
दीप सजवते आपल्या दारी
रोप लावते कुटुंबात आनंदाचे
खुशीने नांदते भरल्या संसारी...

*वसुधा नाईक,पुणे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.