एकदा मी माळरानावर गेले
गुलाबांचे रान पाहिले
रानामधे गुलाबांच्या कळ्या
बेधुंद होवून पाहत राहिले....
कळ्यांना राखत होते
टोकदार छोटे काटे
छोटी नक्षीदार पाने जणू
झोपाळाच त्यांचा वाटे......
डुलतात फुले माळरानावर
सुगंध पसरवतात वार्यावर
टपोरी छान उमलली कळी
दिमाखात शोभे काट्यावर....
स्तुती करतात गुलाबाची
त्याच्या मनमोहक रूपाची
काट्यातून डोकावते वर फूल
किती वर्णावी थोरवी त्याच्या गुणाची...
गुलाब मस्त फुलला
देवाला हार बनवला
मुलींनी तो केसात माळला
सजावटीसाठी फुलदाणीत सजवला,...
*वसुधा नाईक,पुणे*