काही चांगल घडण्यासाठी,बदल; I mean Change महत्वाचा; असं सगळेच म्हणतात, मीही त्याला अपवाद नाही; मात्र हा 'Change' जो काही आपण म्हणतो, तो आपल्या सर्वांना Positively Accept ही करता यायला हवा. आणि एखाद्या 'Change' मुळे, जर का आपलं मूळ अस्तित्वच बदलणार असेल, तर हा बदल खरचं अपेक्षित असावा का.? कितीजण हा बदल Accept करतील.?!
Change आणि त्याच्या acceptance बाबतीत, मला अनेक प्रश्न पडतात, काहीं प्रश्नांची उत्तर सहज सापडतात, मात्र काहींची उत्तरं आणि कधी तर ते मूळ प्रश्नचं मनाला पटत नाहीत.!
मला नेहमीच पडणारा common प्रश्न, common यांसाठी की तो अनेकांना पडला असेल, पडत असेल.!! काहींनी त्यांवर खूप विचारही केला असेल, मग विचारांती तो सहज सोडूनही दिला, तर काहींनी जाणीवपूर्वक त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं...!
लग्न : मुलींचं लग्न होत म्हणजे काय होतं.?? तर तिचं आजवर निर्माण झालेलं अस्तित्व, तिची Identity अगदी सगळंच बदलून जातं, का?? आणि हे कोण बदलवून आणतं.? तो बदल ती मुलगी स्वतः Accept करते, की समाजरित तीला तस करायला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग पाडते..?? मुळात हा बदल खरचं गरजेचा आहे का..? आणि आहे, तर का.?? कुणासाठी.?? आणि तो फक्त मुलींसाठीच का??? आईला विचारलं, आजी, मामी, मावश्याही वगळल्या नाहीत; पण सर्वांचं हेच मत, की हे असंच चालत आलय आणि असच चालत राहणार, हीच रीत आहे ग बाई, तुलाही तेच करावं लागणार, तुझ्या मुलांनाही आणि त्यांच्या मुलांनाही.
किती प्रश्नांना तोंड देत, संकटांना आवरत सावरत, रूढी परंपरेवर मात करत, अनेक मुली आपली identity निर्माण करतात आणि मग काही वर्षांनी, काही क्षणात, ती identity तिनं सामाजिक बांधिलकी म्हणून change करायची, का..? आई बाबांनी खूप लाडानं, प्रेमानं ठेवलेलं नाव; बाबांचं नाव, आडनाव, काहीच शिल्लक ठेवायचं नाही.., मग बाबाचं नाव जाऊन नवऱ्याचं नावं येतं; (आईच नावचं काय मतंही गृहीत धरलेली) तशीच प्रथा असते म्हणे..; का त्या मुलाला आपल्या मागे मुलीचं नाव लावणं गरजेचं नाही.? कीं तसा नियम किंवा कायदाच पुरुषप्रधान संस्कृतीत अस्तित्वात नाही?? पुढे बंधू प्रेमासाठी (तिथे कायदा दुय्यम, बर का) तिने आधीचे सर्व हक्क सोडून द्यायचे.. बंधुप्रेमापोटी.?
बरं लग्नानंतर नुसतं नावचं नाही, तर सगळे documents change करा; नाव, नाती, घर आणि अगदी घरच्या पत्यापासून; जी काही कागदपत्र आहेत ती सगळी नव्याने पुन्हा तयार करा. आई बाबा, भाऊ, बहीण नातेवाईक सगळे सोडुन; जे जन्मापासून आहेत त्यांना फक्त एका so called परंपरेसाठी मुलीने बदला आणि नवी नाती तयार करा आणि ती तयार झालेली नाती सांभाळण्याची जबाबदारी ही तिनंच घ्यायची. बदल अपेक्षित नसेल तरी बदल घडवून साऱ्या परिवाराला नम्र होऊन, आपलं समजून, दुसऱ्याच घर आपलं आहे असा change करायचा. मग स्वतःला, त्या घरातल्या माणसांनुसार; सवयीनुसार; (कधी तर) धर्मानुसार पटत नसेल तरी बदलावा. job करत असाल तर; (स्त्रीयांचा job हा अनेक पुरुषांना दुय्यमच वाटतो, किंवा काहींना Atm मशीन) जुना job असेल तर, "सोडून दे आता" किंवा "दुसरा job बघा" आधीच नवीन ठिकाण; मग नवीन ठिकाणाहून updown करा. त्या बरोबरच घरातही लक्ष हवं जरा जरी up चं down झालं, दुर्लक्ष झालं; की careless ही पदवी आहेच. कुठे एखादी मुलगी हावी झालीच तर, "जास्त बोलु नकोस", हे असंच करायचं...दबून राहायचं आणि डांबून घ्यायचं..आणि सरते शेवटी एवढं सगळं Change करून मुलांसमोर नाव लागत ते वडिलांचं. आई optionच, परंपरेनुसार.! घरच्या Name Plate वरही नाव असत ते घरातल्या पुरुषाच..(कर्ता असो व नसो)तिथे ही बाई optionच; घरात एखादी चांगली गोष्ट केली, तरी, "अरे ती ह्याच्या बायकोने केली". प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अस बहुतेकजण म्हणतात; पण त्या स्त्रीच अस्तित्व असतं कुठे..?
ह्या अशा बदलाला सामोर जाणं खरच किती जणांना शक्य आहे.? बदल हा हवाच, पण मला म्हणायचंय की, हा बदल एकाच बाजूने का..? दोन्ही बाजूने का नको.??
बघू, एकदा जावई घरी आणून !! बघू, त्याला आपल्या मुलीच नाव देऊन.!! बघू, आता त्याचेही आई बाबा, नातेवाईक, नाव, घर identity आणि documents बदलून, जॉब बदलून..!! बघू त्याला विदा होताना, आई बाबाच्या गळ्यात पडून रडताना, उंबरा ओलांडताना, अनोळखी घरातल्या सवयीनशी जुळवून घेताना. हा बदल जमेल त्याला.. पण हा नवा आणि नवलाईचा change बघायला आम्हा मुलींना नक्की आवडेल.!
एक पुरुष महाशय म्हणाले.. "ह्यावर हाच उपाय असू शकतो का.? पुरुष स्त्रीच्या घरी किंवा नाव बदल करून आला, तरी काय असा फरक पडेल.?? पुरुष संस्कृतीत बदल होईल का.??? की पुरुष मानसिकता सुदृढ होईल.???? की पुरुष संस्कृतीने केलं, म्हणून आता स्त्रियांनीही हा बदल डोक्यात घेऊन, बदला घेण्यासाठी हे करायला हवं आहे का.????"
मुख्यतः या आधुनिक changesला बहुतेक पुरुषांचा विरोध असेलच; मात्र याला विरोध करणारी पहली स्त्रीचं तर नसेल न.?? असेल का कुणा मुलाची आई. मुलगाच डोक्यात असणाऱ्या आयांनी यावर सखोल विचार करायला हवा; उदार मतवादी आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आणि कौटुंबक जीवनात स्त्रीला हक्काचं स्थान मिळावं म्हणून.!! जेव्हा मुलीला तिची मतं, तिचा अधिकार, स्वातंत्र; न मागता मिळेल, तेव्हाच या change किंवा उत्क्रांतीत आशेच किरण अपेक्षित आहे.!!"
आधुनिक पिढी स्वतःच्या मतांची आहे, त्यामुळे हा बदल आधुनीक मुलांनी स्वतः accept करून अमलात आणन गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या मागे पुरुषांची मानसिकता judge करण्याचा जराही प्रयत्न नाहीय किंवा मुलींबरोबर हे सगळं होतंय म्हणून मुलांबरोबरही झालं पाहिजे असंही अजिबात नाहीय. किंवा so called समाजाच्या प्रथा follow करणाऱ्यांवरही माझा काही विरोध नाही. यामागे एवढीच अपेक्षा आहे की, मुलीच मन समजून, सजग बदल व्हावा.
असही विचारलं जाईल पुढे, "तू काय करशील तुझ्या मुलांच्या बाबतीत.." मी म्हणेन.. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देणं माझ्या हातात आहे, पण त्यांचे decisions घेण्याचा हक्क सर्वस्वी त्यांचाच असेल; आणि ती नक्कीच positive असतील,
बघू तुम्हाला किती जमतंय.? Anyways मुलांची मतं लगेच मान्य होतात तर त्यांच्यासाठी हे काहीच अवघड नाहीं. मुलींना तर band baja सहित विदा केलं जातं; एखादं celebration असल्यासारख; आता मुलांनाही विदा करून बघू एकदा. Afterall change accept करायला शिकलच पाहिजे.
रूपाली कुटे बावकर