Image

जीवनला अनेक नवे आहेत ,जीवन खूप सुंदर आहे कुणाला ते थोड दुखाचे वाटते .पाहावे तेवढे सुंदर आणि बघावे तेवढे गंभीर असते जीवन .कोणाला अख्खे आयूष्य तिजोरी चोरापासून लपून ठेवण्यात जाते तर कोणाचे आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात निघून जाते.बाहेर पडलेच कधी तर अनेक  प्रश्न दिसतात ,काही रडवतात ,तर काही अंतर्मुख करून जातात .मग सहजच मनाला वाटते ,जे हात भाकरीचा चंद्र शोधते त्याला जर हे अन्न फेकून न देता आपुलकीने खाऊ घातले तर त्यांचे मन  किती शांत होईल .ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी आपल्या मानवतेला जागृत करून त्यांना मदत केले पाहिजे .एका माणसाने दुसर्या माणसाच्या दुखात धून जावे ..आयूष्य संघर्षाचे दुसरे नाव आहे .आयुष्य म्हटले कि  संघर्ष आलाच म्हणून खचून न जाता मिळून त्याला सामोरे गेले पाहिजे . 

                                                                                                         Adv  Vishakha Borkar