Image

      आजकाल व्हॉटसअप वर DC नावाचा रोग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे.ह्या रोगात रोगी स्वतःच आजारी पडतो नी त्यावरचा इलाज आपल्या प्रियजनांनकडून करवून घेतो.रोगी मित्राने आजारचा संदेश धाडल्यावर आपली इच्छा असो वा नसो आपल्याला त्याच्यावर बिनपैश्याचा इलाज हा करावाच लागतो,कारण रोगी हा आपली अंतिम इच्छा असल्यासारखं पेच त्याच्या मित्रांसमोर निर्माण करतो (agar aap muze sach me dost mante ho to...)

     मग बिच्चारे आम्ही मोबाईलच्या मेंदूतून रोगी मित्राचा एक तजेलदार छायाचित्र व्हॉटसअप च्या स्टेटस मध्ये लटकवतो .आणि 24 तासानंतर मूर्त अवस्थेत असणार हे छायाचित्र अमूर्त होते याला कारणीभूत म्हणजे मार्क झुकेरबर्ग ची करणी.त्या नंतर त्या छाायाचित्राखाली मित्रांच्या विशेषणांनी 2~4 फुल वाहून फोटो ला मानवंदना देतो.आणि ह्या सगळ्याचं फळ म्हणून आपल्याला views च्या रूपाने पोकळ आहेर मिळतो.जितका आहेर जास्त तितकं मित्राच्या आत्म्याला शांती जास्त.अस केलं की रोगी मित्र आजारातून उठून माणसात बसतो म्हणजेच तो बरा होतो.आणि आपण मित्रच जीव वाचवून मित्राच्या~मैत्रीला जागलो हे जगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण दोन लेटर छापतो ; DC ***. मैत्री निभवायची म्हणजे अशी छोटी मोठी झंगट ही करावीच लागतात

मोरे_गणेश.