Image

"बौध्द साहित्याची व्याप्ती"

भारतीय बौध्द संस्कृतीचा काळ २५०० वर्षापुर्वीचा होवून गेला असला तरीही, त्या काळात बुध्दांनी सांगितलेल्या दैनंदिन जिवनाला प्रभावीत करणारे निती, नियम आजही सामाजिक व कौटूंबीक जिवनाला लागू पडतात व प्रभावीत करतात।
 बौध्द संस्कृती व बौध्द तत्वतज्ञान जतन करण्याचे कार्य जर केल्या गेले असतील तर ते, बौध्द साहित्यामधून।
‌बुध्दाच्या जिवीत कार्यकालात लिखीत साहित्याची निर्मीती जरी आढळून येत नसली तरी, बुध्दाच्या प्रवचनातून, तत्वज्ञानातून ज्या काही उपदेशात्मक गाथा, वचने सांगण्यात आली, ती त्यांच्या महापरिनीर्वाणानंतर ४०० वर्षानंतर, श्रीलंका द्विपावर, तालपत्र वर , "त्रिपिटक" या ग्रंथात लिपीबध्द केले गेले।
‌बुध्दांच्या द्वारा दिलेल्या उपदेशाला, संग्रहित केलेल्या प्रमाणबध्द बौध्द ग्रंथाला "त्रिपिट" म्हणतात.
‌बौध्दांचे वाड्मय किंवा साहित्य म्हणजे त्रिपिटक.बौध्द संस्कृतीतील अतिशय महत्वाचे व प्रामाणिक ऐतीहासिक ग्रंथ म्हणून त्रिपिठक कडे पाहिले जाते.
‌"तिपिटक" किंवा "त्रिपिटक", "त्रि" आणि "पिटक" असे दोन शब्द मीळून बनलेला शब्द. त्रि म्हणजे तीन, पिटक म्हणजे ग्रंथ किंवा पुस्तक.
‌ज्या प्रमाणे विवीध धर्मातील ग्रंथ , त्या त्या धर्मातील साहित्य संस्कृतीचे जतन करते, त्याच प्रमाणे बौध्द धम्मातील त्रिपिटक हे सुध्दा बौध्द साहित्याचे जतन करते.
‌रामायण, महाभारत,गिता हे ज्या प्रमाणे हिंदू धर्माचे ऐतिहासीक साहित्य म्हणून स्थान पावले आहे, त्याच प्रमाणे बौध्द संस्कृती मधे त्रिपिटक हे प्राचीन व ऐतिहासीक ग्रंथ म्हणून प्रसिध्द आहे.
‌बौध्द साहित्यातील प्रमुख "त्रिपिठकात" तीन भाग पडतात. १- सुत्तपिठक,२-विनयपिठक,३- अभिधम्मपिटक. आणि याचेही अनेक विभाग पडतात.
‌याच ग्रंथापैकी "खुद्दकनिकाय" या ग्रंथात सुत्र किंवा धम्मदेसना, जीवनी, जातक याचे उदाहरण दिले गेले आहेत. यात एकुण १५ ग्रंथ आहेत. १- खुद्दक पाठ, २-धम्मपद,   ३ - उदान, ४ - इतीवुत्तक, ५ - सुत्तनिपात, ६ -विमानवत्थु, ७ -पेतवत्थु, ८ -थेरगाथा, ९-थेरीगाथा,  १०- जातक, ११ -निद्देस, १२ -पटिसम्भिदामग्ग, १३- अपदान, १४ -बुध्दवंस, १५-चरियपिटक पैकी, थेरगाथेत सगळ्या प्रकारच्या दु:खातून मुक्त झालेले अर्हंत भिक्षूंद्वारा व्यक्त केलेल्या गाथा व स्वयं कथांचा समावेश केला गेला आहे.
‌तसेच थेरी गाथेत सगळ्या प्रकारचा दुख:तुन मुक्त झालेल्या अर्हंत भिक्षूणी द्वारा व्यक्त केलेल्या गाथा व स्वयंकथा संकलीत केलेल्या आहेत.
‌त्रिपिटकातील या साहित्याकडे, बौध्द साहित्या बरोबरच पाली साहित्त याही दृष्टीकोणातून पाहिले जाते.
‌भारतीय साहित्ती क्षेत्रात, संस्कृत भाषेच्या बरोबरीतच पाली म्हणजे बौध्द साहित्याकडे पाहिले जाते,  किंवा असे म्हणता येईल की संस्कृत साहित्यापेक्षा बौध्द साहित्य कुठेच कमी नाही.
‌उलट दोन्ही साहित्याचे मुल्यमापन केले असता, संस्कृत साहित्य हे मानवी मुल्यांचे शोषण करण्याचे समर्थन करणारे आढळते ,  तसेच दु:ख, रोग , जन्म मृत्यू च्या भवचक्रात भितीयुक्त बांधून ठेवणारे आढळते, या उलट बौध्द साहित्य , पालिसाहित्य मानवीय जिवनमुल्य अंगीकारून, जतन करण्यास प्रवृत्त करणारे, सत्य, वास्तवीक जीवन , आदरयुक्त जिवनशैली, भितीमुक्त मानसिकता, याचे ज्ञान व बोध देवून प्रवृत्त करणारे साहित्य आढळते.
‌बौध्द साहित्याची निर्मीती फक्त भारतातच झाली असे नाही. हे असे साहित्य आहे जे भारता बाहेर ही निर्मील्या गेले. बौध्द साहित्य पालि भाषेसह, सिंहली भाषेतही आढळते.
‌वास्तविक व सत्य जिवन याचे उत्तम सांगड म्हणजे बौध्द साहित्य, हे आपण तपासुन पाहू शकतो, थेरी गाथेतून.
‌बुध्द शाशन कालात व तद्नंतरही होवून गेलेल्या विदुषीणी भीक्षुणीं, ज्या स्थवीर पदा पर्यंत पोहचून, अर्हंताची अनुभुती पर्यंत पोहचल्या, त्यांनी पुर्वायुष्यातील जिवनावर भाष्य करून, त्याचे आयुष्य कसे दु:खी कस्टी होते. त्यांनी कशा यातना सोसल्या, मग त्या दु:ख मुक्तीच्या या वाटेकडे कशा वळल्या, आणि भयमुक्त, दु:खमुक्त जिवनाचा अर्थबोध कसा झाला हे सारे विस्तृत मधे, पाली गाथेच्या रूपात वर्णन केले आहे.  
‌थेरी गाथेच्या या बौध्द साहित्याच्या रूपात,  त्या काळातील जिवनशैली,  स्त्री जिवन, व स्त्री जीवनातील समस्यांवर भाष्य करण्याचे स्त्रीयांचे स्वातंत्र, म्हणजे मानवीय जिवन मुक्तीच.
 एकुण म्हणजे असे म्हणता येईल की, बौध्द साहित्यात , स्त्रीयांचे जीवन , व्यक्ती म्हणून,मान्य केले गेले. तिचे  स्वातंत्र मान्य केले गेले.
ज्या समाजात, सामाजिक घटकात, स्त्रीयांचे अस्तित्व व विकास मान्य केले गेले, त्यांचे मानवियत्व मान्य केले गेले, तो समाज, सामाजिक घटक म्हणजे मानवाघिस्टीत समाज.  मानवी मुल्य जपणारा समाज.
आणि असे मानवी मुल्य, बिजे रूजवीण्याचे कार्य करते, ते प्राचिन व ऐतिहासीक साहित्य.
वर्षोनुवर्षापासुन भारतिय समाजात, माणुसकीची नितीमुल्ये रूजविण्याचे, त्याचे संवर्धन व संगोपन करण्याचे कार्य , बौध्द साहित्य करित आहे.
या साहित्य प्रकारात, प्रामुख्याने महत्वपुर्ण समावेश करण्यात येत असलेल्या ग्रंथात, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे,"बुध्द आणि त्यांचा धम्म" या ग्रंथासह, डाँ. भदंत आनंद कौशल्यायन,द्वारा लिखीत अनेक ग्रंथासह, मिलींद प्रश्न, जातक कथा, अश्वघोष रचित ग्रंथ, आणि अगदी अलीकडिल लेखकां द्वारा लिखीत पुस्तकांचा ही समावेश होतो.
अलिकडे मोठ्या प्रमाणात, पालिसाहित्याचे हिंदी, मराठी व इंग्रजी अनुवाद झालेले साहित्य उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बौध्द साहित्याला आता भाषेची मर्यादा राहीलेली नाही.
तसेच साहित्य स्वरुपालाही बंधन राहिले नाही.
बौध्द साहित्य कथा, कादंबरी च्या रूपात, नवसाहित्तीकांकडून निर्मील्या जात आहे.
एकुण म्हणजे , बौध्द साहित्याची भाषा व प्रकार कोणताही असला तरी, धेय्य मात्र सारखेच,  की बौध्द तत्वज्ञान, नितीमत्ता, मानवाघिस्टीत मुल्ये यांची रूजवणूक, संवर्धन करणे. व जनमानसापर्यंत पोहचविणे. आणि म्हणून बौध्द साहित्याची व्याप्ती मोठी व विशाल आहे.
( संदर्भ- थेरीगाथा, त्रिपिटक ज्ञान- भदंत इंदवंश थेरो)
अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
साहित्तीक, भंडारा
9921096867