Image

             झेप घे रे पाखरा 

"उंच उंच आकाशी!
मुक्त त्या गगनाशी!
लेवून पंख बळकट!
झेप घे रे पाखरा!
झेप घे रे पाखरा!"

तो फक्त ९ व्या वर्गात होता. अजुनही त्याला पंख फुटलेले नव्हते. पण दुसऱ्यांची गगनभरारी पाहून, त्याचे इवले इवले पंख तळफळू लागत. मुलाच्या पंखाची ही तळफळ एक आई म्हणून, मी नाही समझणार तर कोण? कारण मी सुध्दा एक व्यक्ती म्हणून वयाच्या 38 व्या वर्षी स्वताच्या अस्तीत्वाला जाणायसाठी व सिध्द करायसाठी  तळमळत होती. तडफडत होती.
माझ्या बळकट झालेल्या पंखांना वाट होती ती फक्त गगन भरारी घेण्याची. पण माझा बच्चू, रिंकेश याला मात्र उंच भरारी घेण्यासाठी आवश्यकता होती ती प्रथम त्याच्या डोळ्यात उचं भरारीचे स्वप्न देण्याची.
मुक्त गगनात भरारी घेण्यासाठी, डोळ्यातील स्वप्नांसह मन ही तेवढेच मुक्त असावयास हवे.
आणि मन मुक्त होण्यासाठी,ज्ञानचक्षू ही तेवढेच मुक्त हवे व ज्ञानचक्षू मुक्त होण्यासाठी अनुभवाची सिदोरी व निरीक्षणाची वृत्ती हवी आणि यासाठी नेहमीचे घरटे सोडून, बाहेर पडावयास हवे. हे माझे मत ठरवून मी त्याला मोठ्या व अनोळखी शहरात म्हणजे मुंबईला  घेवून गेली डिसेंबर 2014 मधे .
उंच उंच इमारती, धावती लोकल गाडी आणि वायुच्या वेगाने पळणारे लोक, चौदा वर्षाच्या चिमुरड्याला भरपुर होते, मनात मुक्त गगनात झेप घेण्याचे स्वप्न बघावयास.
आणि इथूनच माझ्या बच्चूने ठलवल की 12 वी च्या शिक्षणानंतर, त्याला व्यावसायीक क्षेत्रातील शिक्षणासाठी  बाहेर पडायचे आहे.
माझ्यामते अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही . तर एक सुज्ञ व्यक्ती म्हणून स्व व अवतीभवती च्या नैसर्गीक, वैज्ञानीक,सामाजीक, स्थितीचे भान ठेवून योग्य ताळमेळ ठेवून मानवतेला पुरक असे जीवन व्यापनाचे गुढ जाणणे.
माझ्या बच्चूच्या शैक्षणीक क्षेत्राची पुढची वाटचाल ही बाहेर सुरू होइल व तो दुर माझ्या दृष्टीआड राहिल हे विचार सतत माझ्या डोक्यात घिरटे घालू लागले. सोबतच मी असे काय बोध देवू त्याला जो तो शिक्षणासाठी बाहेर पडला तरी, त्याचे पाय डगमगणार नाहीत, मला याचा विश्वास मिळावा हे ही वाटत होते.
 तेव्हा एक आई म्हणून माझ्या डोक्यात हे विचार येणे, मी तरी चुकीच मानत नाही.
यावर मला सरळ व सोपा मार्ग सुचला, आणि तो म्हणजे मी बुध्दांच्या ज्या धम्माला अनुसरते, त्या धम्माचे त्याला श्रामणेर जीवनाचे निदान दहा दिवसाचे तरी शिक्षण देणे.
दहावी नंतर तो दिवसेंदिवस अगदी ठाम निर्णय घेवू लागला स्वतासाठी.
खरे तर आर्थीक परिस्थीती नसतांनाही, त्याला लहानपणापासून, सि.बी.एस.इ. बोर्डाच शिक्षण देतांना, कुठ तरी माझ्या डोक्यात सुप्त इच्छा दडून बसलेली होती की, तो डाँक्टर बनावा. डाँक्टर बनून व्यवसायासह सामाजीक कार्यात सक्रीय व्हावा. तो डाँक्टर बनाना हे का वाटत होते तर, त्याचा बायोचा आणि मँथ चा अभ्यास आधी खुप छान म्हणून, आणि सामाजीक कार्याची मला ओढ म्हणून.
दहावीला बऱ्यापैकी मार्क पडले, 85%  यामुळे तो  डाँक्टर बनेल या माझ्या आशा आणखीनच पाल्यान्वीत झाल्या. 12 वी शेवट पर्यंत मी याच खुळ्या आशेवर व भ्रमात असतांना,
एके दिवशी रात्री जेवन करतांना, " मम्मी। मुझे नीट की इग्जाम नही देनी." तो अगदी ठाम बोलला.
काही क्षणासाठी तर मी काय ऐकतेय? जे ऐकतेय त्यावर काय बोलाव? काहीच समझेना. डोक सुन्न झाल, पायाखालची जमीन सरकली.
सी. बी. एस. इ. च्या बोर्डाचे शाळेत पुर्ण क्लासेस होत नाही व नीट, सिइटी, जी मेन्स अशा विवीध परिक्षांचा सराव व अभ्यास होण्यासाठी महागड्या इंस्टिट्यूट चे इयत्या अकरावी व बारावीचे क्लासेस लावले होते.
आणि मुलगा एन परिक्षा तोंडावर आली असता मला हे ऐकवतोय,
पण मी मात्र, " मतलब???" माझ्या डोक्यावर नियंत्रण मिळवत शांतपणे संवाद वाढवला
"मतलब के मुझे मेडीकल फिल्ड मे नही जाना। "
"तो? " मी त्याला काय बोलायचे आहे हे जाणून घेण्यासाठी
"मुझे डाँक्टर वाँक्टर मे इंट्रेस नही है,मुझे सायंटिफीक फिल्ड मे इंटरेस है. मुझे वो सेल्स वेल्स का सर्च अच्छा लगता है." तो सांगत होता.
"ये तेरा पक्कावाला डिसीजन है।" मी नजर रोखून बोलली
"हाँ। ये मेरा लास्ट डिसीजन है. मुझे मेडीकल और इंजीनीर दोनो फिल्ड मे नही जाना."
"फिर तुझे जीस फिल्ड मे जाना है, उसकी प्रोसेस क्या है. "
" यही, जी मेन्स की इग्जाम."
" ,ठिक है। तु देख अपनी चाँइस से. पढायी तुझे करनी है. मै अपना डिसीजन तुझपे जबरदस्ती थोपती नही. बट अभी जीतने इग्जाम को बैठा है, सब  दे. और अगर नीट मे स्कोर अच्छा आता है, गव्हरमेंट एम बी बी एस लायक तो उसके बारे मे सोचेंगे. और तु जो भी डिसीजन लेगा, तेरे लाइफ और करीयर का उसका जो भी परिणाम हो, जीमेद्दारी तेरी होगी."
"ओ के. मंजुर। मेरा करीयर जो भी होगा, वो मेरी जिम्मेदारी होगी."
बोलल्या प्रमाणे परिक्षा दिल्या त्याने आणि आधी बोर्डाचा निकाल व नंतर इतर परिक्षांचा निकाल.
बोर्डाचे मार्क साधारण, सि.बी.एस.इ. 75%
"तुला येवढ्याच मार्क ची अपेक्षा होती?" मी त्यालाच विचारले.
"नही।मै इससे ज्यादा ले सकता था. बट गलती मेरी ही है. मै ओवर काँम्फीडंस मे घुंस गया." बेधडक उत्तरासह स्वताची निश्काळजी शोधून, कमी यशाचे कारण शोधून , निसंकोच स्वताची चुक मान्य करूण, आपल्या चुकाचे खापर इतरांच्या मस्तक्षी न फोडण्याची त्याची वृत्ती मला भावली व प्रेरीत ही करून गेली. त्याच्या या उत्तरापुढ मी काहीच बोलू शकली नाही कारण मी हे जानले, की जो व्यक्ती स्वताच्या चुका शोधून मान्य करेल, तो व्यक्ती झालेल्या चुका सुधारेल. जो चुका शोधणार नाही, त्या मान्य करणार नाही तो वारंवार चुकाच करीत राहिल. आणि झालेल्या चुकांमधून बोध घेणार नाही.
संपुर्ण परिक्षांचे निकाल लागून, विवीध व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी काँन्सलींग सुरू झाली. एक आई म्हणून मला "आता त्याचा प्रवेश कोणत्या क्षेत्रात होतो? जास्त स्ट्रगल न करता पटकन करीयर सेटल व्हाव अशा अभ्यासक्रमात त्याचा नंबर लागावा" ही माझी प्रार्थना, स्वप्न, धळपळ, ईच्छा।
पण।। पण त्याने तर पुर्वीच आपले क्षेत्र निवडले होते. त्यावर तो ठाम होता.
माझा भाऊ इंजीनीयरींग चा अभ्यास असलेला त्यामुळे त्याने जे थोडेफार प्रयत्न केले याचे मन वळवीण्याचे ते असे की, जी मेन्स ला याला चांगले मार्क पडल्यामुळे याने अभियांत्रीकीच्या  शासकिय काँलेज मधे महाराष्ट्रातच अँडमीशन घ्यावी.
आणि माझा प्रयत्न होता की, नीट ला 250 च्या जवळ मार्क पडल्यामुळे पुन्हा एकदा एम.बी.बी.एस.साठी निट इग्जाम रिपीट करायची संधी घ्यावी.
पण त्याचा निर्णय ठाम. जी मेन्स अंतर्गत, बायोटेक व सायन्टीफिक ची डिफरंट फिल्ड, डिफरंट एजुकेशन.
एजुकेशन त्याचे, करीयर त्याचे, आवड इच्छा त्याची, आणि पर्सनल लाइफ ही त्याची. मग आपण केवळ पालक म्हणून, आपले निर्णय, इच्छा, स्वप्न का त्याच्यावर लादायचे???
हा माझा व माझ्या भावाचा विचार.
आणि "ओ.के.न्। त्याला जे शीकायचे ते शीकू देवू. शेवटी अभ्यास करणारा तो आहे. आणि त्याचा चांगला किंवा वाइट होणारा परिणाम ही त्यालाच फेस करायच आहे." आम्हा दोघा बहिण भावाची छोटीशी चर्चा.
मात्र माझ्या मुलाने आपले प्रयत्न आधीच चालवले होते. अभियांत्रीकीच्या विवीध काँलेज व ब्राच ला नंबर लागूनही, आम्हाला न सांगता, त्यानेच ते नाकारले व एन. आय. टी. साठी, "लाइफ सायन्स" चे आँपशन भरले.
आणि त्याच्या प्रबळ इच्छा शक्तीचा परिणाम होवून, ओरीसा राज्यातील, राऊलकेला एन. आय. टी. मधे लाइफ सायन्स या फिल्ड ला पाच वर्षाच्या पि.जी. साठी त्याचे नंबर लागले.
हा विजय फक्त त्याचाच नाही तर एक आई म्हणून माझा त्या प्रयत्नाचा आहे, जे मी तीन चार वर्षापुर्वी त्याच्या पंखात बळ येण्यासाठी व डोळ्यात मुक्त गगनातील उंच भरारीचे स्वप्न येण्यासाठी करीत होते.
आणि मन माझे त्याला हेच आशीश देते,
"झेप घे रे पाखरा।
झेप घे रे पाखरा।"

            अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
              भंडारा
              लेखिका/ कवयित्री
               9921096867