Image

*काळोख*

काळोख दाटला होता मनी
आता सारीकडे  उजाडले
पक्षी,विहग घरट्यातूनी
बाहेर पडू लागले...,

काळोख उतरतो  खोल मनात
छेदून जातो पार अंतरात
अस्वस्थ त्या  शांततेतून
राहतो  मनी विचार भिरभिरत....

अस्वस्थ त्या शांततेतून
गुरगुरते  श्वान एक
मग भीती  वाटते खूप
विचार मनी येती कैक....

दाटलेल्या मनीचा  काळोख काढण्या
उजळू दे एक किरण प्रकाशाचा
प्रातःकाली जावे काळोखाने न्हावून
कवडसा पडलाय नारंगी सूर्याचा....

काळोख संपूनी उजेड पसरला
या हिरव्या  वसुंधरेवर
सुर्याची लाली पसरली
वृक्षांच्या पानापानावर.,.

*वसुधा नाईक,पुणे*