Image

" कवी कट्टा २०१८ बडोदा " येथील साहित्य संमेलनासाठी निवड झालेली माझी कविता
शिर्षक  ' कस ' पाठवित आहे .👇👇

कवितेचे शिर्षक :     कस

(वृत्त :  वियद्गंगा . लगागागा ४ वेळा )

खरे ठरण्यास सोन्याला जळावे लागते आधी
तसे खाणींत रत्नाला कळावे लागते आधी

घणांचे सोसता ठोके दगडही देव की व्हावा
तसे संतत्व येण्याला छळावे लागते आधी

जरी या उंच वृक्षांना वेढती ह्या तरु वेली
पुन्हा ते बीज होण्याला फळावे लागते आधी

उगवते बाजरी, ज्वारी गव्हाचे शेत भाताचे
तरीही भाकरी होण्या दळावे लागते आधी

परिक्षा रोजची आहे प्रतिक्षा पास होण्याची
तरी या शर्यतीमध्ये पळावे लागते आधी

सुनामी येतसे कोठे कधी भूकंप ही होतो
मुखवटे मीपणाचेही गळावे लागते आधी

जिवाला जीवनामध्ये यशाचे टोक गाठाया
भवाच्या तप्त तेलाने तळावे लागते आधी

असा मोठेपणा सारा मिळे ना सहज कोणाला
कधी जाता पुढे पुन्हा वळावे लागते आधी

परी त्या ध्येय्य लक्षास वेधण्या व्याध होऊनी
स्वतःच्या अंतरंगाला मळावे लागते आधी

---- कवी सुधीर नागले
मु .पो. गोरेगांव, ता . माणगांव,
जि. रायगड, महाराष्ट्र राज्य .
Email. Id.
sudhirnagle56@gmail.com

Mobile no.
9145840567.
🙏🙏🙏🙏