Image

*वर्ष सरताना*

२०१८ वर्ष सरले
आता थोडे उरले क्षण
आठवून तै सारे क्षण
जड झालेय हो मन....

जड झालेल्या मनाने
निरोप वर्षाचा घेवूया
सरत्या वर्षाला
मनी आनंदी होवूया....

सुख  दुःखाचे  जाळे
विणलेय या वर्षाने
आठवून   हे सारे
मन होते वेडे   हर्षाने....

समजुतीने  घेतले
सर्वांशीच   नित्याने
जर काही चुकले माझे
तर माफ करा मोठ्या मनाने,....

मित्रांनो आपल्या संगतीने
हे वर्ष  सुखात  सरले
मी  चारोळी,कविता
छान करू  लागले,....

या  सरत्या वर्षाने  मला
ओळख  नव्याने  दिली
कवयित्री म्हणून मी
प्रसिद्ध  होवू  लागली.....