Imageमनाच्या तळाशी होते,
आठवणींची साठवण!
आयुष्याचे अमूल्य ते क्षण,
अनुभवलेले कणकण!

कधी मधी आठवणींचे,
पदर उलगडतात!
हातात फेर धरून,
आनंदाने बागडतात!

कधी रडवतात, हसवतात,
धीर ,गंभीर बनवतात !
तर कधी आयुष्याला उमेद देऊन,
आयुष्य सोपे करून जातात!

कधी कधी एखादाअनुभवही,
आठवण होऊन जातो!
आयुष्यभर काळजाला,
घट्ट चिटकून जातो!

आठवण अन् भावना,
या दोघी सख्या बहिणी!
दोघी  रचत असतात,
नेहमी कहाणी नवनवी!

दोघींना एकमेकींशिवाय,
कधी करमत नाही!
मन तरंगात व्यक्त होण्याची,
संधी कधी सोडत नाहीत!

कधी आठवणींच्या - --
संगतीनं भावना मुक्त होतात!
तरआठवणींच्या तालावर,
चाळ बांधून  नाचतात!

अनुभव त्यांचा सख्खा भाऊ!
समज अन् अनुभवाची गोड जोडी!
आठवण हट्टी ,बाळबोध,
तर भावना वेडी!

आठवणींची गाठ,
इतकी मजबूत असते!
की सुटता सुटत नाही,
ती थेट काळजाला बांधून जाते!

मनाच्या दालनात,
राहतात सर्वजण एकत्र!
फिरत असतात,
प्रतिक्षणीआयुष्यात सर्वत्र!

अस असतं राज्य भावनांचं!!
जग आठवणींचं!!
अनुभवाने भारलेलं,
जीवन तुमचं आमचं!!

सौ चारुशीला लक्ष्मीकांत धुमाळ