Image

भ्रष्टाचार

प्रत्येकाला आज भुलवितो आहे
पैसे मिळविण्याचा मार्ग झटपट
नाना शकला लावून माणसांची
पैसे मिळवण्यासाठी  खटपट

पद प्रतिष्ठांचा करुन गैरवापर
पैशासाठी करी चुकीचे ही काम
गरज ओळखून समोरच्याची
बिनधास्त मागतो आगाव दाम

नियमबाह्य गोष्टी करताना
विवेक ठेवला जातो गहाण
वशिला आणि पैश्याने होतो
सामान्य माणूस क्षणात महान

होतो असा भ्रष्टाचार जेंव्हा
खिन्न बनते आपलेच मन
बोकाळते ही वृत्ती तेंव्हा
पेटून उठतात सारेचजण

होतोय ना त्रास या वृत्तीचा
चला मग देवू आपणच लढा
जेथे जेथे असेल भ्रष्टाचारी
मिळून त्याला शिकवू धडा!!!

स्मिता मुराळी, सोलापूर