Image

जन 'मत'
तुम्हाला स्वतःच मत आहे का ? थोडासा विचार करायला लावणारा  हा प्रश्न आहे.

जेव्हा आपण सज्ञान होतो. तेव्हाहि आपलं मत स्वतःच नसत. माहितीच्या आधारे आपण ते बनवलेलं असत. आपल्याला  मतदान ओळखपत्र मिळाला याचा अर्थ आपण विचारपूर्वक विचार करायला लागलो असा होत नाही. आपण तसं समजतो. काही अंशी  आपले हात आकाशाला टेकलेले असतात. नुकतीच मिसरूड फुटायला लागलेली असते. मुलामुलींना मधील होणारे वयानुसार होणारे  बदल हे शारीरिक स्तरावर असले तरी ते मानसिक स्तरावर किती प्रघल्भ स्वरूपात असतात याचा अन्दाज लावणे कठीण असले तरी प्रमाण मात्र  निश्चितपणे  अत्यल्प असते.

प्रत्येक काळातील तरुणमंडळी हि राजकीय नेतेमंडळींनी ताकद असते. जनतेपर्यन्त पोहचण्याचा काम हि मंडळी करत असतात. ठराविक पक्षासाठी दिवसरात्र राबायचं, मजा आणि पैसा यांच्या नादापायी
स्वतःचा वेळ खर्च करायचा, बुद्धी गहाण ठेवायची.  यांना स्वतःच बुद्धिच्याकसोटीवर आणि सामाजिक अपेक्षित बदलांवर तपासलेला 'मताधिकार' आहे ?  कारण प्रत्येक पक्षाची आश्वांसनांची सूची हि भुरळ पाडीत असते.  विरोधी आणि सत्तारूढ तसेच अपक्ष (अपेक्षा असलेले) यांच्यातले वाद आणि परस्पर चिखलफेक यात जनतेला काही स्वारस्य नसते.पण आपले मत ठरवताना त्यामुळे गोंधळ होतो. परिणामी आपण ठरवतो एक आणि करतो एक.

शे-पाचशे मध्ये मत विकत घेणारेपण कमी नाहीत. त्यांना या एकमेव अबाधित अधिकाराचा असा दुरुपयोग करताना आपण आपल्या सामाजिक अध:पतनास कारणीभूत ठरत आहोत , याचे भान देखील नसते. जिथे पैसा तिथे प्रचार असा विचार ठेवणारे ' आपलं मत ' काय ठरवणार.

वर्षानुवर्षे निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे ठराविक पक्षाला मतदान करणारे चाळिशीपार , जेष्ठ नागरिक मंडळीही मुबलक प्रमाणात आहेत. काळानुसार पक्षीय बदल घडतात. दलबदलू नेतेमंडळी हि राजकीय स्वार्थापोटी जनतेकडे साफ दुर्लक्ष्य करतात. पण क्षणोअलेखित  जनता मात्र परंपरागत पक्षाला मतदान करतात. मग तो नेता कसाही असो. काम करो न करो, तेचतेच रस्ते खोदून जनतेला त्रास देवो काँट्रॅक्टदारांची पोट भरो. आणि वरतून केलेला कामच ...निधीतून असा जाणीवपूर्वक उल्लेख करो. आम्हाला काही फरक पडत नाही.  यांचं 'मत' भवितव्य ठरवेल. हा प्रकार  विचित्र आहे.

मग मत कोणाला करायचं ? प्रश्न बिकट आहे. मतपेट्या चोरीला जाण्याचा आणि  दोषीत यंत्रणेच्या जमान्यात , जो आपल्या विभागात चांगलं (थोडेबहुत तरी ) काम करत असेल , त्यालाच मत द्यायचं. मतदान करायचं. सुट्टीवर जायचं नाही. कारण आपलं एक मत निश्चितपणे बदल  घडवून आणत.
मत असं हवं जे सर्वांगतेने आणि बुद्धीच्या आणि सामाजिक भान ठेवून दिलेले असावं.