Image

*कनक पारस*

कनक पारस
आगळी रे जोडी
परीस स्पर्शाने
सुवर्णाची गोडी....

मानव सदैव
सुवर्ण भुकेला
पण अर्थ आहे
याच पारसाला.....

सुवर्ण होते रे
कधी तरी चोरी
ठरे पारसाची
पाटी नवी कोरी.....


घेताच  रे जरा
सुवर्णाचे नाव
मानवा सुटते
त्याची फार हाव....

कनकाची रास
परीसाचा स्पर्श
सुवर्णाचा ढीग
मानवास हर्ष......

वसुधा नाईक,पुणे