Image

खुप दिवसानंतर गावी जाण्याचा योग आला,घरी जरा आराम करून शेतावर गेलो.

 मळ्यातुन फेरफटका मारताना मन भुतकाळात गेलं.काय दिवसं होते,सुट्टयांमधे चिंचा-बोरं गोळा करत फिरायचो,,ह्या बांधावरल्या आंब्याखाली न्याहारी.,,पाटाचं पाणी पिऊन गुरांमाग फिरायचं ,खरचं त्या दिवसांची मजा आता नाही.

    “ओ आप्पा बाजुला व्हा ,बाजुला....राणी बिथरलीया,,,” ह्या आवाजानं मी  भानावर आलो,हनम्या मोठ्याने हातवारे करत मला बाजुला व्हायला सांगत होता,कारण आमची राणी नावाची म्हैस शिंग रोखुन माझ्याचं दिशेने येत होती.

 राणी ला अडवायला म्हणुन मी हातातली काठी उगारली,तिला मारणार इतक्यात कपाळमोक्ष,,,,

“आई गं आई आई गं”” 

“काय झालं ,काय पडलं आणि तुम्ही का सकाळी सकाळी विव्हळतायं??”सौ किचनं मधुन कडाडल्या

“अगं मीच पडलोय”

तशी सौ धावतचं खोलीत आली,पलंगावर बसवुन पाणी दिलं.

“कसे काय हो पडलात?पलंगावरून झोपेत कोसळायला काय लहान आहात का??फरशी फुटली नाही नशीबचं”

आमच्या सौं ची विनोदबुद्धी कोणत्याच प्रसंगात कमी कशी होत नाही हा प्रश्न मला पडला ,पण मनातला तो विचार मी लगेच बाजुला सारून म्हटलो,

“अगं रानात फिरतं होतो,आपली राणी ,,,म्हणजे राणी म्हैस अंगावर आली तिला मारायला म्हणुन पुढे झालो अन् ”

“कपाळमोक्ष झाला.”म्हणत बायको खो खो हसायला लागली.

मात्र माझी अवस्था पाहुन “गरम पाण्याची पिशवी आणते त्याने अंग शेका.”म्हणत सौ किचन कडे रवाना झाल्या.

ति जाताच मनात विचार आला,

तरी बरं स्वप्नात म्हैसचं आली होती,बायको असती तर ???

नुसत्या विचारानेच अंगावर शहारा आला!!!