Image

उठबशी,..

इयत्ता पहिलीच्या वर्गातील
माझा लाडका विद्यार्थी स्वप्नील
मस्ती  अंगी खूप,बोलणे आगावू
न ऐकणारा अन अतिशय खोडील..

असतो सदा हसतमुख,खूश
खुशालचेंडू तो जसा
मस्तमौला माझ्या वर्गातील
आनंदी राहयचा तसा....

त्याचे काही चुकले तर
शिक्षा मी नाही  करायची
त्याने आपणहून शिक्षा
स्वतःला स्वतःच घ्यायची...

खूप  खूप बोलतो म्हणून
शिक्षा द्यायची नाही
त्याला बोलायचे नाही
मनात यायचे  तसे करायचा सर्वकाही...

मग काय हा बहाद्दर
स्वतःच वर्गाबाहेर जाणार
आणि शिक्षा करून घेणार
स्वतःला उठबशीतून मार देणार....

वसुधा नाईक,पुणे