Image

*बालगीत*
____________________

चला चला नाचू चला
आनंदाने  गाऊ
आनंदाने गाऊ चला
ठुमके देवून नाचू....,

नाच  करायला
अंगण मोठे नको
गाणे गायला हो
माईक  पण नको....

नाच छान करूया
अापण  तालात
गाणे पण गाऊया
अापण सुरात....

नाच करताना
व्यायाम होईल
गाणे  गाताना
भानही हरपेल...

नाचत नाचत
गाणे गाऊया
सर्वांसमोर गाणे
सादर करूया....

*वसुधा  नाईक*