Image

काल माझी चड्डी मैञीण अन् मी गेलो होतो पिक्चर  बघायला...बघायचा होता तो सोनु के टिटू की टट्टी की काय  ते सोनु के टिटू की स्विट्टी, पण काही तांञीक अडचणी मुळे आम्ही "गुलाबजाम " पहात होतो .
पहील्या काही मिनीटातच त्या भल्यामोठ्या स्क्रीनवर  पाकात मस्त भिजलेले लुसलुशीत ५ गुलाबजाम  होते.  आम्ही दोघीनी एकमेकींकडं पाहील.. एखाद्या  पिळदार बांध्याच्या, हॉट हिरोकडं पहात रहाव तश्या अधाश्या सारखं पहात होतो आम्ही गुलाबजामकडे.
आणि तेवढ्यात स्वप्नील एक अख्खा गुलाबजाम  उचलुन तोंडात  टाकतो.. आई शप्पथ लाळ टपकायची फक्त  बाकी होती.
एकमेकींकडं पाहील न् न बोलताच ठरल होत,  आज गुलाबजाम खायचेचं.
इंटरव्हल झाला, theater canteen च्या   counter वर कॉफी घेताना न राहून मी विचारलचं,"दादा गुलाबजाम  मिळेल का?" त्या दादाने अन् सोबत  बाकी लोकांनी अस्स पाहील माझ्याकडे... मग् तो बोलला desert  मध्ये डोनट आहे, देऊ?..छ्या गुलाबजाम अन् डोनट?....
पिक्चरमध्ये पुढ येणारे गुलाबजाम चे टेम्पटींग सिन्स अक्षरक्ष: डोळे झाकत झाकत पाहीले.
बाहेर आलो, हलवाईचं दुकान शोधल (पुण्यात हलवाईचं  दुकान  लग्गेच सापडत).. "काका गुलाबजाम भेटतील का आर्धा किलो?"  काकानी माझ्याकडे एक तुच्छतेने भरलेला कटाक्ष टाकला.. काय झाल आता?हलवायाच्या दुकानात गुलाबजाम चं मागितले होते मी.
तो मऊ रसरशीत गुलाबजाम कधी चाखतेय अस झालेलं.
तेव्हढ्यात काका बोलले  "अहो माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात " आईचाघो...मी पण म्हटलच मग् "उद्यापासून पाटी लावा बाहेर, मिठाई खाण्यासाठी शुद्ध मराठी येणे आवश्यक आहे "..गुलाबजाम अन् माझ्या जीभेतली अंतर आता अंत पहात होती आणि मी पुणेकर  काकांना  उलट उत्तर देऊन माती खाल्ली होती. खबरी( माझी चड्डी मैञिण)  जाम वैतागली होती माझ्यावर.
आता जर् काका गुलाबजाम द्यायला नाही म्हंटले तर...
पण काकांनी काट्यावर बॉक्स ठेऊन त्यात गुलाबजाम टाकायला सुरुवात केल्ती. रागातच त्यांनी बॉक्स हातात दिला. आई शप्पथ सांगते जन्मो जन्मी चा प्रियकर खुप मोठ्या दुराव्या नंतर  भेटल्यासारखा वाटला तो बॉक्स.
काकांकड पाठ केली अन् दोघींनी एक एक गुलाबजाम  तोंडात टाकला. डोळे मिटले..तो जीभेवर विरघळत होता आणि आम्ही त्याच्यात..आहाहा स्वर्गसुख..
पाकात भललेली बोट अन् ओठ चाटून घेतले,  गुलाबजाम चा बॉक्स बॅगेत टाकुन निघालो घरी, घाईने...
एका वेळी एक गुलाबजाम खाऊन समाधान  झालयं का कधी कुणाचं?....