Image

*जिजाबाई...*

शिवरायांची माता
कुलवंत जिजाई
लेक लखूजी जाधवांची
नाव तिचे जिजाबाई....,

सून भोसले घराण्याची
शिवभक्त मालोजीराजांची
भार्या होती जिजाबाई
शूरवीर शहाजीराजांची....

जिजाईने शिवबांच्या मनी
स्वराज्याचे रोप लावले
खतपाणी घालून मूल्यांचे
रोपास त्या वाढवले....

सुसंस्काच्या कथा
जिजामातेने सांगितल्या
मावळ्यांच्या साथीने शिवबांनी
कथा सत्यात हो उतरवल्या....

साधूसंताची चरित्रे कथन केली
पराक्रम ऐकवले शूरवीरांचे
शिवबाने घोडदौड सुरू केली
स्वप्न  सत्यात आणले स्वराज्याचे....

*वसुधा नाईक,पुणे*