Image

*म्हणी....*

आज वर्गात  चौथीचा पाठ सतरावा  घेत होते.म्हणी आधी  मुलांकडूनच काढून घेतल्या.अर्थ विचारले .ज्याचाअर्थ आलानाही .तो मी समजावून सांगितला.
"काखेत  कळसा गावाला वळसा"
ही म्हण चालू होती.माझ्या वर्गातल्या राज खामकर या मुलाने मधल्या सुट्टीतला प्रसंग  या म्हणीला मिळता असल्याने     लगेच  त्याने सांगितला,
आर्यन नावाच्या मुलाची माकडटोपी कृष्णाने  काढली.ती त्याच्या पायाशीच पडली.पण ते त्याला माहित नव्हते.तो टोपी शोधत असताना...तिसरीच्या मुलाने विचारले "काय शोधतोस?" आर्यन म्हणाला "अरे,माझी टोपी फेकली कृष्णाने ती शोधतो".
तो मुलगा म्हणाला "अरे,ही बघ की तुझ्या पायाजवळ".
आर्यन   हसला टोपी उचलली. हा प्रसंग सांगून  राजम्हटला "काखेत कळसा अन गावाला वळसा" असे आर्यनचे झाले.
मला खूपआनंद झाला.की म्हण व्यवहारात कशी येते .हे माझ्या मुलांना छान  समजले.
अर्थ पण छान समजला.
*वसुधा नाईक,पुणे*