Image

*तथाकथित बुद्धिवाद्यांची कार्यपद्धती-1* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com
09 एप्रिल 2019

या लेखमालिकेतील *#तथाकथित_बुध्दीवाद* या लेखाचा समारोप करतेवेळी म्हटल्याप्रमाणे आपण आता या लेखात, यवतमाळ येथे झालेल्या *#92_व्या_अखिल_भारतीय_ मराठी_साहित्य_संमेलनात* वाचल्या न गेलेल्या *#नयनतारा_सहगल* यांच्या भाषणाच्या अनुषंगाने *#तथाकथित_बुद्धिवाद्यांचे_कार्य* नेमक्या कुठल्या पद्धतीने चालते हे पहाणार आहोत.

- - - - - - - - - - -

या भाषणाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास आपल्याला त्याचे तीन भाग पाडता येतील.

1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेचा गुणगौरव व या संमेलनाशी स्वतःची जुळवून घेतलेली नाळ

2. भारतातील वर्तमानावर केलेले भाष्य

आणि

3. भारतातील वर्तमान परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिकांना केलेले आवाहन

- - - - - - - - - - -

आता, एक एक करून प्रत्येक भागावर चर्चा करुया..

1. *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेचा गुणगौरव व या संमेलनाशी स्वतःची जुळवून घेतलेली नाळ*

अर्थातच, साहित्य संमेलनाचा केलेला गौरव आणि त्याच्याशी दर्शविलेला आपला संबंध.. इथपर्यंत *#नयनतारा_सहगल* यांचे भाषण अगदी योग्य मार्गाने चालते.. पुढे?
पुढे या भाषणाने संपूर्ण राजकीय भूमिका घेतलेली असून त्याचा साहित्याशी असलेला संबंध दूरवर निघून गेला आहे.

त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की, *साहित्यिकांनी राजकीय भूमिका घ्याव्यात की घेऊ नयेत?* आणि *"व्यक्तिस्वातंत्र्य"* या आजच्या काळाच्या महत्वाच्या जिवनमूल्याचा विचार करता, प्रत्येकाला *हवी ती भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे* यात कुठलेही दुमत असू शकत नाही.

मग अडचण नेमकी काय आहे?

मला वाटते, *राजकीय भूमिका नेमकी कुठे? म्हणजेच नेमकी कुठल्या मंचावरून घेतली जात आहे?* याबद्दल सर्वात मोठी अडचण आहे. आणि ही अडचण आपण व्यवस्थित समजून न घेतल्यास, त्याचे भयंकर दुष्परिणाम भविष्यकाळात साहित्यच नाही तर विविध क्षेत्रांवर उमटू शकतात.

याचे अगदी ताजे उदाहरण,
मुंबई येथे भरलेल्या एका चित्र प्रदर्शनाचे आणि तेथे, अभिनेते अमोल पालेकर देत असलेले भाषण मध्येच थांबविण्यात आलेल्या प्रकाराचे म्हणता येईल.

अमोल पालेकर यांचे भाषण थांबवल्यामुळे काही साहित्यिकांनी, कलाकारांनी नंतर प्रचंड ओरड केली.
त्यानंतर या आरडाओरड्याचा आधार घेऊन तथाकथित बुद्धिवादी ज्या वृत्तपत्रांच्या खुर्च्यांवर संपादक म्हणून ठाण मांडून बसलेले आहेत, त्या वृत्तपत्रांनी *अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा* उचलून धरत देश रसातळाला निघाल्याची द्वाही फिरवली. आणि या सगळ्यात मुख्य मुद्द्याला बगल दिली गेली.

तो मुद्दा म्हणजे,
*चित्रकलेवर आधारित प्रदर्शनात देत असलेल्या भाषणामधून मिस्टर अमोल पालेकर चित्रकलेचे; चित्रकाराच्या गुणवत्तेचे, चित्रकलेप्रती चित्रकाराच्या समर्पित भावनेचे.. नेमके कुठले पैलू समाजासमोर आणत होते?*

आणि अगदी असेच नयनतारा सहगल यांच्या न झालेल्या भाषणाचेही आहे..

आपण हे समजून घ्यायला हवे की,
*कलाकारांना, साहित्यिकांना उपलब्ध होणारे मंच हे त्या त्या विषयांशी संबंधित विचार मांडण्यासाठी असायला हवेत.*

उद्या जर मी,
एखाद्या गझल मंचाच्या व्यासपीठावर माझी वैयक्तिक राजकीय विचारधारा मांडू लागलो तर?
एखाद्या बालसाहित्याच्या व्यासपीठावर विशिष्ट राजकीय विचारांची पेरणी करू लागलो तर?
एखाद्या काव्य मैफलीत राजकीय भाषण देऊ लागलो तर?

तर.. ते जसे अनुचित ठरेल, तसेच या थोरामोठ्या व्यक्तींनी सुध्दा आपले राजकीय विचार मांडण्यासाठी मिळतील ते मंच कुठलाही विधिनिषेध न बाळगता वापरणे चुकीचे आहे...

आणि ते वापरले जात असतील तर त्याला विरोध होणारच. अगदी शक्य त्या स्वरूपात, शक्य तेवढ्या प्रकारे, शक्य तितक्या ताकदीने, शक्य तितक्या संघटित स्वरूपात.. विरोध होणारच.

असो..

ख्यातनाम कलाकार, साहित्यिकांद्वारे मिळतील ते मंच कुठलेही तारतम्य न बाळगता कशा प्रकारे वापरणे सुरू आहे.. या गोष्टीची जाणीव मला सर्वप्रथम तेव्हा झाली, जेव्हा मी एक साहित्यिक म्हणून साहित्य क्षेत्रात अगदी नवखा होतो.

कुठल्यातरी "विवेकवादी लेखक संघाचे" कि तत्सम नावाच्या लेखक संघाचे ते अधिवेशन होते. अर्थात मला फारसे कुणी ओळखत नसल्याने मी त्या अधिवेशनाला माझ्या एका लंगोटीयार मित्रासह फक्त श्रोता म्हणून हजर होतो. शहरातल्या अनेकविध कॉलेजचे तरुण-तरुणीही माझ्यासोबतच त्या रटाळवाण्या कार्यक्रमात हास्याचे फवारे उडवत सहभागी झालेले होते.

कार्यक्रमातल्या परिसंवादाची सुरुवात महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध नाटककाराच्या भाषणाने झाली. अधिवेशन विवेकवादी लेखक संघाचे असल्याने मला व्यक्तिशः नाटककाराकडून "कुठल्याही विषयावर लिहित असताना लेखकाने आपला विवेक जागृत कसा ठेवावा" या विषयावर मार्गदर्शन अपेक्षित होते. कारण समोर कॉलेजची होतकरू मंडळी बसलेली होती. उद्या त्यांच्यापैकी अनेक जण लेखक / कवी होणार असतील..
परंतु भाषणाची सुरुवात झाली, तीच मुळात तत्कालीन केंद्र शासनाला शिव्या घालण्यापासून.
अरे.. व्यासपीठ कुठले अन् तुम्ही काय बोलताय? का बोलताय? समोर बसलेल्या तरुण पिढीचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही "विवेकावर आधारित संतुलित लिखाण कसे करायचे असते" यावर भाष्य अपेक्षित आहे.. एवढे तरी तुम्हाला समजते की नाही?

कार्यक्रम संपवून घरी आल्यावर मी, या नाटककाराचे असे का झाले असेल बुवा? यावर बराच विचार केला..

तेव्हा माझ्या लक्षात आले की,
*पुराणकथांतील महापुरूषांची निवड करून त्यांच्या तोंडी अशोभनीय अशी, परंतु लोकांना हसायला लावणारी भाषा वापरून उभी केलेली पात्रं आणि या पात्रांच्या आधारावर उभे केलेले नाटक एवढीच या नाटककाराची वैचारिक पार्श्वभूमी आहे.* त्यामुळे त्याच्याकडून विवेकाची अपेक्षा धरणे हाच मुळी *अंधश्रद्धेचा भाग* झाला.

हरकत नाही...

भारतीय समाज आता जागृत झालेला आहे.
त्यामुळे,

*वाटेल त्यावेळी.. वाटेल तिथे.. वाटेल तेवढे.. वाटेल तसे.. लिहून आणि बोलून झाल्यावर स्वतःलाच चिमटा काढून,*
....
*"बोल की लब आजाद है तेरे.."*
‌‌....
*असं म्हणायची आठवण करून देणाऱ्या #तथाकथित_बुद्धिवाद्यांनी पसरवलेल्या सर्व बुध्दीभ्रमांचा आणि अंधश्रद्धांचा पगडा आपोआपच दूर होऊ लागल्याने पुढील काळ हा भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा असणार आहे.*

- - - - - - - - - - -

जाता जाता,

नयनतारा सहगल यांच्या भाषणाचे आपण जे तीन भाग केले आहेत त्यातील पहिल्या भागाच्या अनुषंगाने आपण साहित्यिक, कलाकारांकडून *राजकीय भूमिका नेमकी कुठल्या मंचावरून घेतली जात आहे व अशा पद्धतीने कुठलेही व्यासपीठ विषयाशी विसंगत विचारांच्या प्रसारासाठी वापरणे कसे गैर आहे* हे पाहिले.

पुढील लेखात आपण नयनतारा सहगल यांच्या उर्वरित भाषणावर चर्चा करणारच आहोत.

तोपर्यंत,
तथाकथित बुद्धिवाद्यांद्वारे इतरांचा बुद्धिभ्रम करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, तिचे आणखी एक उदाहरण पाहूया व त्यावर चिंतन करूया.

#नयनतारा_सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषणाचे निमंत्रण रद्द केल्याच्या निमित्ताने उठलेल्या गदारोळाचा लाभ उठवून, भारतातील #तथाकथित_बुद्धिवादी जमातीने अन्याय झालेल्यांची बाजू घेण्याचा अविर्भाव दाखवून, साहित्यिक व साहित्य प्रेमींमधे फूट पाडण्याची मोठी खेळी केली होती.

पण आपण लक्षात घ्यायला हवे की,
ही #तथाकथित_बुद्धिवादी जमात एकीकडे आपापल्या वृत्तपत्रांच्या मोठमोठ्या लेखांमधून, आणि वृत्तवाहिन्यांमधे 'वाद-संवाद' (खरे तर वितंडवाद) घडवून आणत आपण डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा कैवार घेत असल्याचा आव आणते, तर दुसरीकडे डॉक्टरांनी ज्या 'ज्योतिष' या विषयाला थोतांड मानले त्या ज्योतिषांचे दैनिक व साप्ताहिक राशिभविष्य मात्र नित्यनेमाने न चुकता छापून आपापले गल्ले भरायचे काम करत असते.

*ज्यांना कुठलाही ठोस विचार मांडायचा असतो, त्यांनी आपापल्या मान्यतांना बगल देत सोयीस्कर बाजू घेऊन चालत नाही. कारण, असे करणे म्हणजे स्वत:च स्वतःच्या विचारधारेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय.*

बाकी,
अधिक काय सांगू ..

*तथाकथित बुद्धिवादी नहीं हूं,*
*सीधी सीधी बात करूंगा ।*
*उलझाते रहे जो भारत को,*
*मैं उनका पर्दाफाश करूंगा ।*

नमस्कार 🙏

☘ 🍁 ☘ 🍁 ☘