Image

_____________________
*अक्षरधन*
______________________
कविता माझी अक्षरधनाची
भावनांनी सुरेख गुंफलेली
शब्द शब्दाने अाणली मजा
अक्षरधनाने कविता रंगलेली


रेखाटलेय त्यात माझे मन
माझे जीवन गुपीत सार
सुंदर विचारांनी सजवला मी
अक्षरधनांचा मस्त हो हार...


माझे जीवन हो रंगमहाल
चारोळी अन कवितांचा
लपवले अक्षरधन रंगमहालात
पूर आला अर्थपूर्ण भावनांचा...


माझी जीवनगाथा मांडली
खजिना कवितांचा साठवला
सिनेमा जीवनाचा अहो मी
शब्दमहालात की हो सजवला....

वही माझी अक्षरधनाची छान
फारच हो जपून ठेवलीय
चाहूल लागता तुमची की हो
मी वही समोर आणलीय....

काय येणार हो आपल्या बरोबर
माझै अक्षरधन सर्वांच्या मनात राहतील
मी जगात नसताना पण हो
लोकं माझी आठवण तरी काढतील....*वसुधा नाईक,पुणे*