Image

*माझी वही....*

कविता माझी
मी  कवितांची
माझी वही छान
मस्त आहे सान....

रेखाटलेय त्यात
माझे जीवन गुपीत
सुरेख विचारांचे सार
माझ्या वहीच्या कुपीत....

माझे जीवन हो
लपलेत वहीत
अर्थपूर्ण भावना
माझ्या आहेत सहीत,..

माझी सान वही
खजिना कवितांचा
उलगडून ठेवलाय मी
सिनेमा जीवनाचा....

वही माझी नीट उघडा
फारच हो जपून
चाहूल लागता तुमची
शब्द बसतील लपून....

*वसुधा नाईक,पुणे*