Image

*कधीतरी असं घडावं...*


कधीतरी असं घडावं
पावसान माझ्याशी बोलावं
थेंबात मी नाचावं
अलगद स्वैर बागडावं
मनसोक्त खेळावं.......


कधीतरी असं  घडावं
बालपण परत यावं
बालपणात जावून
त्या आठवणीत रमावं
स्वच्छंदी जीवन जगावं

कधीतरी असं घडावं
पंख द्यावेत देवान
मनमुराद फिरून घ्यावं
उंच भरारी घेत
वसुंधरेच निरीक्षण करावं....

कधीतरी असं घडावं
गाडीवर बसावं
मित्रांसवे फिरायला जावं
आनंदाच्या सरीत नहावं
मनसोक्त गप्पात रंगावं.....,

कधीतरी असं घडावं
वसुंधरा होवून
हिरवीशाल पांघरावी
तिच्या पोटात काय ,काय दडलयं
ते निरखून पाहावं....


कधीतरी असं घडावं
लहान बाळ व्हावं
आईला घट्ट बिलगावं
कशाचीही चिंता न करता
बालपण पुन्हा अनुभवावं...,

*वसुधा नाईक,पुणे*