Image

#स्वतःच्याआयुष्याचाअनोखाइव्हेंट#पार्ट १

बघायला गेलं तर स्नेहल ने घेतलं होत इंजिनीअरिंग च शिक्षण पण तिचा इंटरेस्ट इव्हेंट मॅनॅजमेन्ट मध्ये होता त्यामुळे एका प्रख्यात कंपनी मधला जॉब सोडून तिने स्वतःचा business चालू केला होता . खूप जास्त बडबडी ,अतिशय हसरी , कोणामध्ये पण पटकन  मिक्स होणारी अशी ही स्नेहल . दिवसेंदिवस तिचा business मस्त वाढत होता .खूप ठिकाणी तिचे छान  tie -ups  झाले होते . तिने एकदा विचार केला की आपण हिंजवडी च्या हॉटेल्स ला तर कधी भेट च नाही दिली .बघूया ना तिथे काही  टाय-अप्स  होतात का इव्हेंट्स साठी . म्हणून निघाली आपली गाडी घेऊन . म्हणतात ना आवडीचं काम करत असाल की कामात पण एक वेगळाच उत्साह असतो. तिने थेट हॉटेल गाठलं . 

स्नेहल : आप के हॉटेल के  मॅनेजर के साथ बात हो सकती हैं ?

गौरव : हा बताईये कैसें आना हुआ ? मैं यहा का मॅनेजर हू . 

स्नेहल : मेरी खुद की इव्हेंट की कंपनी हैं तो मैने सोचा की एक बार आपसे बात करके  देख लू . i can handle the events of your hotel if you give me a chance . 

गौरव : ठीक हैं मॅडम . I will contact you .आपका नंबर या फिर व्हिसीटींग कार्ड देना . 

स्नेहल ने पटकन पर्स मधून कार्ड काढून दिल . पण तिच्या मनात फार प्रश्न होते . की याने आपल्याला कटवलं  का फक्त हो हो म्हणून . हा करेल का आपल्याला संपर्क . असे नको नको ते विचार करत बिचारी निघाली हॉटेल मधून . आता परत परत तरी कस विचारणार ना . म्हणजे कस आजच्या काळात जास्त पण आपली गरज दाखवली तरी प्रॉब्लेम होतो. 

डिक्की मधून स्कार्फ काढत आपल्या चेहऱ्याला तिने तो गुंडाळला आणि तिथून निघाली . तिच स्वतःच छोटस ऑफिस होत . ऑफिस मध्ये ती आली शांतपणे बसली. डोक्यात विचार चालू होता शेवटी त्या मॅनेजर चे डिटेल्स स्वतःच्या लिस्ट मध्ये टाकून तिने तो विषय सोडला आणि आहे त्या कामावर फोकस करू लागली . 

बाकी कोणा ला भेटायचं आहे हा विचार डोक्यात चालू होता . business म्हटलं की स्वतःला फार ड्राईव्ह करावं लागत . हे करत असताना तिच्या डोक्यात कधी तरी तिने सोडलेल्या जॉब चा विचार यायचा . कारण जॉब म्हटलं की कस secured इनकम आणि business मध्ये ती लेवल यायला फार वेळ लागतो ..पण पुन्हा स्वतःला मस्त विचार देऊन ती  जोमाने कामाला लागायची . या सगळ्यात ती गर्क झाली होती. 

तेवढ्यात तिचा फोन वाजला . एका क्लायंट चा कॉल होता . सो कॉल नंतर ती venue वर कलाईन्ट ला भेटायला गेली. नेहमीप्रमाणे मीटिंग छान  पार पडली . तिला इव्हेंट मिळाला . पण तिच्या मनात मात्र एक मोठी झेप घ्यायचा विचार होता . वाट बघत होती ते एका सुवर्णसंधीची . तेवढ्यात तिच्या आईचा कॉल आला. 

आई : उद्या शुक्रवार आहे ग . तुझ वैभव लक्ष्मीच व्रत आहे . 

स्नेहल : हो आई आहे लक्षात .काही आणायचं आहे  का ?

आई : संध्याकाळी येताना गुलाबाचं फुल घेऊन ये बाकी सगळं आहे घरामध्ये . 

स्नेहल ने हो म्हणून फोन ठेवला . 

डोक्यात विचारांचा गुंता अजून पण चालूच होता . 

क्रमश :........ 

तळटीप : मी लिहीत असलेली कथा सत्य घटनेवर आधारीत आहे .आपल्या प्रतिक्रिया हाच माझा उत्साह अजून वाढवेल. पुढच्या पार्ट मध्ये एक वेगळीच ट्विस्ट येणार आहे . Stay Connected ! Stay Tuned :*