Image

*प्रपोज*

भेटलो आम्ही बागेत
नजरानजर  झाली
दोघांनाही एकमेकांची
खूप ओढ लागली.....

मनात  आले माझ्या
भेटेल  का तो पुन्हा मला
दुसर्‍या दिवशी परत
गेले पाहायला मी त्याला....

अनाहूत   भेट परत  झाली
पाहून आम्ही सुखावलो
नजरेनच संवाद  साधला
दोघेही  खूप आनंदलो...

मनात  विचार आला
मिळेल का तो मला
त्याचीही अवस्था तिच होती
तोही त्याच विचारात दंगला.....

भेटू लागलो दोघेही रोज
आला प्रीतीला बहर
झोंबू लागले प्रीतवारे
सर्वांनी रोखली आमच्यावर नजर...

भीती  होती मनात तेच झाले
आमच्या घरात हो समजले
घरच्यांनी नाहि विरोध केला
आम्हा दोघांनाही समजून घेतले....


मग  कााय त्याने  मला
सर्वांसमोर मला *प्रपोज* केले
छान सुंदर लाल गुलाब दिले
मी लाजून लाजून लाल झाले...,

दोन्ही घरचा होकार आला
दोघांच्याही मनाचा  मोर
आनंदाने नाचू लागला
लग्नाचा सोहळा आमचा सुरु झाला....

*वसुधा नाईक,पुणे*