Image

*स्वप्नसुंदरी*


माझी सखी तू
माझी मैत्रीण तू
स्वप्नसुंदरी तू
माझी पट्टराणी तू....,


मी online असलो
तरी शांत सखी माझी
एवढ्या वर्षातील
आहे  सवय ही तूझी.....

माझ्यावर प्रेमवर्षाव
नेहमीच करतेस
फिरायला  जाण्यासाठी
सदोदीत  छळतेस.....

किती वर्ष झाली
आपल्या संसाराला
नको ग छळूस
आता ग मला....

स्वप्नसुंदरी म्हणून
डोक्यावर काय घेतले
आता   तर मग  काय
तू डोक्यावर मीरे वाटले.....

काही म्हणा बाबा
माझी स्वप्नसुंदरी
माझी प्रीतवेडी
माझी सुंदरपरी  .....

*वसुधा नाईक,पुणे*