Image

*तिळगूळ*


तिळगूळ  घेतले  खरपूस भाजून
खलबत्यातघेतले बारीक कुटून
गुळाला दिला मस्त चटका
तिळगुळाचे मिश्रण घेतले सारखे करून...

मस्त रसरशीत चटका बसला गुळाला
खमंग सुवास आला मिश्रणाला
गुळपोळी केली त्याची
नैवैद्य अर्पण केला देवाला.....

तिळगुळाचा बनवला लाडू
सजणाने सजणीला लाडू भरवला
पती पत्नीच्या नात्यातील
आपलेपणा सजणाने वाढवला...

घरातील वरिष्ठांना नमस्कार केला
परंपरेचा ठोका नाही चुकवला
मकरसंक्रांतीच्या सणाचा गोडवा
आशिश सुमनांनी छान बहरला..,,

संसारातील,कुटुंबातील गोडी तिळगुळाने
आज परत द्विगुणीत केली
उत्तरायणातील या गुलाबी थंडीने
मनाची सुंदरता अजूनच खुलली...

*वसुधा नाईक,पुणे*