Image

*झेप*

*लीनाक्षरी काव्य*

झेप घेई गगनी तू रे पाखरा
बळ येऊ दे पंखात रे भरारा

घेई उंच  झेप तू गगनी कशी
नभ ठेंगणे तुला होय जशी

भरवतो पिलांच्या तू मुखी घास
पिलू राही घरटी खुशाल खास

नभ झाले पाखरा  तुला थिटे
भरारीचे स्वप्न  पिलांचे रे फिटे

भिरभिरतेय  पाखरू गगनी
पिलू खूश  आईबरोबर मनी

पिलू  पाहतेय घरट्यात वाट
आई  बाबा समवेत त्यांचा थाट...

वसुधा  नाईक,पुणे