Image

*तथाकथित बुद्धिवाद* (चौकट अंधश्रध्दा निर्मुलनाची)
----------------------------------------
by - *योगेश रंगनाथ निकम*
औरंगाबाद
Yogeshnikam1303@gmail.com
28 जानेवारी 2019

*#कंगणा_राणावत* ची *#मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी* बघितली? नक्की बघा. उत्कृष्ट कलाकृती आहे.

आणि मग,
आपापल्या घरी येऊन आरामात चहा पितांना,
आठवा... शाळेत शिकलेला 1857 चा उठाव.
आठवा... MPSC/UPSC ची तयारी करताना वाचलेल्या/ वाचत असलेल्या 1857 बद्दल विभिन्न इतिहासकारांनी केलेल्या व्याख्या.

काय होतं 1857?
कोसळून पडत असलेल्या राजे-महाराजांच्या जुन्या राज्यव्यवस्थेला वाचवण्याचा *शेवटचा प्रयत्न*?
कि, इंग्रज फौजेत सहभागी असलेल्या काळ्या कातडीच्या सैनिकांचा द्रोह म्हणजे *‘सैनिकी विद्रोह’*?
कि, ख्रिश्चनांच्या विरुद्ध एक *‘धर्मयुद्ध’*?
कि, विदेशी सरंजामशाही विरुद्ध *देशीय क्षोभ*?
किंवा मग, भारताचे महान सुपुत्र *#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर* यांनी सांगितल्याप्रमाणे *#भारताचे_पहिले_स्वातंत्र्यसमर* ?

काय होतं नेमकं 1857?
नक्की विचार करा.

कारण,
*आपण इतिहासाकडे कुठल्या दृष्टीने पहातो यावर, फक्त ‘आपलेच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य’ सुद्धा अवलंबून असते.*

कारण,
*फक्त काही महिन्यांनी आपण #लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहोत, आणि जसे मी माझ्या हिंदी भाषेतल्या लघु पुस्तिकेत #2019_एक_आखरी_दांव मध्ये लिहिले आहे, या निवडणुका भारताचे भविष्य बदलणार्‍या आहेत.*

कारण,
*ह्या निवडणुका #राष्ट्रवाद या प्रमुख मुद्द्यावर होणार आहेत.*

या संदर्भात आपल्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे कि,
*‘1857 बद्दल इतर इतिहासकारांनी केलेल्या व्याख्या आणि #स्वा._सावरकर यांचा या स्वातंत्र्यसमराबद्दल असलेला दृष्टीकोण’* म्हणजेच *‘#राष्ट्रवाद आणि तथाकथित बुद्धिवाद’* यामधला मूलभूत मतिभेद होय.

ऐतिहासिक संसाधने सर्वांनाच समान तर्‍हेने उपलब्ध असतात. परंतू, निरपेक्षतेच्या कितीही गप्पा मारल्या तरीही मानव जोपर्यंत निरंतर साक्षीभाव असलेल्या अवस्थेस प्राप्त करत नाही तोपर्यंत तो सापेक्षच राहील. त्यामुळे,
आपापल्या मान्यतांचेच चित्रण इतिहासकाराने लिहीलेल्या इतिहासात दृष्टिगोचर होत असते.

आपले दुर्भाग्य आहे कि,
इंग्रजी शिक्षण प्राप्त केल्यानंतर, पश्चिमी चश्म्यांतून भारताकडे पाहण्याची दृष्टी आपण कधीचीच विकसित केलेली आहे. आपण एक अशी व्यवस्था विकसित केलेली आहे कि ज्यात, राजकारणापासून पत्रकारितेपर्यंत, साहित्यापासून विद्यापीठांपर्यंत आपण सर्व त्या ‘तथाकथित बुद्धिवाद्यांनी’ घेरलेले आहोत, जे आपल्या 1857 संबधी दृष्टीकोणाला *#स्वा._सावरकरांच्या* दृष्टीकोणापासून दूर ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतात.

परिणामी,
भारतातील मागच्या सरकारच्यावेळी या व्यवस्थेत मोठे खेळाडू होऊन बसलेले *#मणिशंकर_अय्यर* यांनी अंदमानातून *#स्वा._सावरकर* यांची *‘वचने’* काढून टाकली होती. आणि, त्यांच्या या कृत्याबद्दल त्याच महाराष्ट्रातील साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात किंचितही विरोधाचा आवाज उठला नव्हता, जिथे आत्ताच *#अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलनाच्या* उद्घाटनासाठी *#नयनतारा_सहगल* यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यामुळे भूकंप आला होता.

अर्थात,
आपणच दिलेले निमंत्रण रद्द करणे म्हणजे निश्चितच आयोजकांच्या मनोवृत्तीचा क्षुद्रपणा होता. तसेच, या गोष्टीचा केला गेलेला धिक्कार व या साहित्य संमेलनाचा बहिष्कार सुद्धा आपापल्या जागी बरोबर होता.

परंतू,
ज्या प्रकारे *#दिव्य_मराठी* चे संपादक *#संजय_आवटे* यांनी या निमंत्रण रद्दीचा आधार घेत, या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण परंपरेलाच नाकारले, ते सुद्धा चुकीचे होते.

आणि,
*ही ‘नाकरण्याची वृत्ती’ म्हणजेच #तथाकथित_बुद्धिवाद आहे.*

खरे तर,
मनुष्य... जोपर्यंत स्वत:चे ‘बौद्धत्व’ प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चांगुलपणा सोबत वाईटपणा सुद्धा अस्तीत्वात असणारच, हे शाश्वत सत्य आहे.

या संदर्भात,
जम्बूद्वीप म्हणजे भारतीय उपमहाखंडातील रहिवाशांनी अर्थात आपल्या सर्वांनी, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की,
*‘तथाकथित बुद्धिवादात अंतर्भूत असलेल्या नाकरण्याच्या वृत्ती’ च्या विपरीत ‘स्वीकारणे’ हा आपला ‘मूळ स्वभाव’ आहे.*

हा स्वभाव आपल्या संस्कृती आणि धर्म-पंथांमध्ये *प्रकट* झालेला आहे. याच स्वभावाने आपली जीवनशैली *विकसित* केलेली आहे. हा स्वभाव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपले जीवन *प्रकाशमान* करत असतो. हा स्वभाव आपल्या जन्मामधेही आणि मृत्यूमधेसुद्धा *सामावलेला* आहे. हाच स्वभाव राजधर्मापासून संन्यासापर्यंत आपल्याला *मार्ग* दाखवत असतो. आपल्या याच स्वभावामुळे, मानवाच्या पहिल्या संस्कृतीने ‘सिंधु संस्कृती’ने इतरांसारखे काळाच्या उदरात आपले *अस्तित्व* हरवलेले नाही. आणि हाच स्वभाव, मानवाचे अस्तित्व असलेल्या या ग्रहावर आपल्या सर्वांचे पाय *खंबीरपणे* रोवून ठेवतो.

आपण भारतीय,
*आपल्यातील अपूर्णतेचा स्वीकार करून पूर्णत्वाची दिशा शोधतो व त्या दिशेने चालू लागतो. म्हणूनच, भौतिकतेच्या विपरीत अंतस्थतेचा मार्गाला आपण नेहमीच प्राथमिकता दिलेली आहे.*

या विपरीत आज,
*#तथाकथित बुद्धिवादाच्या विळख्यात* सापडल्याने आपण सगळंच नाकारायला सुरवात केली आहे.
आपणच जसे #स्वा._सावरकरांना नाकारत सुटलो आहोत तसेच आपण #महात्मा_गांधींनाही नाकारतो आहोत. आपण आपापल्या मान्यतांची दैवते सोडून बाकी सगळंच नाकारायला सुरवात केली आहे.

आणि कशाच्या जिवावर?
कुठल्या कर्तुत्वाच्या आधारावर?
ज्या ज्या महानुभावांनी आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या विचारांनुसार आणि कल्पनांनुसार हा देश बदलण्याचा, हा देश घडवण्याचा, या देशाला आनखी परिपक्व करण्याचा  यथासंभव प्रयत्न केला आहे त्या सर्वांनाच आपण कशाच्या जोरावर नाकारत सुटलो आहोत?

नसतील आपल्या कल्पना या देशासाठी खस्ता खाल्लेल्या इतिहास पुरुषांच्या/ मातांच्या कल्पनांशी जुळत.. असेल आपल्या आणि त्यांच्या विचारांमधे फरक.. त्यांच्या स्वत:च्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे कुठे तफावतही असेल.. पण म्हणून त्यांनी 'आपल्या पुढच्या पिढ्यांना आदर्श जग मिळावं म्हणून काहीच केलं नाही' असा त्याचा अर्थ होत नाही. हाच मापदंड आपल्या पुढच्या पिढ्यांनी लावायचा ठरवला तर त्यांच्या दृष्टीने आपला इतिहास किती क्षुद्र ठरेल याची आपल्याला कल्पना आहे?

भविष्यात आपला हा इतिहास क्षुद्र ठरू नये, यासाठी आज आपल्याला विचार आणि त्या विचारावर ठामपणे कृती करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. आपल्याला आपल्या भारताकडे स्वत:च्या नजरेतून बघण्याची गरज येऊन ठेपलेली आहे.

नाहीतर,
*#गिरीश_कुबेर* नावाचा मोठा संपादक आपल्या *#लोकसत्ता* नावाच्या वृत्तपत्रात भलेमोठे अग्रलेख लिहून आपली भारताची *#लोकशाही* ही फक्त *जगातील सर्वात मोठी लोकशाही* असून *#अमेरिकन लोकशाही* मात्र *जगातील सर्वात महान लोकशाही* असल्याचं आपल्याच मनावर ठसवत राहिल.
आपल्याकडे जे काही आहे ते सगळंच इतरांच्या तुलनेत  हीन आहे असं मानण्याची ही वृत्ती, या आपल्याच लोकांच्या 'नकारात्मक' मानसिकतेचा व भारताचा मूळ स्वभाव विसरल्याचा परिपाक होय. 

आणि,
आपल्याच लोकांना,
स्वत:चा 'स्विकार भाव' हा मूळ स्वभाव विसण्यास भाग पाडणारा 'तथाकथित बुद्धिवाद' आजच्या काळात किती प्रचंड ताकदवान झालेला आहे, याची कल्पनाच केलेली बरी.

तरीही,
आपणास हताश होण्याचे काहीच कारण नाही.
कारण,
आपली 'नाकारण्याची वृत्ती'च योग्य आहे, ही या 'नकारात्मक' लोकांची गडद *'अंधश्रध्दा'* असून त्यांच्या या विचारधारेपुढे आपली *'सकारात्मकता'* निश्चितच उजवी ठरणार आहे.
कारण,
उन्नत होत जाणे हा मानवाचा गुणधर्म असून या सृष्टीतत्वामधेही 'नाकारण्याला' काहीच स्थान नाही.

असो...

आजच्या या लेखात,
'तथाकथित बुद्धिवाद' काय असतो हे वरील दोन मासल्यांसह सोदाहरण पाहिल्यानंतर पुढच्या लेखात आपण,
*#अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलनात* वाचल्या न गेलेल्या *#नयनतारा_सहगल* यांच्या भाषणाच्या अनुषंगाने,
*#तथाकथित_बुद्धिवादाचे_कार्य* नेमक्या कुठल्या पध्दतीने चालते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया.

नमस्कार.